लोण्याची पोळी

Submitted by मंजूताई on 30 July, 2013 - 01:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सात एक वर्षांपूर्वी मराठी संकेतसंस्थाळांशी ओळख झाली अन त्यावर वाचन... प्रतिसाद ...असे सुरु होते. काहीतरी लिहावेसे वाटू लागले. सोप्प्यापासून सुरुवात करावी व पाककृती लिहू शकू असे वाटले अन एक अगदी वेगळी व सुरुवात गोडाने करावी म्हणून 'लोण्याची पोळी' लिहिली अन कळले पाककृती लिहिण्यापेक्षा करणे सोपे आहे. तीन-तीनदा वाचून बघितली काही लिहायचे राहिले तर नाही ना... काही लिहिण्यात चूक तर झाली नाहिये ना .. अन भीतभीतच प्रकशित केली .... (१)लोणी विरघळणार नाही का? (२) पोळी शेकायची नाहिये तर विरघळायचा प्रश्नच नाही .... प्रतिसाद वाचून गंमत वाटली. पोळी ही शेकायचीच असते ..... हो, पण ते लिहायला हवे होते ना ....तर अशी ही माझी नेटावर लिहिलेली पहिली पाककृती. फोटोसहित नव्याने लिहिलेली खास मायबोलीकरांसाठी!

•पारीसाठी - कणिक, चवीला मीठ, मोहन
•सारण - एक वाटी लोणी, एक वाटी भाजलेली पीठी, दोन - चार वाट्या पीठी साखर

क्रमवार पाककृती: 

कणीक मोहन व मीठ घालून पोळ्याकरिता भिजवितो त्यापेक्षा थोडी घट्ट कणीक भिजवून घ्यावी. सारणाचे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यावे. कणकेच्या दीडपट ते दुप्पट सारण त्यात भरावे हलक्या हाताने पोळ्या लाटाव्या. तव्यावर मध्यम आचेवर शेकून घ्याव्या.
http://farm4.staticflickr.com/3703/9399334084_730d317e26_m.jpg"/

वाढणी/प्रमाण: 
साधारण २० पोळ्या होतात
अधिक टिपा: 

घरी केलेले लोणी फ्रीजमध्ये ठेवून त्यातले पाणी पिळून काढून टाकावे. साखर पुरण तयार होईल अश्या बेताने वाढवत जावी. २-३ दिवस टिकतात. आधी करून ठेवता येतात. मुलांना आवडतात.

माहितीचा स्रोत: 
मावशी
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद! आधी २ वाट्या घालावी. लागेल तशी (पुरणासारखा गोळा होईल इतपत) घालत जावी. लोण्यात असलेल्या पाण्याच्या अंशावर साखरेच प्रमाण बदलावं लागतं.

अंदाज नाही आला ग मंजूडे.>> दक्षिणा, लेखिका मंजू आहे, मंजूडी नाही Happy

मंजू, तुम्ही फोटोंची लिंक दिली आहे का?

मस्त दिसतायत लोण्याच्या पोळ्या.:स्मित:

मंजु एक शंका आहे. लोणी फ्रिझमधुन बाहेर काढल्यावर लगेच त्यात पि.साखर घालायची की ते रुम तापमानाला आल्यावर घालायची? कारण रुम तापमानाला ते मऊ होईल, मग साखर घातल्यावर पुरणासारखा गोळा होईल की थोडा चिकट असेल? सॉरी प्रश्न लांबवल्याबद्दल.

छानच प्रकार. बरेच कौशल्य पाहिजे याला. साधारण साखरेच्या मांड्यांसारखा प्रकार आहे पण जरा आवाक्यातला.

@ रश्मी - लोणी फ्रीजमधून काढल्यावर पिळून पाणी काढून टाकावे व रुम तापमानाला आल्यावर पिठी व साखर मिसळावी.
@दिनेश - कौशल्य आहे पण फार अवघड नाही. मांड्या सारखा हा प्रकार लागतो.
@ सई - फार अवघड नाही नक्की करुन पहा.

अरे मला पण मंजुडीच वाटले. नंतर पाहीले मंजू आहे. म वरुन मंजूडी असेल अशी घाई वाचायची सवय. Lol

रेसिपी एकदम तोपासु. नक्की करुन पाहणार.

pithi mhanaje kulithaache pith naa ?

Submitted by अविगा on 30 July, 2013 - 11:08

धन्यवाद! @ अविगा -तांदुळाची

मस्त आहे
कॅलरी मुळे पास
पण कधीतरी कोणी करून दिली तर छोटी पाऊलपोळी खाईन ☺️☺️☺️ सध्या फक्त फुकटचा भाव खाते.

Pages