पाया सूप

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 July, 2013 - 05:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

बोकडाच्या पायाचे साफ केलेले तुकडे १५-२० (धुवून)
२ मध्यम आकाराचे कांदे चिरुन
१ लसुणाचा कांदा सोलून ठेचून.
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
८-१० काळी मिरी
५-६ दालचीनीचे छोटे तुकडे
३-४ तमालपत्र
चवीनुसार मिठग्ज
२ मोठे चमचे तेल
गरजेनुसार पाणी
(जास्त तिखट हवे असल्यास मसाला/लाल तिखट किंवा हिरवी मिरची व कोथिंबीर पेस्ट)

क्रमवार पाककृती: 

कुकरमध्ये तेल चांगले गरम करून त्यावर वरील गरम मसाले व लसुण टाकुन फोडणी द्या. त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर शिजवा. शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद व जर तिखट हवे असेल तर तिखट किंवा मिरची कोथिंबीर पेस्ट टाका. (मी टाकलेली नाही लहान मुलांना प्यायचे असल्याने.) पायाचे तुकडे टाका, मिठ टाका. सर्व ढवळून त्यावर गरजेनुसार पाणी घाला. कुकरचे झाकण बंद करुन पहिली शिट्टी आल्यावर गॅस मंद करुन साधारण पाऊण तास तरी शिजवत ठेवा. पाया शिजायला वेळ लागतो. म्हणून टोपात न शिजवता सरळ कुकरमध्येच शिजवा. शिट्टी गेल्यावर गरमागरमच सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी
अधिक टिपा: 

पाया साफ करण्याची पद्धत आहे. जर न साफ केलेले पाय आणले तर पायाचे केस ज्वाळेवर धरून जाळावे लागतात. फार कटकट असते त्यामुळे मटणवाल्याकडूनच हे सोलून घेतलेले चांगले. घरी जाणकार असतील तर घरी साफ करायला हरकत नाही.

हे सुप १ वर्षाच्या बाळापासुन सुद्धा देता येते. पण मग त्यात तिखट, मिरची घालू नये. ह्या भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.

हाड व त्यावरचे मांस चांगले मऊ शिजण्यासाठी व हाडाचा कस सूपात उतरण्यासाठी कुकरमध्ये सुद्धा शिजवायला पाऊण तास लागतो. असे मटण १५ मिनिटांत होते.

हे माझ्या पद्धतीने बनवलेले सूप आहे. अजून ह्यात कॉर्नफ्लॉवर व अन्य घटकही घट्ट होण्यासाठी घातले जातात.

माहितीचा स्रोत: 
वडील
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय पौष्टीक!
विशेषतः आजारातुन उठल्यावर आणि ऑपरेशननंतर हाडं लवकर जुळुन येण्यासाठी!

वॉव... पण आमच्याकडे कालवण च आवडीने खातात .. एकदा हे पण करुन पाहायला पाहिजे,,अर्थात मी नाही करणार.. . वासाचा प्रोब्लेम Sad
ह्या सुप मधे पण बुरुन बुडवुन खाण.. भारी लागेन Happy

आर्याताई +१०००००००००००००.. खुपच उपयुक्त Happy

पा कृ मस्तच !
इथे आमच्या मावळात एवढा पाउस चालू आहे , थंडी , ओल्यामुळे हात-पाय दुखणे चालू आहे ..त्यावर रामबान उपाय !

>>हे सूप उष्ण असते असे ऐकले आहे ??

उष्ण असते म्हणून उन्हाळ्यात नाही घेत जास्त पण थंडी आणि पावसात घ्यावेच. बाळंतीणींनाही हे देण्यात येते.

सृष्टी, यो, आर्या, अंकु, शाहीर धन्यवाद.

जबरीच!!!

हे फार उपयुक्तही असते.

पण १५ ते २० बोकडांचे पाय म्हणजे झाले काय नाही!!! पंगत उठायची Light 1

हो पौष्टीक असते. लेकीच्या ग्राऊंडवरची दादा मंडळी घेतात.

पण असे ऐकले आहे की २-३ तास शिजवायला लागतात. हे खेळाडू लोक त्यात फक्त मीठ घालून खातात. कन्सिस्टन्सी थोडी घट्टच असते.

मस्त.. पौष्टीक.. Happy
कोल्हापुर भागात मटण असेच शिजवुन घेतात, नंतर तांबड्या रस्स्यासाठी शिजवलेले मटण बाजुला काढुन राहिलेले "अळणी पाणी" हेच बेस असते.
लहान मुलांना हे पाणी चिमुटभर मीठ, हळद टाकुन उकळुन दिले जाते.. Happy

जागू मस्त दीसतंय पाया सूप! बाहेर पाऊस पडत असावा आणी रात्रीच्या जेवणाआधी गरमागरम पायासूप प्यावे....

फोटो बघून आणी टीपा वाचून घाबरायला नाही ना झालं कोणाला?

