BMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन - उपसंहार

Submitted by असामी on 9 July, 2013 - 09:22

BMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनातील अनुभवांवार आधारीत feedback/सूचनांसाठी धागा.

हा धागा पुढच्या संयोजकांना एकत्र सगळ्या सूचना बघता याव्यात ह्या हेतूने उघडला आहे. तुमच्या इतरत्र विखुरलेल्या सूचना इथे एकत्र केल्या तर सोपे होईल.

मी गेल्या एक दोन दिवसांमधील सूचना पुढच्या पोस्टमधे एकत्र करतोय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती_दांडेकर:

पुढील अधिवेशनासाठी सूचना:
१. वाट पहात असताना बसायला जागा असती तर काही लोकांना त्रास कमी झाला असता. तशा प्रकारची जागा फक्त जेवणाच्या हॉलमधे होती. पण तो बंद होता.
२. स्टॉलच्या आसपास बसायला काय उभे रहायलाही जागा नव्हती. स्टॉल मोकळ्या जागेत ठेवावेत. शिकागोला जेवणाच्या हॉल मधेच होते.
३. कार्यक्रमाला उशीर होत असल्याची माहिती कन्व्हेनशन सेंटरमधे दिली नव्हती. डंकिन सेंटर थोडे लांब असल्याने पुन्हा पुन्हा जायला यायला ज्ये. ना. तयार नव्हते. काही वेळा असा उशीर अपरिहार्य असतो, तेव्हा तशी सूचना ठिकठिकाणी द्यावी व दुसरीकडे बसण्याची अथवा वेळ घालवण्याची सोय करावी.

-------------------------------------------------------------------------------------------------
गोष्टीगावाचे :

रात्रीच्या कार्यक्रमाचा हा एक Problem असतो की त्याला Ending Time ठरलेला असतो.
१२ नंतर बर्‍याच ठिकाणी कार्यक्रम करू दिले जात नाहीत, आणि आलेल्या मधे ६०/६५ टक्के जे. ना. असल्याने ते १०/११ नंतर बसू इच्छित नाहीत. तरूणांनाही दिवसभर कार्यक्रम बघून थकवा असतोच.

त्यामुळे १२ ला संपणारा कार्यक्रम ९ ला चालू होणार की १० ला ह्यात खूप फरक पडतो(च). हे लक्षात घेऊन Grid मधे थोडी जागा ठेवावी.
आणि दिवसभराच्या कोणत्याही कार्यक्रमाला जरासा उशीर झाला तर त्याचा Domino Effect रात्रीच्या शेवटच्या कार्यक्रमावर होतोच.

-------------------------------------------------------------------------------------------------
पराग, नंद्या, लालू, सायो :

पदार्थांची नावं दोन्ही भाषेत हवी होती.

-------------------------------------------------------------------------------------------------

जेवणाच्या कंत्राटदाराला नीट समज द्यावी.
१. भाज्या, आमट्या, पोळ्या, कोंबडी-वडे इत्यादी पदार्थ गरम वाढले तरच खाल्ले जातात.
२. Food Commitee ने जेवणाच्या चवी विषयी चोख रहायला हवं...
३. ज्या गोष्टी करणे शक्य नसेल त्या करू नयेत. (कोंबडी-वडे गरम वाढणे शक्य नसेल तर कोंबडी-वडे करू नयेत.. ) जे द्याल ते चांगलं हवं.

असामी, धागा काढायची कल्पना आवडली.

गोगा, बाकी मान्यच, पण
>> २. Food Commitee ने जेवणाच्या चवी विषयी चोख रहायला हवं
म्हणजे नक्की काय?
म्हणजे आपण आधी त्या केटररकडची चव चाखून पाहिली असेल तरी ऐनवेळी अमुक पदार्थ कसा होईल यावर फूड कमिटीने कसं लक्ष ठेवावं? नाही मनासारखा झाला तर इतक्या मोठ्या प्रमाणावर केलेला पदार्थ टाकून द्यायचा का?
मला अशा संयोजनाचा अनुभव नाही म्हणून विचारते आहे.

