केसरी.. सचिन.. गुरुनाथ.. गिरीकंद.. अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्यांच्या जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला दिसतात...
आम्ही आत्तापर्यंत केलेला प्रवास हा..
आपण माहिती काढून.. प्रीबुकिंग करणे..
जे जाऊन आलेत त्यांना त्याविषयी विचारुन व्यवस्थित आखणी करुन आपल्या सहलीचे आयोजन करणे अशा स्वरुपाचा होता..
यात थोडा त्रास होतो पण आपल्याला हवे तसे एखाद्या आवडलेल्या ठिकाणी जास्त वेळ रमता येते हा फायदा.
पण आता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा वाटले. आपल्यांपैकी बर्याच जणांनी असा प्रवास केला असेलच.
तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा? सोयी कशा होत्या? त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवली गेली का.. किंवा परदेशप्रवास कसा होता? काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का?.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..
त्याचा मला निश्चितच फायदा होईल..
.............................
मायबोलीबाहेरच्या वेबसाईटसच्या लिंक्स धोरणात बसत नसल्याने काढून टाकल्या आहेत. मायबोलीकरांना या सगळ्या एकत्र असणे सुलभ वाटत असले तरी मायबोलीवर पैसे देऊन जाहिरात करणार्या जाहिरातदारांसाठी अशा लिंक्स असणे योग्य नाही. यातल्या प्रवासी कंपन्यांना हा बाफ प्रायोजीत करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे.
-वेबमास्टर
संपादित
संपादित
मी vayudoot holidays बरोबर
मी vayudoot holidays बरोबर kerala trip केली आहे , छान अनुभव होता.
(No subject)
Mala anubhav nahee paN
Mala anubhav nahee paN sasubainee aattaparyant kesaree aaNi kox & king yanchyasibat europe, keraL, shreelanka, kashmir asha tours ghetalya aahet.donhee companies cha tyancha anubhav changala aahe.
मस्तच धागा आहे हा माझ्यासाठी
मस्तच धागा आहे हा
माझ्यासाठी खुप उपयुक्त
आई बाबांना सरप्राईज गिफ्ट म्हणुन राजस्थानची ट्रिप देणारेय मी
पण कोणत्या कंपनी सोबत पाठवू कळेना
मदत मदत मदत
केसरीची नोव्हेंबरमध्ये
केसरीची नोव्हेंबरमध्ये राजस्थान ट्रीप आहे म्हणे... तिकडे बघ..
केसरी, अनुभव बद्दल चांगला फीडबॅक ऐकला आहे. मी गेलेलो नाही कधी.
अजुन एक नवीन आहे. वीणा
अजुन एक नवीन आहे. वीणा ट्रवल्स.
केसरी चांगले आहे.
केसरी चांगले आहे.
गिरिकंद सोडून कुणिही बघा.
गिरिकंद सोडून कुणिही बघा. पर्यटकांना ठार मारतात ती लोकं.
मी ’केसरी’बरोबर काश्मीर आणि
मी ’केसरी’बरोबर काश्मीर आणि सिंगापूर या दोन टूर केल्या आहेत.
माझा अनुभव खूपच चांगला आहे.
भरपूर फिरणं, जेवणा-खाण्यात वैविध्य
तसेच आपुलकीने वागणारे, प्रवाशांची काळजी घेणारे टूर मॅनेजर.
(काही महिन्यांपूर्वी केसरी कंपनी स्प्लिट झाल्याचे वाचले आहे.
परंतु, त्याचा विपरीत परिणाम टूरिस्टवर होत नसावा अशी आशा आणि अपेक्षा.)
रिया, वीणावर्ल्डची राजस्थान
रिया, वीणावर्ल्डची राजस्थान ट्रीप बघ. स्वस्तात मस्त वाटतेय.
स्वाती, तिकडे चौकशी करून
स्वाती, तिकडे चौकशी करून आले
पण दोघांचे ५६ हजार म्हणतायेत
काल पेपरमध्ये पाहिलं आर्ध्या किमतीत आहेत ट्रिप्स
पुन्हा जाऊन विचारून यावं म्हणतेय
केसरी सोबत माझ्या
केसरी सोबत माझ्या साबा-साबुंनी राजस्थान ची ट्रीप केली होती.. त्यांचा अनुभव चांगला आहे.
