१/२ वाटी रवा
१ वाटी भिजवलेले मूग
१/२ वाटी खवलेले नारळ
१/२ वाटी चिरलेला गूळ
१/४ चमचा सुंठ पावडर
२ हिरवे वेलदोडे
४ चमचे साजूक तूप
तळण्यासाठी तेल.
रवा आणि २ चमचे तुप एकत्र करून घ्या. थोडे-थोडे पाणी घालत रवा सैलसर भिजवा [साधारण करंजीसारखा]. रवा १/२ तास भिजत ठेवायचा आहे.
मधल्या वेळात सारण करायला घ्या.
भिजवलेल्या मुगातले सगळे पाणी काढून टाकून कुकरमध्ये २ शिट्ट्या घ्या. भांड्यात २ चमचे तूप घ्या, थोडेसे गरम झाले की त्यात वाफवलेले मूग आणि गुळ घाला. गुळ वितळला की लगेच नारळ, सुंठ पावडर आणि वेलदोड्याचे दाणे घाला. डावाने हलवत रहा. हे मिश्रण मिळून आले की गॅस बंद करून गार करायला ठेवा. गार झाल्यावर त्याचे छोटे-छोटे लाडू वळा.
रवा अगदी बारिक नसेल तर भिजलेला रव्याचा गोळा फुडप्रोसेसर मध्ये थोडा फिरवून घ्या. छान मऊ होतो. त्याच्या छोट्या-छोट्या लाट्या करा. पुरी लाटून त्यावर मुगाचा लाडू ठेवा, सगळ्या बाजूने बंद करा. कढईत तेल तापवून मंद आचेवर तळा.
१. मूग नुसते वाफवायाचे आहेत, शिजवायचे नाहीत. त्यामुळे २ च शिट्ट्या घ्या.
२. वडे खुसखुशीत हवे असतील तर मंद आचेवरच तळा.
३. वर दिलेल्या प्रमाणात ६ वडे होतात.
४. वेलदोड्याची पावडर पण चालेल, पण दाणे घातले की जास्त चांगला स्वाद उतरतो असा माझा अनुभव आहे.
५. मूळ पाककृतीत वेलदोड्याची पावडर वापरली आहे. रव्या ऐवजी मैदा वापरला आहे. भज्याच्या पिठासारखा मैदा भिजवून त्यात मुगाचे गोळे बुडवून तळले आहे. मला मैदा वापरायचा नव्हता म्हणून मी बदल केला. [एकदा अवन मध्ये बेक करून बघणार आहे. बेक करून, थोडे उकलून मधोमध तुपाची धार सोडून खायला जास्त मजा येईल असे खाताना जाणवले. ]
६. या पदार्थाच्या नावाचा नक्की उच्चार काय आहे हे आठवत नाही / माहिती नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी मैत्रीणीच्या डब्यात खाल्ले होते. आता करताना प्रमाण आंतरजालावरून घेतले.
छान दिसताहेत!
छान दिसताहेत!
छान दिसताहेत. वेगळीच पाकृ
छान दिसताहेत. वेगळीच पाकृ आहे. कोणी केलेले मी खाल्ले आणि मला आवडले तर मी करेन.
आरतीची ठाणेभेट कधी आहे?
छान दिसताहेत. वेगळीच पाकृ
छान दिसताहेत. वेगळीच पाकृ आहे. कोणी केलेले मी खाल्ले आणि मला आवडले तर मी करेन......................ही आयडीया मस्तय!
अंजली, मंजूडी
अंजली, मंजूडी धन्यवाद.
मंजूडी, कोणी येणारे भेटले तर पाठवते २ तुला
अगदी सुबक, गोल गुटगुटीत
अगदी सुबक, गोल गुटगुटीत दिसतायत या सुखियां
खल्लाय हा प्रकार मैत्रिणीकडे.
चांगला लागला पण करुन बघेन की नाही माहित नाही कारण घरी कुणाला आवडणार नाही याची गॅरेंटी आहे
यम्मी!
यम्मी!
फोटो सुरेख दिसतो आहे अगदी !
फोटो सुरेख दिसतो आहे अगदी !
नक्की करुन पाहण्यात येइन,..
नक्की करुन पाहण्यात येइन,.. मुग आनि गोड काहीतरी वेगळ लागेन कॉम्बो..
मस्त दिसतायत मुगडाळ
मस्त दिसतायत मुगडाळ कचोरीसारखे दिसतायत थोडे.
मलाही आवडेल की नाही शंका
मलाही आवडेल की नाही शंका आहे
अनू, तू करशील तेंव्हा मला बोलव
मुगडाळ कचोरीसारखे दिसतायत
मुगडाळ कचोरीसारखे दिसतायत थोडे. >> अख्ख्या मुगाची कचोरी, हि.मी ऐवजी गुळ.
मलाही आवडेल की नाही शंका आहे >> रवा, नारळ, गुळ असल्याने थोडे तळणीच्या मोदकांसारखे लागतात.
मी हे तिखट करीन.
मी हे तिखट करीन.