यू आर रिजेक्टेड

Submitted by बेफ़िकीर on 21 July, 2013 - 06:12

एन आय आय टी या संस्थेत मी गेले तीनएक महिने काम करत आहे. आय टी क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असे लहानमोठे कोर्सेस या संस्थेत असतात हे बहुश्रुत आहे. याच कामाचा एक भाग म्हणून नुकतेच एक जॉब फेअर आयोजीत करण्यात आले होते, ज्यात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी आपापले अधिकारी पाठवले होते व अडीच हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांनी तेथे मुलाखती दिल्या. संपूर्ण कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणावर, अतिशय प्रभावी व उत्तम झाला. मी उपस्थित असलेल्या मजल्यावर एका कंपनीच्या मुलाखतीसाठी इतकी गर्दी उसळली की मी त्या कंपनीच्या अधिकार्‍यांना 'काही मुलाखती मीच घेऊन आपणास मदत करू का' असे विचारले. मला परवानगी मिळाली व इंग्रजी संवादकौशल्य या सदरातील काही मुलाखती मी घेतल्या. त्या घेत असताना मला आलेला अनुभव येथे मायबोलीकरांना सांगावासा वाटत होता. तो अनुभव मनाला भिडला व बोचलाही.

================

आलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थी पुणे, मुंबई, नाशिक व औरंगाबाद येथील रहिवासी होते. मात्र साधारण तीस टक्के विद्यार्थी हे बुलढाणा, सातारा, सांगली, अकोला, अमरावती, परभणी, लातुर अश्या ठिकाणांहून आलेले होते. हे किंचित अर्धविकसित विभागातील विद्यार्थी नुसते पाहूनही ओळखता येत होते. त्यांची मुलाखतीसाठी योग्य असे कपडे परिधान करण्याची जाण व आर्थिक क्षमता कमी असल्याचे लांबूनच जाणवत होते. या शिवाय चेहर्‍यावर एक प्रकारचे बुजलेपण होते. का कोणास ठाऊक, पण उगाचच एक लाचारीही होती व हा मला झालेला 'भास' नक्कीच नव्हे. दाढीचे खुंट वाढलेले विद्यार्थी व कॅज्युअल वेअरमध्ये असलेल्या विद्यार्थिनी तर प्रगत शहरातूनही आलेल्या होत्या, पण या अर्धविकसित भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा पोषाख, अ‍ॅक्सेसरीज, हेअर स्टाईल हे सर्वच तुलनेने 'साधेपणाचे' होते, 'स्वस्त' नव्हते.

यांच्यापैकी कोणाचा नंबर आला की त्यांची मुलाखत मी घेऊ लागायचो. तेव्हा जाणवायचे की त्यांच्या उभे राहण्यातही एक प्रकारची अजीजी होती. वरवर वाचायला हे खरंच भास वाटू शकतील, तेव्हा ज्या वाचकांना माझ्या गृहितकांबाबतच शंका आहे त्यांच्या मताचा आदर आहेच. पण निदान मी तरी प्रामाणिकपणे जे जाणवले ते लिहीत आहे. अर्थातच अश्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व खूपच कमी होते. त्याला 'प्रभुत्व' म्हणता येणारच नाही. ठराविक काही वाक्ये ते अगदी सलगपणे उच्चारू शकत होते याचा अर्थ तितकीच वाक्ये ते पाठ करून आलेले असावेत. त्या सर्वांच्या डोळ्यात 'नुसते माझ्या सहीवर बरेच काही अवलंबून असल्यासारखे' भाव होते. काहीजणांना तर मुलाखत केव्हा एकदा संपते आणि केव्हा एकदा आपण 'नेहमीप्रमाणे' रिजेक्ट होऊन येथून बाहेर पडतो असे झालेले असावे. यालाही कारण होते ते म्हणजे आजूबाजूला विकसित शहरांमधील जे विद्यार्थी वावरत होते त्यांच्या आत्मविश्वासयुक्त देहबोलीसमोर आपला निभाव लागणे शक्यच नाही याची या विद्यार्थ्यांना केव्हाच जाणीव झालेली होती.

यातील अनेकांना वडील नव्हते, अनेकांचे वडील शेतकरी होते किंवा गॅरेजवर कामाला होते. अनेकांनी निव्वळ नोकरीसाठी पुण्याचा रस्ता धरलेला होता पण पुण्यात वावरण्याचा आत्मविश्वास मात्र त्यांच्यापासून खूपच दूर होता. अनेकांवर लहान भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी होती. जवळपास सर्वांनीच 'छंद' या सदरात 'लिसनिंग टू म्यूझिक' आणि 'रीडिंग' असे लिहिलेले होते. मात्र कोणते म्यूझिक आणि कसले रीडिंग याची उत्तरे त्यांना देता येत नव्हती.