माझ्या आई-बाबां नी भाग्यश्री ट्रॅव्हल्स सोबत काश्मीर ट्रिप केली होती तो पण अनुभव छान होता त्यांचा
बाकी सचिन बद्दल खुप काही चांगलं ऐकलं नाहिये लोकांकडुन
आम्ही 'केसरी’ (के अँड एस)
आम्ही 'केसरी’ (के अँड एस) बरोबर शिमला कुलु मनाली ला हनिमूनला गेलो होतो..
हनिमून स्पेशल ट्रीप असुन इतकं पळवलं.. जराही वेळ मिळु दिला नाही एकमेकांसाठी..
एका दिवशी एक तास मोकळा होता तर एक प्राणीसंग्रहालय बघायला नेले.. शाळेची ट्रीप नेतात तशी..
त्यांची हॉटेल्स इतक्या उंच ठिकाणी होती जिथे बस जात नव्हती.. मग आम्हालाच गाढवासारखे चढ चढावे लागले..
हिमाचल प्रदेशासारख्या पहाडी प्रदेशात १२-१५ तासांचा घाटाचा सलग प्रवास केल्यावर इतके चढ चढायला लावतांना त्यांना जरासुद्धा दया आली नाही.. सगळे हनिमून कपल्स (म्हणजे वयाने तरुण) असुनही अफाट दमले..
ज्यांच्यासाठी ट्रीप = दिवसरात्र साईट्सिइंग..साईट्सिइंग..आणि फक्त साईट्सिइंग असेल.. ज्यांना नव्या ठिकाणी जाऊनही तिकडे वरणभात/ श्रीखंड इ. खायचे असेल.. ज्यांना अमुक एका ठिकाणी आलो आहोत तर इथले सगळे टुरिस्ट स्पॉट्स बघितलेच पाहीजेत (मग ते तद्दन फालतु का असेनात), ज्यांना अमुक एका ठिकाणी गेल्यावर तिथली एकुण एक लोकल वस्तु आपल्या घराच्या शोकेसमध्ये असावीच असे असेल तर नक्की केसरी (के अँड एस) बरोबरच जा..
ज्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात जरा निवांतपणा आणि एकमेकांसाठी वेळ हवा असेल त्यांनी प्लीज अजुन एकदा विचार करा..
सचिनबद्दल हल्ली-हल्ली
सचिनबद्दल हल्ली-हल्ली निगेटिव्ह ऐकायला मिळाले, पेपरलापण आले होते पण पूर्वी केसरी एक नंबर आणि सचिन २वर होते मुंबईत. आमच्या नातेवाईकांनी आणि मित्रमंडळीनी पूर्वी काही ट्रीप सचिनबरोबर केल्या त्यांचा तेव्हा अनुभव चांगला होता. आता मात्र तिथली व्यवस्था बिघडली आहे.
हनिमुन स्पेशल ट्रिप >>> कसे
हनिमुन स्पेशल ट्रिप >>>
कसे व्हेरिफाय करतात की येणार्या जोड्या हनिमून कपल्सच आहेत? लग्नानंतर किती दिवसात ट्रिप केली म्हणजे ती हनिमून ट्रिप धरली जाते?
टण्या माधुरी धन्स, मी सचिनचा
टण्या
माधुरी धन्स, मी सचिनचा विचार करणार होते पण नकोच आता
केसरी आणि वीणाज वर्ड्स ! दोन्ही बघते
मिलिंद बाबर ह्यांच्या मँगो
मिलिंद बाबर ह्यांच्या मँगो हॉलिडेज बरोबर माझ्या आई वडिलांनी युरोप ट्रीप केली. उत्तम संयोजन, हुशार ग्रूप लीडर्स ह्यामुळे ट्रीप अतिशय संस्मरणीय झाली असा आईबाबांचा फीड्बॅक आहे.
सचिन बरोबर अजिबात जाऊ नका. पैसे भरले तरी ट्रीप निघेलच , निघाली तरी जेवण नेहमी मिळेलच, ट्रीप नियोजित प्लॅनप्रमाणे पूर्ण होईलच, ह्याची अजिबात गॅरेंटी नाही.
