आगरतळा येथे महाराष्ट्र राज्य शासन आणि सचिवालय जिमखाना यांच्या वतीने अंतरराज्य नाट्य स्पर्धेसाठी आम्ही मराठी नाटक केले होते . त्यात संपूर्ण भारतात आपले मराठी नाटक पहिले देखील आले होते . मुंबईतून १ ४ जणांचा संच आम्ही नेला होता . बक्षिस समारंभानंतर विरंगुळा म्हणून जवळपासचा परिसर पाहायचे ठरले .
भारत आणि बांगलादेशची सीमा आगरतळया पासून अगदी तीन चार किलोमीटर अंतरावर असल्याचे आणि आपण तिथे जाऊ शकतो असेही समजले . झाले . कट्टर मराठी मुंबईकर, बॉर्डर बघायचीच या हेतूने निघाले . खासगी वाहन करून आम्ही सगळे बोर्डर जवळ अगदी पंधरा मिनिटातच पोहोचलो . ड्रायव्हर ने एका दिशेला बोट करून ती बॉर्डर असल्याचे सांगितले . आम्ही सगळे चाट . सिनेमात दाखवतात तसे सैनिक कुठेच नाहीत कि तारांचे वेटोळे घातलेले कुंपण नाही ! समोर एक छोटासा आयताकृती तलाव होता . त्याच्या थोडेसे पुढे एक तलावाला समांतर पायवाट होती . आम्ही सगळे संभ्रमात . तेवढ्यात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स चा एक जवान खांद्यावर एस एल आर घेऊन गस्त घालत आमच्या दिशेने आला . त्याला जय हिंद केल्यावर गडी जरा निवळला . योगायोग म्हणजे तो जवान साताऱ्याचा होता . आम्ही सगळे मुंबईहून आलो आहे हे समजल्यावर तर तो एकदम खूष झाला. घरापासून लांब मराठी माणसे भेटल्याचा त्याला फार आनंद झाला आणि उत्साहाने तो जवान आम्हाला बॉर्डर दाखवू लागला .
समोर विस्तीर्ण सपाट जमीन होती . तिच्यावर गुडघ्या पर्यंत पोहोचेल असे हिरवेगार गवत होते . थोडेसे उजवीकडे सुमारे एक हजार यार्डांवर बांगलादेशाचे " चितगाव" रेल्वे स्टेशन दिसत होते . आमच्या मागे डावी कडे एक छोटीशी टेकडी होती . तिच्यावर बी एस एफ चा एक ओलिव्ह ग्रीन तंबू होता . त्या तंबूवर दिमाखात फडकणारा तिरंगा दिसला . त्याला बघून आमची सगळ्यांचीच असली-नसलेली छाती जराशी पुढे आली . शासकीय इमारतींवर तिरंगा आपण नेहमीच बघतो . पण असा दूर कुठेतरी जंगलात, एखाद्या टेकडीवर, निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा अप्रतिम दिसतो . त्याचे वर्णन कितीही केले तरी कमीच पडेल .
त्या तंबू बाहेरून एक जवान आमच्या कडे दुर्बिणीतून पहात होता . बाजूलाच लाईट मशिन गन ठेवलेली दिसली . म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता कि किती छोटी टेकडी होती ते ! "हि बघा साहेब , हीच आपली हिंदुस्थानची बॉर्डर !" असे म्हणत त्याने एका सिमेंटच्या चार साडेचार फूट उंच अश्या त्रिशंकू आकाराच्या खांबाकडे बोट दाखवले . आमच्या पासून जेमतेम दोन पावलांवर कसलातरी नंबर लिहिला गेलेला तो खांब होता . " नो मेन्स लैंड , कुठे आहे ?" मी उगाचच मला जरा जास्त कळते असे दाखवायचा प्रयत्न केला . त्यावर तो जवान हसला . "कसली नो मेन्स लैंड ? हा पोस्ट ओलांडला की बांगलादेश सुरु !" "म्हणजे काय ? तारांचे कुंपण कुठाय ? नो मेन्स लैंड कुठाय ? बांगलादेश चे सैनिक कुठे आहेत ? " आम्ही सगळे एकदमच विचारायला लागलो . त्यावर तो म्हणाला ," तारांचे कुंपण सगळीकडे नसते . नो मेन्स लैंड पण सगळी कडे नसते . आणि बंगला देशाला त्यांची बॉर्डर सेफ नाही ठेवायची कारण त्यांना आपल्याकडून काहीच धोका नाहीये. आपल्याला मात्र त्यांच्या कडून धोका आहे म्हणून आपणच आपली सिक्युरिटी बघायची . त्यांचे जवान आठवड्यातून एकदा फेरी मारून जातात ."
