काँग्रेस वि. भाजपा सर्वविषयक चर्चा या पानावर करू नये ही आग्रहाची विनंती .
लोकसत्तेतला गिरीश कुबेर यांचा लेख वाचून बरेच प्रश्न उभे रहातात. आत्ता पर्यंत बघितलेले स्कॅम हे 'जर तर' प्रकारातले आहेत. कागदावर 'असे केले असते तर एवढे पैसे मिळाले असते ते आता मिळणार नाहीत कारण मा. मंत्री श्री अमुकतमुक यांनी ते खाल्ले' अशी घोडी नाचली आहेत.
पण या लेखातले कर्जाचे आकडे आणि ते कर्ज कुठून कुठे गेले आहे ते बघता थक्क व्हायला होते. हे आकडे किती खरे आहेत किती खोटे, असा जरी विचार केला तरी मल्ल्या प्रकरण ताजेच असल्याने हे आकडे विश्वासार्ह वाटतात.
यावर आपले काय मत ? अजून माहितीसाठी काही लिंक असल्यास कृपया द्याव्यात.
लोकसत्तेतील मूळ लेख : http://www.loksatta.com/lokrang-news/dr-manmohan-singh-and-congress-186238/
या पानावर अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने चर्चा करावी हे उत्तम. पण काँग्रेसच्या काळात आणि भाजपाच्या काळातली अर्थव्यवस्था या अनुषंगाने चर्चा चालेल.
काँग्रेस वि. भाजपा सर्वविषयक चर्चा या पानावर करू नये ही आग्रहाची विनंती .
मला अर्थशास्त्रातले कळत नाही,
मला अर्थशास्त्रातले कळत नाही, नि भारताबद्दल काहीच माहिती नाही. पण एक सर्वसाधारण मत.
जेंव्हा पुढारी, नेते, विशेषतः मनमोहन सिंग, किंवा चिदंबरम सारखे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ, काही निर्णय घेतात तो अर्थशास्त्रातील काही नियमांनुसार घेतला जातो. पण हे निर्णय घेतल्यावर त्यांची अंमलबजावणी कशी करायची? काय अटी असाव्यात पैसे देण्यापूर्वी? हे कोण ठरवणार? ठरवणार्यांनी ठरवले तरी ते चूक का बरोबर हे कोण ठरवणार? अंमलबजावणी योग्य रीतीने होते आहे की नाही हे कोण बघणार?
ही सर्व कामे जरी नेत्यांची नसली तरी हे बरोबर होते की नाही याची जबाबदारी शेवटी अर्थमंत्री नि प्रधानमंत्री यांची. त्यांना येते का हे सगळे सांभाळता? काही मॅनेजमेंट्चा अनुभव?
उद्योगधंद्यांना पैसे देणे योग्य. पण ते कोणत्या उद्योगधंद्यांना दिले, कुणाला दिले, देताना काही अटी घातल्या का? की हे पैसे अमुक दिवसात व्याजासह परत करावे? जर उद्योगधंदा करायचा तर फायदा झालाच पाहिजे ना? निदान तो पैसा योग्य रीतीने वापरला जातो आहे का हे तरी बघावे. तसे काही नसेल तर काय उपयोग?
म्हणजे भ्रष्टाचार वगैरे नसला तरी वरील बाबी लक्षात घ्यायलाच पाहिजेत.
खरे तर नुसते अर्थशास्त्रज्ञ असून पुरे नाही. त्यापेक्षा बरीच जास्त लायकी पाहिजे.