शाही आमलेट

Submitted by संगीता वैद्य on 12 July, 2013 - 04:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ अंडी , ३ कांदे, २ टोमटो , हळद, तीखट, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर,फोडणी साठी तेल २ चमचे मोठे, लींबु

क्रमवार पाककृती: 

पसरट पॅन मध्ये तेल टाका मग कांदा आणी टोमॅटो बारीक चीरुन टाकणे, मीठ, हळद , तीखट ,गरम मसाला (अंदाजाप्रमाणे) टाकुन २ मीनीट झाकुन अर्धवट शीजुन घेणे. एका बाजुला एका भाड्यात अलगद ४ अंडी फोडुन ठेवावी व आतले पीवळे बलक गोल राहील आणी मीक्स नाही होणार याची काळजी घ्यावी. झाकण काढून सगळा मसाला गोलाकार आकारात पसरुन घेणे मग चमच्याने चार बाजुला चार मोकळी जागा करुन कींवा होल करुन पीवळे चारही बलक त्यात सोडावे (जेवढी अंडी असतील तेवढ्या जागा) आणि राहीलेला सगळा पांढरा बलक वरुन मसाल्यावर पसरुन टाकणे आणी वर कोथिंबीर बारीक चीरुन टाकावी , पॅन वर २ मीनट झाकण ठेवावे. पीवळा बलक शीजला की गॅस बंद. ईथे एक काळजी घ्यावयाची ती म्हणजे पॅन म्ध्ये एकदा पसरुन टाकलेला मसाला ऊलथावयाचा नाही. वाढताना चमच्याने पॅन मध्येच चार भाग करुन वाढावे. सोबत लींबु देणे.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच... Happy

एक प्रश्नः तुम्हाला तुमचं नाव मृदुला असं लिहायचंय का? अवांतर आहे पण रहावलं नाही म्हणून विचारंल, नको असेल तर संपादन करीन...

wow! nice