ह्या पावसाळ्यात मला पहिल्यांदाच अशी समस्या जाणवली. घरात सगळीकडे विशेषकरून भिंतींवर जिथे लीकेजमुळे (सध्या लीकेज नाही, भिंती कोरड्याच आहेत) पोपडे निघाले आहेत अशा ठिकाणी पांढरा बुरशीसारखा थर बनतो आणि आजुबाजुला मुंग्यापेक्षा बारिक , सूक्ष्म किटक धावताना दिसतात. हे बाहेर होते तिथपर्यंत ठिक होतं पण एकदा कपड्यांवर धावताना बघितले तेव्हा हैराण झाले. कपाट उघडून बघितलं तर कपड्यांच्या एका गठ्ठ्यावर , जो थोडा कमी वापरात होता, त्यावर सर्वत्र पांढर्या ठिपक्यांची रांगोळी होती आणि नजर ताणून बघितल्यावर काही किटकही धावताना दिसले.
हा बहुधा मुंबईच्या दमट हवेचा , बुरशीचा परिणाम असावा. पण असा प्रकार पूर्वी कधीही झाला नव्हता त्यामुळे नक्की सांगता येत नाही.
(गेले दोन दिवस मी फक्त कपडेच धुतेय ... एक एक गठ्ठा कपाटातला... चुन चुन के धो डाला ... भिंतीनाही तातडीने रंग लावायचं काम घेतलयं... त्याशिवाय स्वच्छ वाटणार नाही)
कपड्यांच्या बाबतीत हा प्रकार नेमका कशामुळे होतो आणि ती बुरशीच होती कि आणखीन काही.... आणि हे होवु नये म्हणुन कुठली काळजी घ्यावी..... हे भिंतीवरच्या बुरशीमुळे कपाटात झाले असेल कि कपड्यांवर हि होतं..... तसेच पावसाळ्यात लेदरच्या बेल्ट, शूज इ. ची काळजी कशी घ्यावी...... कृपया आपली माहिती/ अनुभव इथे शेअर करावा.
पावसाळ्यात अशी समस्या सर्वत्र
पावसाळ्यात अशी समस्या सर्वत्र आहे. तुमचे घर असेल तर (फ्लॅट नाही) जमीनीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने घराच्या भिंती सुध्दा अर्धा पर्यत ओलसरणा धरतात. मुंग्यांचाही त्रास असतोच. शक्यतो कपडे लोखंडी कपाटात ठेवा. दोरीवर वाळत घालायचे रोजचे कपडे बाहेर वाळवा. अंगणातील ओलावा जाण्यासाठी झाडांच्या फांद्यांची काटछाट करा. दारे खिडक्या दिवसभर उघंड्या ठेवा. सर्व सुरळीत होईल.
रुम हीटर (पंखा किंवा लाईट
रुम हीटर (पंखा किंवा लाईट वाले) वापरा कपडे सुकवीण्यासाठी.
धन्यवाद बन्डोपंत,
धन्यवाद बन्डोपंत, बन्डु....
आमचे घर नसून फ्लॅटच आहे अन तो ही तळमजला... पावसाची चांगलीच झड मारते घरात त्यामुळे.दारे खिडक्या उघड्या ठेवायची सोयच नाही ... लोखंडी कपाटाचे कारण कळले नाही पण....
पावसाळ्यात आणखी एक समस्या
पावसाळ्यात आणखी एक समस्या उद्भवते ती म्हणजे लिकेज . अनेक वेळा लिकेज काढले तरी हे पाणी कुठून कुठून मार्ग काढून टिपकतेच. हैराण केले आहे या समस्येने मला तरी.
पहिल्या मजल्यावरील स्लॅब मधून पाणी गळती चालू आहे.
वर दुसऱ्या मजल्यावरील भींतींना खालून ओल धरली आहे. दोन वर्षांपूर्वी याच समस्येमुळे दुसऱ्या मजल्यावरील बाथरूम च वॉटरप्रूफींगच काम करुन घेतले यावर्षी परत तेच सुरू झाले आहे.
कोणा जाणकारांनी कृपया मदत करावी.
सर्दी होते पावसात. जात नाही
सर्दी होते पावसात. जात नाही लवकर.