मेत़कुट

Submitted by प्रिति १ on 30 August, 2013 - 13:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ भांडे हरभरा डाळ, १/२ भांडे तांदुळ, १/४ भांडे उडीद डाळ, १ चमचा गहु, दीड चमचा धने, १.५ चमचा जिरे, २ लहान दालचीनीचे तुकडे, ६ लवंगा, १/२ जायफळ, १.५ चमचा मोहरी, १ चमचा हींगाची पुड, १ चमचा हळद, ८ ते १० सुक्या मिरच्या.

क्रमवार पाककृती: 

वरील सगळे जिन्नस मंद आचेवर हलके भाजावे आणि दळावे. मिक्स् र वर केले तरी चालते पण जरा कमी बारीक होते.

अधिक टिपा: 

हे मेतकुट तुप, मीठ भाताबरोबर मस्त लागते.

ह्यात थोडे दही, साखर, मीठ घालुन खाली तरी छान लागते.

माहितीचा स्रोत: 
हमखास स्वयंपाक पुस्तक ---
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्तच लिहिलेय. मेतकुट तोंडी लावणे म्हणून पण मी नेहेमी करते( मेतकुट विकतचे).
मेतकुटात थोडे ताक किंवा दही घालते, तिखट, मीठ, ओवा, जिरे घालते आणि करते.

प्रीती तुमच्या मेतकुटाचा वास दरवळला. धन्यवाद कृतीसाठी.

मेतकुट-तूप-भात.............म्म्म्म यम्मी!!
मी आईने करुन ठेवलेय तेच वापरते पण तशी सोप्पी कृती आहे.

धन्स सगळ्यांना...

खरच खुपच सोपी क्रुती आहे..अणि वेळ पण जास्त लागत नाही. आणि एकदा घरची चव आवड्ली की बाहेरचे आणायला नको वाटते....

मी या दीड महीन्यात दुसर्या वेळेला केले ईतके सगळ्यांना आवडले.

डाळ आणि तांदुळ धुऊन वाळवुन घ्यायची गरज नाही.. त्यामुळेच तर पटकन होते... लगेच १/२ तासात काम होऊन जाते. आणि खमंग मेतकुट तय्यार.

रैना अन मी सेम टु सेम..
पुस्तकात बघण्यापेक्षा ही पाककृती एकदम हॅन्डी आणी वेळेवर मिळाली.
थॅन्क्स प्रि. ..:)