दुसर्‍या बाजूला फाडफाड बोलणारी मुले मुली एकमेकांना खाणाखुण करून हासत होती. त्यांचे पेहराव ग्रामीण युवक - युवतींना बावचळवणारे होते. त्यांचा वावर 'अ‍ॅट होम' होता. मुख्य म्हणजे 'नोकरी' ही त्यांची 'त्वरीत असलेली गरज' नव्हतीच, हे मला संभाषणातून सहज समजत होते.

एकुण वाईट वाटले.

संधी उपलब्ध असण्यात दरी होती. संधी उपलब्ध झाल्यानंतर आत्मविश्वासाच्या प्रमाणात तफावत होती. नोकरीची आवश्यकता ज्याला अधिक होती तो रिजेक्ट केला जात होता. ज्याला ती गरज कमी होती त्याला मुलाखतीच्या पुढच्या पायरीसाठी पाचारण करण्यात येत होते.

बिचार्‍या ग्रामीण विभागातील मुलांच्या डोळ्यात स्वप्ने दिसत होती. 'दोन तीन मिनिटे तर यांच्याशी बोलायचे, यांनी पास केले की मग थेट टेक्निकल मुलाखत, ज्यात आपण नक्की पास होऊ' अशी आशा दिसत होती. पण मला माहीत असलेल्या निकषांनुसार त्यांचे संवादकौशल्य तपासताना त्यांना रिजेक्ट करावे लागणे हे माझे तत्क्षणी कर्तव्य होते. एका वर्तुळात 'आर' लिहून त्यांचा बायोडेटा गठ्ठ्यात मागे सरकवताना आणि त्यांना 'ऑल द बेस्ट' असे 'खोटेच' हसून म्हणताना माझ्यातील कोणीतरी एक स्वतःच निराश होत चालला होता. चेहर्‍यावर व्यावसायिकतेचा मुखवटा मिरवणे भाग होते. मी त्यांना 'ओके, झाली मुलाखत' असे सांगितल्यावर ती मुले अजीजीने मान तुकवून 'थँक यू' म्हणून निघताना आशेने क्षणभर माझ्या डोळ्यांशी डोळे भिडवत होती. जणू त्यांना म्हणायचे असावे की 'आम्हाला फक्त हा इंग्लिशचाच एक प्रॉब्लेम आहे, तेवढा कराल ना दुर्लक्षित'!

आईच्ची जय त्या शिक्षणाच्या आणि विषमतेच्या! माझ्या मनावर गेले दोन दिवस जो परिणाम झाला तो कोणाला धड सांगताही येत नव्हता, माझीच थट्टा व्हायची असे वाटून! शेवटी मी माझ्या जगात पोचलो आणि प्रगत शहराचा एक भाग होऊन कंफर्टेबल झालो. आता असे वाटते साले आपल्याला देवाने इतके नशीबवान बनवले पण आपण त्या नशिबवान आयुष्याचे काय मातेरे करत आहोत?

माफ करा, विचार प्रकट करताना वाहवत गेलो, पण नेहमीप्रमाणेच हा लेखही जसा सुचला तसा एका बैठकीतच लिहून मोकळा झाल्याचे समाधान मनाला आहे.

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वरूप तात्या,
तुम्ही म्हटलात, त्याला 'घेट्टो मेंटॅलिटी' असं म्हणतात. आपल्या ओळखीच्या वातावरणाचा बुडबुडा सोबत नेण्याचा प्रयत्न प्रत्येकच प्राणी करत असतो. तुमचे निरिक्षण बरोबर आहे. याबद्दलच्या चर्चा इथे होऊन गेल्या आहेत, सापडली की लिंक देतो.
*
हे भारतीय इंग्लिश शिकविण्याबद्दलः
बझफीड.कॉम वरून साभार.

इब्लिस Happy

स्वरूप - बरोबर निरीक्षण आहे. मीही हे पाहिले आहे. थोडेफार हे सर्वच जण सुरूवातीला करतात, पण बरेच लोक यातून लौकर बाहेर पडतात व नवीन वातावरणात मिक्स होतात.