मला वाटतं त्याला आधी तशी समज द्यावी. ऐनवेळी तो घात करू शकतो हे खरं आहे.. आणि जेवण टाकून दिलं तर लोकांना खायला काय देणार हेही आहेच.

पण याच कंत्राटदाराने यापूर्वी दोन सम्मेलनं फक्त जेवणावर गाजवली होती.
त्यावेळच्या कमिटीने त्याला कसा पटवला/मनवला/धमकावला वगैरे माहीती घेतली तर त्याचा उपयोग होईल. निदान Quality वर बर्‍याच लोकांचं नीट लक्ष आहे हे जरी त्याला कळलं तर सुधारणा होऊ शकेल, असं मला वाटतं..
(एका जेवणात बासुंदी फेकून द्यावी लागली. पण ते कदाचित शीत्-साठवणीचा Problem असू शकेल).

चांगला धागा असामी! कुठल्याही देशातील अशा प्रकारच्या संमेलनाला इथल्या सुचना ढोबळ मानाने लागु होऊ शकतात.
केटररने वेळेवर दगा दिला तर संयोजन कमिटी वेळेवर काहीही करु शकत नाही हे अगदी जवळून बघितले आहे. यासाठी गोगांनी म्हटलय तसं केटररला धमकावणं/मनवणं करण्यातच समितीचे कौशल्य पणाला लागते!
मुळात अति-पदार्थ ठेवुच नयेत. हल्ली सगळीकडे सगळेच पदार्थ मिळतात. परदेशात असलो तरी भारतात बनवतो ते सगळेच पदार्थ आपण घरी करतोच. मग अशा मोठ्या संमेलनात भरगच्च जेवण कशासाठी हवे?
तसेच मराठी मेन्यु असला तर मराठी केटररला प्राधान्य दिल्यास बरे पडेल.

हेच कार्यक्रमांच्या बाबतीत. २-३ दिवसांत किती कार्यक्रम बघायचे? १-२, चांगली दर्जेदार नाटकं, युवा पिढीचा सहभाग असेल असे २-३ कार्यक्रम, १-२ गाण्याचे उत्कृष्ट कार्यक्रम. एखादे चर्चासत्र. अमेरिकेतले माहिती नाही पण इथे बघितले आहे की सगळ्यांनाच संमेलनात काहीतरी सादर करायचे असते! लहान मुलांच्या कार्यक्रमाचीही रेलचेल असते. कशाला हा अट्टाहास? स्थानिक मराठी/महाराष्ट्र मंडळांत कार्यक्रम सादर करता येतात की! नटरंग सिनेमा आला तेव्हा बर्‍याच ठिकाणी विविध वयोगटांनी बारा वाजवल्याचे आठवते!

माझ्यासारखे प्रेक्षक फक्त दर्जेदार कार्यक्रमांची अपेक्षा, साधेसे रुचकर जेवण आणि भेटीगाठी एव्हढ्याकरताच अशा संमेलनांना जाणे पसंत करतात. मराठी संस्कृतीचा 'एक्स्ट्रावॅगन्झा' बघायची अजिबात इच्छा नसते!

मस्त पोस्ट वत्सला. आमच्याकडे असे कलाकार आणून संमेलन करणं अजूनतरी कठीणच आहे. पण पुढे मागे असं काही केल्यास सूचनांचा फायदा होईल. Happy

मस्त पोस्ट वत्सला. >> +१
quantity पेक्षा quality ला महत्व द्यावे.
ऐनवेळी केटररच काय कलाकार लोक पण जाणुन बुजुन दगा दिल्याचा अनुभव आहे. त्यामुळे प्लॅन बी पण तयार ठेवावा.

अरे, अजून अधिवेशन भरवणारे, तिथे काम करणारे या सर्व लोकांचे अभिनंदन, आभार कसे कुणि मानले नाहीत? फार मोठे काम असते ते. एकंदरीत गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ चालू असलेली ही अधिवेशने पुष्कळ यशस्वी झाली आहेत.
एका जनरलने म्हंटल्याप्रमाणे - All the best laid plans of war are out of the window, as soon as the first bullet is fired!

त्यामुळे कितीहि तयारी केली तरी आयत्या वेळी बारीक सारीक त्रुटी रहाणारच.

