महत्वाचे ,,,,,,,,
शेतकरी सुरक्शा विधेयक
मित्रहो बर्याच दिवसानी भेटतोय. मित्रहो सध्या अन्न सुरक्षा विधेयक चर्चेत आहे. हे धोरण राबवायचे झाल्यास शेतकर्याला ग्रुहित धरलेले दिसत नाही. देशातील प्रत्येकाला किमान दोनवेळा तरी पोटभर अन्न मिळावे हि भुमिका केव्हाहि योग्यच आहे. त्याचवेळी तुम्हाला अन्न मिळावे यासाठी शेतात उन्हा पावसात राबून अन्नधान्य पिकविणारा जो शेतकरी आहे तो जिवन्त राहावा यासाठी काही धोरण आखावे, काही भुमिका घ्यावी कि नाही? मित्रहो त्यासाठीच ह्या धाग्याच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा करायची आहे.
ज्यावेळी तुम्ही लोकाना स्वस्तात धान्य देऊ करता त्यावेळी तुम्हालाही स्वस्तातच धान्य विकत मिळावे हि तुमची मानसिकता असणार. म्हणजेच सरकार लोकाना स्वस्तात धान्य देणार तेव्हा सरकारलाही शेतकर्याकडून स्वस्तात धान्य मिळावे हि अपेक्षा असणार. आणि हिच भुमिका घातक ठरणार. अन्न खाणार्यान्साठी सुरक्षा विधेयक येणार असेल तर शेतकर्यासाठीही सुरक्षा विधेयक आणावे.
या विधेयकात कोणकोणते मुद्दे असावेत याविषयी आपल्याला येथे चर्चा करायची आहे. काही मुद्दे मी येथे देत आहे. आणखी मुद्दे आपण सुचवावेत.
शेती, उद्योग आणि नोकरी हि रोजगारची साधने. आजपवेतो शेती हा परम्परेने करायचा एक धर्म होता. आता तो व्यवसाय झालाय त्यामुळे पोट भरले नाही तरी धर्म सोडायचा नाही अशी काही आता कोणाची मानसिकता राहिलेली नाहे. त्यामुळेच आजचा तरुण आणि महिला शेतात काम करायला तयार नाही.( हा लोकसभेतील अहवाल आहे.) त्याला आणखी ही काही कारणे असतील. तो एक वेगळा विषय होईल. पण जे सध्या शेती करताहेत ते तरी शेतीत टिकून रहावेत यासाठी काही मुद्दे असलेले विधेयक तयार व्हावे असे मला वाटते.
मुद्दा क्र. १
-शेतमालाचे दर
शेतमालाला मागील वषी मिळालेम्या सर्वोच्च दरानुसार चालू वर्षीचा दर ठरवावा. उदा. गेल्यावर्षी मक्याला १३५० पासून ते १७०० पर्यन्त दर होते. यावर्षी १७०० पासून पुढे दर ठरवावेत. तसे बन्धन बजारातील व्यापार्यान्वर घालावे. ती प्रक्रिया शासनाने राबवावी. जेणे करुण शेतमाला कायम चान्गले दर मिळतील.
मुद्दा क्र. २
-गावपतळीवर वेअर हाउसेस-
व्यापारी जेथे व्यवसाय करतात तिथेच त्याना माल साठविण्यासाठी गोदामे उपलब्ध होतात. त्याच धर्तीवर शेतकरी ज्या गावात शेती करतो त्याच गावात त्याला वेअर हाऊस उपलब्ध व्हावे.
मुद्दा क्र. ३
प्रशिक्षण
नोकरी/ व्यावसायिकान्साठी कामातील उत्साह टिकून रहावा व नविन ज्ञानात भर पडावी म्हणून सातत्याने त्यान्चे प्रशिक्षण सुरु असते. शेतकर्यान्साठी अशी प्रशिक्षणे सध्या आहेत ती फारच कमी आहेत त्यात आणखी भर घालावी.
मुद्दा क्र. ४
क्रुषी आरोग्य केन्द्र
संपादन
चिंतामण पाटील | 7 August, 2013 - 16:02
जनतेच्या आरोग्यासाठी तालुकास्थानी मोठे आरोग्य केन्द्र सरकर चालवते. मानसाचे आरोग्य बिघडते तसे शेतीचेही बिघडते. शेतीच्या आरोग्यासाठी तालुकापातळीवर क्रुषी आरोग्य केन्द्र उभारावेत्. त्याठिकाणी माती / पाणी परीक्षणाची सोयही व्हावी.
मुद्दा क्र. ५
क्रुषी सेवक नेमणूक
ग्रामपन्चायतीला ग्रामसेवक असतो. त्याच प्रकारे प्रत्येक गावाला एक क्रुषी सेवक असावा. मात्र गावपातळीवरच्या राजकारणाचा विचार करता अशी नेमणूक होताना ती व्यक्ती बाहेरगावचीच असावी. तसेच त्याने गावातच रहावे हे बन्धनही असावे.
मुद्दा क्र. ६
भान्डवल उपलब्धता
शेतकर्याच्या शेतीचे मुल्य निर्धारित करुन शेतीच्या किमतीच्या ५०% इतके कर्ज १०वर्षाच्या परत फेडीच्या अटीवर शेतकर्याला मिळावे. उदा. आता एकरी दर २ लाख धरल्यास शेतकर्याला एकरी १ लाख रुपये इतके कर्ज मिळावे. यामुळे त्याला पुरेसे भान्डवल उपलब्ध झाल्यास तो सावकाराची पायरी चढणार नाही.
हे विधेयक आपण सगळे मिळून तयार करुयात येथे मतभेद व्यक्त करणे हा हेतू नाही. त्यासाठी वेगळा धागा तयार करता येईल. आपल्याला काही मुद्दे सुचत असल्यास ते सुचवा. धन्यवाद.
शेतकरी धाग्यावर कोणीच प्रतिसाद न दिल्याने येथे यावे लागले माबोच्या व्यवस्थापानाकडे माफी मागतो.
आजच्या सकाळला आलेली शरद
आजच्या सकाळला आलेली शरद पवारांची प्रतिक्रिया
link1">
भलेही पवारांचे विचार फारसे पट॑त नाही, पण हे मात्र पटलं. शेतमजुरांचाही प्रश्न आहेच.
मला स्वतः शेतीचा अजिबात अनुभव नाही, पण कर्जाचं टेन्शन कमी व्हावं यासाठी ऑरगॅनिक फार्मिंगचा अनुभव चांगला वाटला. कारण मग रसारने आणि खतांचा खर्च कमी होईल.
छान ,मी एक शेतकरी असल्याने
छान ,मी एक शेतकरी असल्याने आपण सुचवलेले उपाय योग्यच आहेत असे म्हणेन, किंबहूना तरुणांना शेतीकडे आकर्षीत करण्यासाठी कृषीविकास खाते असावे असे मला वाटते .सरकारने फूड प्रोसेसिंग करणारे सहकारी उद्योगधंदे उभे करण्यास अर्थ सहाय्य केल्यास बराच शेतीमाल प्रक्रीया करुन एक्स्पोर्ट करता येईल.त्याचप्रमाणे सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी शासनाने पावले उचलावीत नाहीतर खाजगी मालक राजकारण्यांना हाताशी धरुन कवडीमोल किमतीला शेतमाल खरेदी करतील जसे ब्रिटीश निळ ,कापूस बाबतीत करत होते.
Sherkaryala ghar badhanisathi
Sherkaryala ghar badhanisathi kami vyajane dirgh mudatiche karz milaave.