२ गिलक छोटी / घोसावळे
१ गाजर
तील ३ चमचे
मीठ चविनुसार
धने जीरा पूड
हिरवीमिरची बारीक चिरून
कोथिंबीर
लाल मिरची powder
जराशी हळद
जराशी साखर
गवाचे पीठ साधारण एक छोटी वाटी किंवा मिश्रण चांगले जमेल तेवढे
shallow fry करायला तेल
गाजर आणि गिलके किसून घ्या . मग त्यात सगले जिन्नस एकत्र करा आणि पाणी न घालता कणिक घालून एकत्र करा . साधारण भजिन्पेक्शआ घट्ट . आता हाताला तेल किंवा पाणी लाऊन त्याचे कटलेट करून घ्या . पण तवा तापला असेल तेवाच .
आणि पटापट cutlets करून तवयावर टाका . लिंबू एवढा गोळा झाला पाहिजे आणि त्याला चपटा करावा म्हणजे पीठ आणि घोसावला + गजर शिजेलहि। आजूबाजूला तेल सोडा झाकण ठेऊन जऱा वेळ होऊ देणे मग दुसर्या बाजूला थोडं तेल घालून क्रिस्पी होईस्तोवर होऊन देणे .
तवा मोठ्ठा असेल तर एका वेळेला १०-१२ होतात . किंवा जर मोठ्ठे मोठ्ठे गोळे घेऊन मग दाबायचे आणि तव्यावर घालायचे . कंटाळा येत असेल तर
खुप छान लागतात + खूप हेल्दी
नवीन आहे सदस्य , चूकभूल माफ करणे
तुम्ही त्यात तुमच्या आवडीचे काही जिन्नस वाढून टाकू शकता
फोटो नाहीये
आयडिया आवडली. यात बादशहा
आयडिया आवडली. यात बादशहा रजवाडी गरम मसाला घातला तर अजूनच चव खुलेल.
रच्याकने, मी इतकेवेळा बादशहा मसाले वापरायला सांगते की लोकांना वाटेल माझी बादशहा मसाल्यांची एजन्सी आहे की काय? .... वाटू द्यात पण बादशहा मसालेच वापरा. हवे तर शेअर्स विकत घ्या त्या कंपनीचे.
छान आहे. घोसावळ्या ऐवजी इतर
छान आहे. घोसावळ्या ऐवजी इतर काही वापरता येईल का?
झुकिनी वापरता येईल कदाचित...
झुकिनी वापरता येईल कदाचित...
सुनिधी, माझ्यामते झुकीनी
सुनिधी, माझ्यामते झुकीनी वापरता येईल.
थालीपिठ पण लावता येईल.
थालीपिठ पण लावता येईल.
स्नेहा झुकिनी वापरता येईल
स्नेहा झुकिनी वापरता येईल नक्कि..
सुमेधाव्ही: थालीपिठ नाहि ग एवढे रुचकर लागणार ..तरि तु करून बघ प्रयत्न … यश आले कि कळव
मामी: ह्म्म्म मसला वापरुन बघेन आता..
सुनिधी: दुधी भोपळा बघ वापरून
सुनिधी: दुधी भोपळा बघ वापरून , कच्ची पपई ।म्हनजे अश्या भाज्या ज्या खाताना नाक वाकडा तिकडा होत ।ते बिनधास्त घालायचं ।
छान आहे. आता घरची घोसावळी
छान आहे. आता घरची घोसावळी येतीलच. मग करून बघीन.
मामी.........बादशहा वापरीन हं!
म्हनजे अश्या भाज्या ज्या
म्हनजे अश्या भाज्या ज्या खाताना नाक वाकडा तिकडा होत>>>>>>>>>
करून बघेन. हे रच्याकने म्हणजे
करून बघेन.
हे रच्याकने म्हणजे काय?
छान घोसाळयाचा असाही उपयोग छान
छान घोसाळयाचा असाही उपयोग छान आहे.
ह्म्म. ..चांगली वाट्तेय
ह्म्म. ..चांगली वाट्तेय रेसिपी
म्हनजे अश्या भाज्या ज्या खाताना नाक वाकडा तिकडा होत>>>>
पिन्की ८० - रच्याकने म्हणजे बाय द वे >> सरळ भाषांतर रस्त्या च्या कडेने
छान रेसिपी! करुन खाणार! मामे,
छान रेसिपी! करुन खाणार!
मामे, तू बादशाहवाल्यांची नुसती एजंटच नव्हे तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मेंबर वाटतीयेस!
ते काहीही असो एकदा बादशाह मसाला वापरुनच बघते!
धन्यवाद चनस, अस आके होय. मला
धन्यवाद चनस,
अस आके होय. मला इतके दिवस कोणाचा तरी आय डी वाटत होता.
बादशाह मिळत नाही हो इथे.
बादशाह मिळत नाही हो इथे. मिळेल तो वापरावा लागतो, कधी पाकिस्तानी कधी बांगलादेशी....
इथे एजन्सी मिळेल का?
रच्याकने म्हणजे मला इतके दिवस
रच्याकने म्हणजे मला इतके दिवस कोणाचा तरी आय डी वाटत होता. >>>> पिन्कि८०...
धन्यवाद मानुषी, वत्सला. (चला दोन गिर्हाईकं तर मिळाली! )
रच्याकने म्हणजे मला इतके दिवस
रच्याकने म्हणजे मला इतके दिवस कोणाचा तरी आय डी वाटत होता. >>>>
अरे वा... दूधी वा झुकिनी
अरे वा... दूधी वा झुकिनी पहाते वापरुन.