मराठी संस्कृतीचा 'एक्स्ट्रावॅगन्झा' बघायची अजिबात इच्छा नसते!

अहो तशी संस्कृति आजकाल फक्त अमेरिकेतच दिसते. महाराष्ट्रात गेला आहात का गेल्या पाच वर्षात?

माझ्यासारखे प्रेक्षक फक्त दर्जेदार कार्यक्रमांची अपेक्षा, साधेसे रुचकर जेवण आणि भेटीगाठी एव्हढ्याकरताच अशा संमेलनांना जाणे पसंत करतात.

बरोबर आहे. पण सगळ्यानी सगळे कार्यक्रम बघितलेच पाहिजेत असे कुठे आहे?
भरपूर कार्यक्रम असले म्हणजे ज्याला जे बघायचे ते बघता येईल.

स्नेह्यांशी भेटी गाठी गप्पा यासाठी खरे तर एक सबंध दुपार मोकळी ठेवावी. किंवा मधून मधून ठरवलेल्या वेळी एक तास. म्हणजे येणारे लोक तसे ठरवून येतील. नि खायला प्यायला फक्त साधे पेय, नि चिवडा किंवा चिप्स.

भारतातून आलेल्या, बोलावलेल्या पाहुण्यांकडून त्यांचे मत काय हे जाणून घेणे आवश्यक आहे. मागल्या कार्यक्रमाचे वेळी कुणितरी रागावले होते म्हणे. हे चांगले नाही.

भरपूर कार्यक्रम असले म्हणजे ज्याला जे बघायचे ते बघता येईल << पटले..
दोन वर्षातून एकदा सम्मेलन होणार.. त्यात भरपूर कार्यक्रम असावेत, आणि ते दर्जेदार असावेत. त्यातून ओळखी होतात. तुमचा कार्यक्रम चांगला वाटला/आवडला तर अजून ठिकाणी करण्यासाठी आमंत्रणं मिळतात. तीन/चार मोजकेच कार्यक्रम ठेवले की ठराविक लोकांचे ठराविक कार्यक्रम होतील.

साधेसे रुचकर जेवण आणि भेटीगाठी <<< फक्त वेगवेगळ्या प्रकारचं रूचकर जेवण यासाठी पण येणारे असतात.
सम्मेलन करणे ही तारेवरची कसरत आहे. बहुजनांच्या आवडीनिवडी लक्षात घ्याव्या लागतात. आणि म्हणूनच ७०/८० % जरी नीट झालं तरी करणार्‍यांना शाबासकी द्यावी.
बोस्टनकरांचे शतशः आभार.. एवढं चांगलं सम्मेलन केल्याबद्दल.

>>
सम्मेलन करणे ही तारेवरची कसरत आहे. बहुजनांच्या आवडीनिवडी लक्षात घ्याव्या लागतात. आणि म्हणूनच ७०/८० % जरी नीट झालं तरी करणार्‍यांना शाबासकी द्यावी.
बोस्टनकरांचे शतशः आभार.. एवढं चांगलं सम्मेलन केल्याबद्दल.
<<
शाब्बास! Happy

साध्या गावातल्या मराठी मंडळाचे कार्यक्रम आयोजित करताना काय फे फे उडते ते कमीटीवर असल्याने अनुभवलं आहे. ३५०० लोकांसाठी कार्यक्रम, जेवणाची व्यवस्था इत्यादी करणे किती कसरतीचे काम आहे ते कळू शकते. अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल अभिनंदन. या अधिवेशनाचे आणि मागील २०११ च्या शिकागो अधिवेशनाचे वैशिष्ठ्य म्हणजे कुठेही चमकोगिरी नव्हती. मटा किंवा सकाळमध्येही पहिल्या पानावर बातमी नव्हती आणि त्यानिमीत्ताने होणारे वाद नव्हते. याबद्दल कार्यकारिणीचे खास अभिनंदन.

