पनीर कटलेट

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2013 - 03:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२०० ग्रॅम पनिर कुस्करून
२ मध्यम आकाराचे कांदे चिरुन
१ गाजर किसून
१ वाटी बारीक चिरलेला कोबी
२ बटाटे उकडून कुस्करून.
१ चमचा आल लसुण पेस्ट
१ चमचा मिरची-कोथिंबीर पेस्ट
२ मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर
गरजे नुसार मिठ
पाव ते अर्धा वाटी तेल
चाट मसाला

क्रमवार पाककृती: 

१) भांड्यात तेल गरम करुन त्यावर चिरलेला कांदा घाला.
२) कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजला की त्यावर आल-लसुण पेस्ट व मिरची कोथिंबीर पेस्ट घालून ढवळा.
३) वरील मिश्रणावर कोबी, गाजर घालून २-३ मिनिटेच परतवत शिजवा. चायनीज पदार्थांसारखेच जास्त शि़जू देऊ नका.

४) आता कुस्करलेले बटाटे, मिठ घालून पुन्हा चांगले ढवळून लगेच गॅस बंद करा.

५) हे मिश्रण एका ताटात पसरवा व जरा थंड होऊ द्या.

६) मिश्रण थंड झाले की त्यात पनिर व कॉर्नफ्लॉवर टाकून मिश्रण एकजीव करा.

७) आता तुम्हाला हव्या त्या आकाराचे कटलेट करा. व नॉनस्टीक पॅनवर जरासेच तेल घालून शॅलो फ्राय करुन घ्या. दोन्ही बाजू मध्यम आचेवर साधारण ५-६ मिनीटे शिजवा.

८) कटलेट तयार झाले की गरम असतानाच त्यावर चाट मसाला भुरभुरवा नुसते किंवा सॉस किंवा पुदीना चटणी बरोबर ह्याचा आस्वाद घ्या. Happy

वाढणी/प्रमाण: 
४-५ लोकांसाठी
अधिक टिपा: 

*ह्या कटलेटमध्ये इतर कोणतेही मसाले न वापरल्याने पनिर व भाज्यांचा अस्सल स्वाद येतो.
*लहान मुलांना तर खुपच आवडतात. शिवाय कोबी सारखी भाजी खाल्ली जाते.
*ह्यात अजुन कांद्याची पात, किंवा आपल्या आवडीच्या भाज्या थोड्या प्रमाणावर घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
पुस्तकी ज्ञान
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Actully घरी होममेड पनीर होते, पण मागे एकदा स्वडोक्याने पनीर बुर्जी करण्याच्या प्रयत्नात पनीर पिठले झाले होते,म्हणून आता मुद्द्यांम रेसिपी शोधून कटलेट केले,उत्कृष्ट झाले
मी फ्राय करताना ब्रेड क्रम्प वापरले

Pages