हैद्राबादला ऑफिसला जाताना एका चौकाजवळ काही टपर्‍या लागत. तिथे ढिगाने असे पाय सदृश्य काहीतरी भाजून ठेवलेले असायचे. जळका वास एकदम असह्य व्हायचा.
हे काय असावे याचे कुतुहल नेहमी असायचे, पण वासामुळे त्याजवळ जायची हिंमत कधीच झाली नाही.

आता कळले की ते हैद्राबादच्या प्रसिद्ध पाया सूपचे रॉ मटेरियल होते. Happy

जागू, तु टाकलियेस रेसिपी म्हणजे छानच असणार...

पण मी करुन बघणे आणि खाणे अशक्य... त्यामुळे यावेळेस माझा पास Happy

१५-२० बोकडाच्या पायाचे साफ केलेले तुकडे धुवून<<< हे मी बेडकाच्या पायाचे वाचले आधी Uhoh Lol

गेली २ वर्षे याबद्दल ऐकुन होतो. आता वाचुन काही चैन पडेना. सरळ जाउन पाया घेउन आलो. मस्त पैकी शिजतोय. अजुन ३० मि. शिजेल. Happy धन्यवाद.

जागूजी, सलाम, नेहमीप्रमाणेच.
घरीं रविवारीं 'पाया' आणायचं ठरलं असेल तर आमचा एक मित्र आठवडाभर दुसरं कांही बोलतच नसे !

babalax2.JPG

जिस्ने हैदराबादका पाया खाया, ओ जन्नतको पाया..
असल्या या चविष्ट रेस्पीवर हा अस्ला प्रतिसाद खरं तर नको.
पण हा लेख वाचाचः http://www.w.dainikaikya.com/esakal/20121104/5417109486138907342.htm
पाया सूप, अन त्याच्या पौष्टिकतेबद्दल नाही, तर वेगळ्याच बाबीबद्दल आहे..

मामी, मला झालं घाबरायला. मी शाकाहारी असले तरी जागूचे मासे बघायला तिच्या रेसिपींना आवर्जून भेट देते मी न घाबरता. कधी कधी रस्त्याच्या कडेला लागलेल्या गाड्यांवर पाया, वजडी/री अश्या पाट्या बघितल्या होत्या. पाया म्हणजे काय ते आज कळलं. वजडी म्हणजे काय ते अजून माहित नाही.

इब्लिस, ती लिंक वाचून कसंतरीच झालं खरं. पण नाचणी जशी आता आतापर्यंत डोंगरी भागातल्या लोकांमध्ये अन्नं म्हणून प्रिय होती आणि आता सगळेच जण पौष्टीक म्हणून नाचणीचे सत्व घ्या असं म्हणतात आणि मॉलपासून कोपर्‍यावरच्या वाण्यापर्यंत सगळीकडे ते मिळते. गरीबांचं अन्न म्हणून ते पौष्टीक असेल तर श्रीमंतांनी खाऊ नये असे नाही. अर्थात त्यामुळे त्याच्या किंमती वाढून ते गरीबांना परवडेनासं झालं तर प्रॉब्लेम आहेच. इकडे आड तिकडे विहीर आहे.

मामी, मी सुध्दा घाबरले कारण मी शाकाहारी असले तरी जागूचे मासे आवर्जून बघते...... पण काल घाई घाईत ते मी बेडकाच्या पायाचे वाचले आणि .....................:हाहा:

पायासूप - हे नाव ऐकलेलं आहे. कधी चाखलेलं नाही, मात्र.

अवांतर -
नाचणीतले गुणकारी घटक शरीरात सामावून घ्यायचे असतील तर काबाडकष्ट आणि अंगमेहनतीची दिनचर्या असावी लागते. नाहीतर नाचणीचा काहीच उपयोग होत नाही. (माहितीचा स्त्रोत - माझी पणजी.)

अश्विनी अग वजरी काय असत हे ऐकून अजुन घाबरशील Lol
सांगू का ? वजरी म्हणजे बोकडाची आतडी.
नुतन, स्निग्धा धन्स.

वजरी म्हणजे बोकडाची आतडी.>>>> भ्याआआआआ.

लले, मग आम्हाला चालेल नाचणी. ट्रेनमधले काबाडकष्ट पिळून काढतात. रोज नवी पिळवणूक. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे नाचणीतले घटक सामावून घेतले जातील Proud
सिरियसली, शेतातल्या आणि मजूरकामातल्या कष्टांची तुलना इतर कश्याशी होऊ शकत नाही. दोन्हीतला अनुभव वेगवेगळ्या दिवशी घेतला आहे. पुर्ण हवा गेल्यावर घड्याळ बघितलं तर दोनच तास काम केलं होतं. खरंच ह्या कष्टकर्‍यांना पौष्टिक आहार स्वस्तात मिळाला पाहिजे.

काल मस्त बेत जमला होता Wink

पाया करण्याचे फायदे:
१) मटणासारखं टेंन्शन नाही. (शिजेल का? ताजं असेल का? वगैरे)
२) वेलेची प्रचंड बचत. (आपल्या काम करण्याच्या)
३) डिश बिघडण्याची भिती नाही. Happy