हे अगदी खरे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी, जेवण खाणे उत्तम होते. सजावट, मांडणी सुरेख होती. व्यवस्थापन करणारे एवढे सगळे संयोजक लगबगीने, हसतमुखाने काम करीत होते. पहिल्या दिवसाचे संयोजन अगदी चोख होते. ज्यांची मुले आली होती, ती मुलेही मजेत होती. होटेल सगळी जवळ असल्याने चालत जाता येत होते. ज्ये. ना. ची टेबले खाण्याच्या जवळ लावली होती. चहा कॉफीची दिवसभर सोय होती. या सर्व व्यवस्थेबद्दल न्यु इंग्लंड मराठी मंडळाचे आभार व अभिनंदन!

सर्व १६ अधिवेशनांना उपस्थित असलेल्या २ व्यक्तींपैकी मी एक आहे आणि त्या अनुभवावरून माझे विचार मांडत आहे. सर्वप्रथम सर्व संबंधीतांचे अभिनंदन! अधिवेशन उत्तम झाले. त्याचे नियोजन करताना संयोजकांना काय कष्ट पडत होते ते मी अनुभवले आहे. हे कष्ट कमी करता आले असते त्या विचाराने हे मुद्दे.
१. दिवसेंदिवस अधिवेशन बी एम एम चे न होता भारतातील कलाकार आणि उद्योजक यांचे होत आहे. त्याचा खेद होते. या दोघांचीही आवश्यकता आहे हे मी मान्य करतो. त्याचा समतोल राखला गेला तर अधिक बरे होईल. अटलांटा अधिवेशनात हा समतोल चांगला राखला गेला होता. प्रत्येक अधिवेशनाच्या आर्थिक आकडेवारीची मला माहिती आहे. या वेळी "अंतीम उपस्थिती वाढली नाही तर" या कल्पनेने आयोजक काळजीत होते. असे होऊ नये म्हणून काही खर्चिक आणि अनावश्यक कार्यक्रम सुरवातीपासून टाळता आले असते. पहिल्या काही अधिवेशनात फक्त दोन रात्रीचे कार्यक्रम भारतातून आणायचे अशी प्रथा होती. त्यामुळे सर्व खर्च अमेरिकेतील उत्पन्नातून होऊन भरघोस फायदा होत होता आणि भारतातील प्रायोजकांची जरूरी पडत नव्हती. आता कार्यक्रम वाढले म्हणून उपस्थिती अथवा फायदा तर वाढला नाहीच मात्र दरवेळी काही कारणाने भारतातील प्रायोजक असंतुष्ट राहतात आणि तक्रारी वाढतात. शिवाय अनेक चांगल्या स्थानिक कार्यक्रमांना नाकारले जाते. यंदाही तसेच झाले.
२. बी एम एम चे कार्यकर्ते अधिवेशनाला मंजुरी देताना हे सर्व मुद्दे अधिवेशन करणार्‍या मंडळाला लेखी समजावून देतात. परंतु एकदा अधिवेशन मान्य झाले की बी एम एम काहीही करू शकत नाही ही वस्तुस्थिती ओळखून आयोजक मंडळ बी एम एम ला धाब्यावर बसवतात.
३. जेवणात एवढे पदार्थ नको असे बी एम एम सतत सांगत आले आहे. परंतु अटलाटा अधिवेशनानंतर त्याबाबत स्पर्धा चालू झाली आहे असे दिसते.
४. बोस्टनला सर्वात जास्त तक्रार बूथ असणार्‍या उद्योजकांची होती. त्यांना हवा तसा ट्रॅफिक न मिळाल्याने त्यांच्यापर्यंत गिर्‍हाईक पोचू शकले नाहीत. संयोजकांनी अधिवेशना अगोदर सर्व बूथबद्दल त्यांच्या बूथ नंबर सकटची माहिती ई मेल ने उपस्थितांना पाठवली असती तर बरे झाले असते. तसेच सर्व उद्योजकांची यादी मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावता आली असती.
५. पद्मजा फेनानी यांचा कार्यकम अनावश्यक होता आणि चागला सुद्धा झाला नाही. त्याऐवजी स्थानिक कलाकारांनी चांगला कार्यक्रम दिला असता. त्यांना परिक्षक म्हणून बोलावल्यामुळे कार्यक्रम देणे आवश्यक भासले असले तर इतर कार्यक्रमाच्या समांतर त्यांचा कार्यक्रम ठेवता आला असता. तीच गोष्ट मानापमान नाटकाची. नाटकाऐवजी राहूल देशपांडे यांचे गायन समांतर कार्यक्रम म्हणून ठेवता आले असते. (परिक्षक म्हणून आमंत्रित केल्याने). नाट्क उत्तमच झाले पण खर्च वाढला. फॅमिली ड्रामा नाटक आणि युवांकुर कार्यक्रमाची आवश्यकता नव्हती. 'नाटक हवेच' असे असल्यास ते सा रे ग म च्या जागी ठेवून सा रे ग म कार्यक्रम शनिवारी सकाळी ठेवता आला असता.
६. लॉस एंजेलिस अधिवेशनात काही बदल होतील याचा काहीही भरवसा नाही. मात्र ज्या सर्वांनी तळमळीने या ठिकाणी विचार मांडले आहेत त्या सर्वांनी आत्तापासून अधिवेशन कार्यकर्त्यांवर दडपण आणले तरच काही बदलाची शक्यता आहे.