संपदा हे मँगो हॉलिडेज
संपदा हे मँगो हॉलिडेज भारतातल्या पण सहली आयोजित करते का?
वेब साईट, पत्ता काही देऊ शकशील?
केसरी आंतरराष्ट्रीय
केसरी आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी चांगली आहे पण देशांतर्गत त्यांचे चार्जेस इतर कंपन्यांबरोबर तुलना करता बरेच जास्त आहेत असा अनुभव आई-वडिल व इतर जवळच्या नातेवाईकांकडून ऐकून आहे.
चौधरी यात्रा कंपनीची सेवा पण चांगली आहे.
मँगो हॉलिडेज, स्ट्रॉबेरी
मँगो हॉलिडेज, स्ट्रॉबेरी हॉलिडेज्
हे काये माधवी? वेबसाईट सांग
हे काये माधवी?
वेबसाईट सांग ना प्लिज
http://www.mangoholidays.in/
http://www.mangoholidays.in/
ही त्यांची वेबसाईट.
हे काये माधवी? >> अगं दोन्ही
हे काये माधवी? >> अगं दोन्ही फळांची नावं बघून हसू आलं!
मी तुला चौधरी यात्राची माहिती घरी विचारून देते. माझे आई-बाबा त्यांच्यातर्फे राजस्थान ट्रीप करून आलेत. चांगला अनुभव. चांगली हॉटेल्स, जेवण वगैरे!
त्यांचे पुण्यातले ऑफिस स्वारगेट्ला आहे. चौकातच.
थँक्स संपदा माधवी नक्की, मी
थँक्स संपदा
नक्की, मी वाट पहातेय 
माधवी
आम्ही निगडीतल्या एका सन
आम्ही निगडीतल्या एका सन टुरीझम कडून अंदमान बेटांची ५ दिवसांची ट्रीप केली होती. प्लानींग ठि़क होते व हॉटेलसुद्धा चांगले होती पण त्यांनी सगळ्या लोकांकडून त्याच ट्रीपचे वेगवेगळे चार्जेस घेतले. शक्य तितके निगोशीऐट करा.
केसरीमधून वीणा पाटील बाहेर
केसरीमधून वीणा पाटील बाहेर पडल्या आहेत ( अंतर्गत भांडण ) आणि त्यांनी स्वताची "विणाज वर्ल्ड" हे कंपनी सुरु केली आहे. केसरी मध्ये खाऊ -पिऊ ची चंगळ असतेच. पण त्यांचे रेट्स अति प्रचंड आहेत. ( म्हणूनच खाऊ पिऊ ची चंगळ परवडते )मी स्वत केसरी मधून हि गेले आहे आणि इतर प्रवासी कंपन्या सुद्धा ट्राय केल्या आहेत. केसरी पेक्षा जवळ जवळ निम्या किमतीत . वनराज ट्राव्हलस /सिद्धार्थ / अनुभव /भाग्यश्री /वनिता आणखीन बर्याच मुंबईतल्या
पियू परी म्हणाली तशी आम्ही सिमला कुलू मनाली ला गेलो तेव्हा केसरीचे प्रवासी पण आमच्या बरोबरच फिरत होते. मनाली ला आमचे हॉटेल मार्केट च्या अगदी जवळ होते आणि त्यांचे खूप लांब चढावर. आम्ही जिथे जेवायला थांबत होतो तिथेच ते जेवायला आमच्या पाठोपाठ हजर. आणि पैसे मात्र आमच्या दुप्पट 
अरे काय चांगलं नाही ते
अरे काय चांगलं नाही ते सांगताय... त्यापेक्षा काय चांगलं आहे ते सांगा की
रिया, अंजलीला सगळ्या प्रकारची
रिया, अंजलीला सगळ्या प्रकारची माहिती हवेय. चांगले अनुभव आणि वाईट अनुभव सुद्धा . तिने विचारलच आहे ना <<तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा? सोयी कशा होत्या? त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवणे किंवा परदेशप्रवास कसा होता? काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का?.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..>> त्या नुसारच माहिती देतोय
हां! ते झालंच पण सोबत चांगलं
हां!
बाकी काही नाही
)
ते झालंच
पण सोबत चांगलं पण लिहा की (स्वार्थ
Pages