"म्हणजे मी जर एक पाय पुढे गवतात टाकला तर मी बांग्ला देशात जाणार का ?तुम्ही मला पकडू शकणार नाही का ? भारतीय कायदा मला लागू शकणार नाही का ? " माझ्या खुजल्या काही कमी होत नव्हत्या . त्या जवानाने हसून मान होकारार्थी डोलावली . "मग मी एक पाय पुढे टाकून परत मागे येऊ का ? " अशी त्याच्याकडे परवानगी मागितली आणि परत पाय मागे टाकण्याच्या हमीवर त्याने देखील दिली . माझ्याबरोबरचे काही मित्र वैतागले . तुला जाम मस्ती आहे , कशाला खुजल्या करतोस वगैरे बोलत हळूच मला सामील झाले . समोर बांग्ला देशाचा एकही जवान दिसत नव्हता . त्यांची चौकी देखील कुठे दिसत नव्हती . एक पाउल पुढे टाकून बांग्ला देशात प्रवेश केला आणि परत सगळ्यांनाच खुजली आली . "भारत माता कि जय !" , "वंदे मातरम ," "शिवाजी महाराज कि जय ", :बांग्ला देश मुर्दाबाद , पाकिस्तान मुर्दाबाद " अशा आरोळ्यां ठोकायला सुरवात केली . तो जवान देखील आम्हाला ओरडायला सामील झाला .
तेव्हढ्यात एका पंटर ने बांग्ला देशाच्या भूमीवर पाकिस्तानला शिविगाळ सुरवात केलि. मग काय सगळेच तिथे बंगला देश आणि पाकिस्तान ला शिव्या देत , त्यांच्या आया बहिणींचा , उद्धार करायला लागले. जोश कमी झाल्यावर मात्र सगळ्यांनी पाय मागे घेतले आणि आपल्या देशात परत आले. तेव्हा मी सगळ्याना सांगत होतो कि मी विदाऊट पासपोर्ट आणि व्हिसा , फोरीन रिटर्न आहे . नन्तर प्रत्यक्ष पासपोर्ट आणि व्हिसा काढुन परदेशि गेलो तो भाग निराळा !
तूर्तास इतकेच !
* आधारित
छान अनुभव लेखन
छान अनुभव लेखन
गंमतीशीर अनुभव आहे
गंमतीशीर अनुभव आहे
छान अनुभव.. म्यानमारमधेही असे
छान अनुभव.. म्यानमारमधेही असे जाता येते. संध्याकाळच्या आत परत यायचे
मस्तच .... चितगाव वाचलं अन
मस्तच .... चितगाव वाचलं अन बरच काही आठवलं... असो.
त्या तंबूवर दिमाखात फडकणारा
त्या तंबूवर दिमाखात फडकणारा तिरंगा दिसला . त्याला बघून आमची सगळ्यांचीच असली-नसलेली छाती जराशी पुढे आली . शासकीय इमारतींवर तिरंगा आपण नेहमीच बघतो . पण असा दूर कुठेतरी जंगलात, एखाद्या टेकडीवर, निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा अप्रतिम दिसतो . त्याचे वर्णन कितीही केले तरी कमीच पडेल .>>>>
काटा आला अंगावर, हे वाचून!
गंमतीशीर अनुभव आहे.
गंमतीशीर अनुभव आहे.