रोम्याजी >> बर्‍याच गोष्टी पटल्या...
प्रत्येक पुढचं मंडळ मागच्यापेक्षा जास्त (जास्त पाहूणे, जास्त कार्यक्रम, जास्त खाणे) आणून (उगाचच) स्पर्धा करतं. आणि हे स्वयंसेवकाना माहीत असतं पण पदाधिकारी ऐकत नाहीत....
बाकी आर्थिक बाबींबद्दल माहीती नाही.
बूथ उद्योजक प्रामुख्याने बिल्डर होते, आणि जाता जाता जागा विकत घेण्याचे दिवस राहीले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बूथवर गर्दी नव्हती. बाकी दागिने, कपडे वगैरे घेणारे घेतात.
बँकेच्या बूथवर नक्की काय करायचे हे कळले नाही...

BMM2013 अधिवेशनाच्या होम पेज वर फीडबॅक देण्यासाठी सोय करण्यात आली आहे.

www.bmm2013.org
डाव्या हाताला, Explore च्या खाली पहिल्च फीडबॅक आहे.

मुख्य तक्रार ट्रॅफिक न मिळाल्याची होती. त्यासाठी दुसर्‍या एकाने सुचविल्याप्रमाणे जेवणघरात अथवा आसपास बूथ असते तर ट्रॅफिक मिळाला असता. धंदा न झाल्याच्या दु:खापेक्षा कोणी आले नाही याचे दु:ख जास्त असते. कनेटिकट मधील एका महिलेचा दागिन्यांचा बूथ होता तिची पण हीच तक्रार होती. कॉसमॉसचा बूथ संपूर्ण अंधारात होता अशी त्यांची तक्रार होती आणि ते मेगा स्पॉन्सर होते. बूथचे संपूर्ण पांढर्‍या उंचीचे पडदे अर्धेच हवे होते. अन्यथा ते बूथ हॉस्पीट्ल वॉर्ड्सारखे दिसत होते.

रोम्याजी, खालील मुद्द्यांशी अजिबात सहमत नाही-
>>तीच गोष्ट मानापमान नाटकाची. नाटकाऐवजी राहूल देशपांडे यांचे गायन समांतर कार्यक्रम म्हणून ठेवता आले असते. (परिक्षक म्हणून आमंत्रित केल्याने). नाट्क उत्तमच झाले पण खर्च वाढला. फॅमिली ड्रामा नाटक आणि युवांकुर कार्यक्रमाची आवश्यकता नव्हती. 'नाटक हवेच' असे असल्यास ते सा रे ग म च्या जागी ठेवून सा रे ग म कार्यक्रम शनिवारी सकाळी ठेवता आला असता.

युवांकुरचे बरोबर आहे, पण बाकी मानापमान, फॅमिली ड्रामा आणि सारेगम हे तीन अतिशय सुंदर झालेले आणि लोकांना आवडलेले कार्यक्रम अनावश्यक होते म्हणणे हे काही झेपले नाही. सारेगम हे स्थानिक कलाकारांचे होते आणि प्राईमटाईमला त्यांना मेन स्टेज आपण नाही द्यायचे तर कोणी द्यायचे- या अदितीबाईंच्या मताशी मी सहमत आहे.

