युएस ओपन - २०१३

Submitted by Adm on 22 August, 2013 - 07:30

वर्षातली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा युएस ओपन सोमवार दिनांक २६ ऑगस्ट पासून सुरु होते आहे.
त्याबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

स्पर्धेची वेबसाईट :
http://www.usopen.org/index.htm

बाकी सगळं नंतर लिहीन...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सातवं सीडिंग ऐकून वाईट वाटलं.>> मला तर तो बघावं तेव्हा क्वार्टर- सेमी मध्ये हरतोय हेच ऐकून 'अरेरे' वाटतं.. त्यामुळे सातवं सीडिंग आश्चर्यकारक वाटले नाही.. बघूया यावेळी काही करामत करतोय का.. खूप अवघड आहे ते.. मरे नाहीतर जोको फेवरीट वाटताहेत !!

सातवं सीडिंग ऐकून वाईट वाटलं.>> अल्मोस्ट समप्ल आहे..आता साहेब रीटायरमेन्ट कधी घेणार हेच पहायच (जरी वाइट वाटले तरी) !
मरे नाहीतर जोको फेवरीट वाटताहेत !!>> नदाल ला विसरलास का, यो Happy ? नदाल खुप छान खेळतो आहे सध्या ..

जाऊ द्या हो मयेकर... उतार वयात व्हायचच असं.. Wink

राफा आणि फेडरर एकाच क्वार्टरमध्ये... ज्योकोला टफ ड्रॉ आहे म्हणे..
सेरेनाला पण.. पहिल्याच फेरीत स्किवोनी.. शिवाय लिसिकी, स्टीफन्स आणि व्हिनसपण तिच्या मार्गात आहेत.
वॉझनियाकीचं सिडींग सुधारलं परत..

पोवा नाही ह्यावेळी.. Sad

बाकीचं म्हणजे ते नेहमीचंच ना.. >>> हो.. अजून काही लिहू का?

मयुरेश.. Happy हम भूलेगा नही जी... Happy

प्राईम टाइमला भेट झालीच नाही की Happy

सरेना आणि अझारेंका दोघीही पेटल्यासारख्या खेळतायत !

बाकी सगळे अपेक्षित जिंकले..

इकडे मॅचेस टेन स्पोर्स्ट्स वर आहेत.. आणि ते केबलवर दिसत नाही,.. त्यामुळे साईटवरच्या एक मिनिटांच्या मॅच रिव्ह्यूवर मदार.. Sad

हो फारच पाऊस डिले..आज दिवसाच्या पाचच मॅचेस पूर्ण झाल्या म्हणे.
व्हीनसची आत्ता झाली. झेंगकडून हरली.

>>इकडे मॅचेस टेन स्पोर्स्ट्स वर आहेत.. आणि ते केबलवर दिसत नाही
Sad सगळ्या? म्हणजे सेमि, फायनल इ. दुसरीकडे कुठे नाहीत?

पराग, तुमच्याकडे कॅस लागू झाले नाही का? केबलवाल्याला सांगा टेन स्पोर्ट्स द्यायला. नाहीतर डीटीएच आहेच . एचडी घ्याल तर रेकॉर्ड करूनही बघता येतील.

भारताचा सोमदेव भारी खेळला म्हणे. पाच सेट आणि तीन तास अकरा मिनिटं खेळून दुसर्‍या फेरीत पोचलाय... आता दुसर्‍या फेरीत गाठ वर्ल्ड रँक २० शी.

महिला एकेरीत काय सुरु आहे ?? Uhoh
नंबर ३,४,६,७,८,९,११,१२,१४,१५,१६,१७ एव्हड्या सिडेड खेळाडू चौथ्या फेरीपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहित!

सेरेनाला परत एकदा जोरदार संधी आहे..

डेल पोट्रो , हेविट मस्त झाली वाटतं मॅच. हायलाईट्स वरून वाटल<..

डेल पोट्रो-ह्युविट मस्त झाली. शेवटच्या सेटमध्ये डेल पोट्रो दमला. रात्री उशीरा संपली.
इजनर-कोह्लश्रायबर, अ‍ॅलिझे कोर्ने आणि अझारेंकापण मस्त झाल्या.

फडतूस टेनिसचे प्रदर्शन इवानोविच-मॅकहेल मॅचमध्ये बघायला मिळाले.

राफाला घाम फुटलाय..
म्हणजे गळतोय. फारच गरम आणि ह्युमिड आहे.

राफा-कोह्ल, गॅस्के-रावनिक, फेर्रु-टिप सगळ्या जोरात चालू आहेत!

हो, गेले.
राज, नेव्हर रुल आऊट अ चँपियन. बिगीनींग ऑफ अ न्यू बिगीनींग!

अझारेंका सुटली आहे. अंगाने.
बिचारा ह्युविट..

फायनलला नक्किच जाईल. तो पण छान खेळतोय. फक्त मनाने खचतो कधी कधी. जोको आणि नदाल मध्ये जो मनाने अधिक स्ट्राँग असेल तो जिंकेल. मी नक्किच जोको पाठी. Happy

Pages