अशा 'घेटो' ग्रूप्स मधे एखादा वेगळे काही करायला लागला तर त्याची टरही खूप उडवली जाते. इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करणार्‍याला असल्या काही खतरनाक कॉमेण्ट्स मारल्या जातात की तो पुन्हा त्या वाटेला जाणार नाही Happy "अंग्रेज गये अपनी औलाद छोड गये" ही त्यातली बहुधा सर्वात सात्विक कॉमेंट असावी Happy

वा स्वरूप वा !!!
असे का होते बद्दल जे निरीक्षण आपण दिलेत त्याला तोड नाही !!!!!

सलाम ह्या मुद्द्यासाठी,,,,,,,,,_/\_

अवांतर : अश्यावेळी त्याच क्षेत्रातला चांगला सिनिअर मिळणे फार गरजेचे असते.... आपल्याला पुढे जाउन काय करायचेय, त्या क्षेत्रातली आव्हाने काय आहेत... आपण कश्यात कमी पडतोय हे कळायला आणि वळायलासुद्धा लागते <<<<<<<

माझा एक शेर आठवला.....

जायचे असते कुठे माहीत आहेका तुला
जो 'पुढे' भेटेल त्याला हे विचारूया चला

अवांतराबद्दल क्षमस्व!!!

स्वरुप :- +१००००. मनातलं लिहिलय.... पुण्या-मुंबईतच काय परदेशातही अशी मंडळी बघतोय. Happy

इब्लिसः- इंग्रजी शिकण्याची जाहिरात किमान अर्ध्या इंग्रजीततरी आहे. उत्तर प्रदेश/ बिहार कडे जाहिरात पूर्ण हिंदीत (तेही चुकिच्या)....

http://www.youtube.com/watch?v=0j0LDVvxnOA

अगदी मला बरेलीची आठवण आली... Lol

अरें पण घोळ नुसता आपलाच नाही तर खुद्द ' गोर्‍या' लोकांचाही होतो. नुसतीच भाषा नव्हे तर 'संवाद' महत्त्वाचा.

माझा 'सान फ्रान्सिस्को' विमानतळावरचा अनुभव. आमच्या उशीर झालेल्या फ्लईट्ची वाट पाहतांना झालेली (तिथल्या 'अँमँरिकन' ललनेने त्यांच्या अगम्य आंग्ल बोलीत केलेली) घोषणा माझ्या सोबत असलेल्या 'ब्रिटीश' पाहुण्यांन्ना 'ओ का ठो' कळली नाही. मला केवळ पुर्वानुभवाने त्यामधील दोन ते तीन शब्दांचा मेळ घातल्यावर ती आमचीच फ्लाईट अस्ल्याचे कळले. व त्यांना सांगितले. त्यांचा सुरूवातीस विश्वास नाहि बसला पण ते खरे आहे हे कळ्ल्यावर माझ्याकडे 'मिशिलपणे' पाहून मान डोलावली.

मी हा प्रसंग एन्जॉय केला. (खुदुखुदु हसून!)

तिथे मला तरि ह्या 'स्टाइल' ने बराच फायदा झाला.अर्थात नेहेमीच नव्हे!
माझं सुरुवातीचं 'मराठी' बाण्याचं ईंग्रजी नंतर नंतर 'निरिक्षणाने' व सरावाने बर्‍यापँकी र्अमेरिकन कर्ण्याचा प्रयत्न केला.
बाय द वे तुम्हांला 'ईंग्लीश' शिकायचे कि 'अमेरिकन' ते आधी ठरवावे लागते! अर्थात तुम्हास 'ईंग्लंडास' वा 'अमेरिकास' जावयाचे त्यावर अवलंबून!

वैवकुला नेहमी स्वतःचाच एक शेर आठवतो ...कधीतरी गालिबवर दया करा

<<<<<<

अहो अँटीमॅटर माझा उर्दू शायरीचा अभ्यास नाही त्यामुळे हे गालिब मीर याना मी फक्त नावाने ओळखतो.
बाकी मला माझे तेच शेर न चुकता देतो जे चुकून आठवतात कारण ते चुकूनच माझ्या लक्षात राहिलेले असतात इतकेच

....इतर कुणाचे शेर चुकून आठवलेच तर मी तेही न चुकता देत असतोच Happy

विजय देशमुख जी,
अनू'ज ANU'S ऐवजी अ‍ॅनस ANUS अशी गम्मत तिथे झालेली तुम्हाला लक्षात आली नाही का? Proud

इब्लिस (जी नकोच हो:) )
हे लक्षातच आलं नाही... Lol

एक ऐकीव किस्सा :-
ऑस्ट्रेलिअन लोकं ay चा उच्चार ai असा करतात, त्यामुळे,
"Did you come here today?"
असं विचारायचं तर ते
Did you come here todai (to die?) असं ऐकु येतं.

Lol

Pages