बाकी तेच तेच कलाकार फिरायला म्हणून आल्याआल्या काहीतरी कार्यक्रम करु म्हणून जे काही करतात त्याने खर्च वाढतो ते बंद करा.

चहा-कॉफीसाठी ठेवलेले कप हे हॉट बेव्हरेजचे कप नव्हते. दोन घेतले तरी हात भाजत होते.
असले स्पेशल कप लागतात, नाहीतर स्टायरोफोम

मानापमान, फॅमिली ड्रामा, युवांकुर कार्यक्रम उत्तम झाले याबद्दल दुमत नाही. भारतातील प्रायोजकांचे स्तोम माजले आहे असा एक सूर ऐकू आला. त्याला कमी कार्यक्रम आणणे हाच एक पर्याय आहे. त्यांचेशिवाय यापूर्वीच्या अधिवेशनातील उपस्थिती आणि नफा तेवढाच (काही वेळा जास्तच) होता एवढाच माझा मुद्दा. त्यांचे जागी कमी खर्चात स्थानिक लोकांना संधी मिळाली असती हा आण्खीन दुसरा फायदा.

तयारीला वेळ: सर्वसाधारणपणे नाटक्/एकांकिका/गाण्याचे कार्यक्रम याना तयारीला वेळ लागतो. पडदे, वाद्यांची जुळवाजुळव, Tuning इत्यादी. असे असूनही बहुतेक गटानी सकाळी ९:३० ला (म्हणजे दिवसाचा पहिला) कार्यक्रम नको अशी विनंती केल्याचं ऐकू आलं.
Logically विचार केला तर ज्यांना तयारी लागते त्यांना सकाळची वेळ दिली असती तर अडीच तास तयारीला मिळाले असते.
त्या ऐवजी 'उभ्या उभ्या विनोद' सकाळी ९:३० ला. (या कार्यक्रमाला एक Microphone लागतो).
त्यानंतर 'ढोलकीच्या तालावर' त्यालाही काही तयारी लागली नव्हती (त्यानी हे कळवलेही होते म्हणे).
आणि 'उदाहरणार्थ एक... ' ज्याला सेट लावण्यापासून तयारी होती ते दुपारी. बरं त्यातले कुणी कलाकार 'मानापमान' मधेही नव्हते. त्यांना सकाळीच नाटक दिले असते तर दुपारचा उशीर भरून काढता आला असता..

क्रम लावताना कुणाला किती वेळ तयारी साठी लागतो याचाही विचार व्हावा...

गेल्या दोन तीन अधिवेशनाच्या अनुभवावरून असे वाटते की भारतातून फार तर दोन कार्यक्रम आणावेत. विशेषतः फिलाडेल्फिया च्या अधिवेशनानंतर.

उगाच भाराभर भारतीयांना आणायचे, बर्‍याच जणांना अधिवेशनात काही गम्य नसते, बर्‍याच जणांना इथला 'पाहुणचार' फारसा आवडत नाही. मग भारतात जाऊन ते शिव्या देतात. आणि भुर्दंड मात्र आपल्याला.

झक्की ++

तरी यंदाच्या संमेलनातली विविधता आवडली अर्थात जाणं शक्य नव्हतं.

पुढचं सम्मेलन कुठे आहे?

६. लॉस एंजेलिस अधिवेशनात काही बदल होतील याचा काहीही भरवसा नाही. मात्र ज्या सर्वांनी तळमळीने या ठिकाणी विचार मांडले आहेत त्या सर्वांनी आत्तापासून अधिवेशन कार्यकर्त्यांवर दडपण आणले तरच काही बदलाची शक्यता आहे. >>> Happy Happy Seems like Los Angeles is like a coal mine - add pressure and everyone everything will dazzle like diamonds. काय हे! दडपणपेक्शा काही वेगळा विचार जस प्रोत्साहन मार्गद्र्शन इ इ शक्य आहे का बाकीच्याना??