Submitted by हर्ट on 8 July, 2013 - 22:26
नमस्कार जनहो.
पुण्यात आम्हाला घराच्या फक्त खिड़क्यांना पडदे करायचे आहेत. हल्ली निरनिराळ्या पद्धतीचे पडदे मिळतात. चांगली दुकाने आणि चांगल्या पद्धतीचे टिकावू ...वापरण्यास सोयीचे असे पडदे सुचवा. फोटो असतील तर डकवा. धन्स.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी
मामी
थांबा धीर धरा, कोल वेट आहे.
थांबा धीर धरा, कोल वेट आहे. बिल्डरचा . तुम्ही बघा करुन पुण्यातल्या फेमस बिल्डरला !
379 Sai Chowk, Pimpri, Pune.
Shop No 10-11 Mohol Market, Near Ashok Theatre, Pune.02027410199.
02027411299.
मला पडदे कशात ओवायचे.
मला पडदे कशात ओवायचे. रिंग्स/कड्या लावायच्या की लांबट पट्ट्या? चुन्या पाडायच्या की तसेच लुज ठेवायचे. पातळ बरे की जाड? धुवायला कुठले योग्य? .>>>>>>>>>पडद्यात अडकवायच्या रिंग्स न घेता त्यालाच रिंग्स attached असलेले पडदे चांगले वाटतात.माझ्या पडद्यांना अस्तर लावून घेतले
आहे.थोडे महाग पडतात . जरी पडदे जड असले तरी लवकर फेड होत नाही.मशीनवॉशने स्वछ होतात.माझ्यामते हॉलला पातळ पडदे असावे व बेडरूमला जाड!
पडद्यांचा अजून एक सेट जरूर करा.तो सेट रेडिमेड आणि स्वस्त /मस्त असावा.
बी, हा धागा उपयोगी पडेल का ते
बी, हा धागा उपयोगी पडेल का ते बघ जरा.
क्या मेमरी पायी है मैने, क्या मेमरी पायी है मैने, क्या मेमरी पायी है मैने ....
काश और किसीने पायी होती हो मुझे 'शोध' में न ढुंढना पडता ....
बी तू मागच्याच धाग्यावर हाच
बी
तू मागच्याच धाग्यावर हाच प्रश्न विचारलेला, तिथे कुंदनमल मधे बघ असं तुला उत्तरही दिलं होतं. आजकाल काय धागे निघतील नेम नाही असं काहीही लिहीलेलं नाही. बघ बरं
( मी आता सी या नावाने विचारत जाईन प्रश्न )
तयार पडद्यांसाठी बॉस्को
तयार पडद्यांसाठी बॉस्को (शनिपार, बाजीराव रोडलगत) आणि त्या दुकानाच्या जवळपास इतरही पडद्याच्या कापडांची दुकाने आहेत. तसेच शगुनचा चौक, कुंटे चौक, लोखंडे तालमीच्या परिसरात (लक्ष्मी रोडजवळ) काही दुकाने आहेत. नावे आठवत नाहीत, पण या परिसरात हिंडून किमती, गुणवत्ता व आवड यांचे समीकरण जुळवून तयार पडदे विकत घेता येतील.
बाकी जस्ट डायल सारख्यांमुळे वेगवेगळ्या एरियातल्या दुकानांचे पत्ते मिळणं सोप्पं झालंय : http://www.justdial.com/Pune/Curtain-Wholesalers/ct-73346
हो मागच्या फर्निचरच्या बीबीवर
हो मागच्या फर्निचरच्या बीबीवर कुंदनच नाव सांगितल होत तेवढ एकच का धरुन बसलेत इथे काहीजण. पसंत करायला पर्याय नकोत का
किरण, मला कुठल्या डु आयडीची गरज नाही भासली इथे कधी
बी, तुम्हाला पडदे कुठे अन
बी,
तुम्हाला पडदे कुठे अन कसले हवे आहेत ते आधी ठरवा.
खिडकीतून वेगवेगळ्या सीझनला काय काय आत येतं ते पहा.
उदा, बेडरूमची खिडकी, सकाळी उशीरा पर्यंत झोपायची सवय, किंवा दुपारची वामकुक्षी करणार असाल, तर पडदा डबल अस्तरवाला, किंवा डबल पडदा. ज्याने अंधार करता येईल. व जड कापडाचा, म्हणजे सारखा वार्याने उडून सायकेडेलिक उजेड अंधार डोळ्यावर होणार नाही असा घ्यावा.
लिव्हिंग रूमचे सजावटीसाठीचे.
पण लिव्हिंग अन किचन एरिआ सेपरेशनसाठी हवा असेल, तर ते देखिल आपल्या गरजेनुसार, की बाहेर बसलेल्या लोकांना किचनमधे असलेली अॅक्टीव्हिटी दिसली तर चालणारे का?
शॉवर कर्टन असेल, तर प्लॅस्टिकचाच हवा. अर्थात प्लास्टिकमधे इतके सुंदर मटेरिअल्स अन टेक्स्चर्स मिळतात की ते इतरत्र वापरायलाहि हरकत नसते.
इ.
दुसरे म्हणजे हवा उजेडा सोबत घरात पावसाचे पाणी, धूळ कितपत येते? यानुसार धुवायला सोप्या मटेरिअलचे पडदे घ्या.
त्याच हिशोबाने पडदा घरच्या घरी इझीली काढून, आपल्या वॉशिंग मशीनमधे धुवून लावता येण्यासारखा हवा, की मेन्टेनन्स साठी स्पेशल क्लीनर्स बोलावणार आहात?
या नुसार तो टांगायची पद्धत व मटेरिअल सिलेक्शन ठरते.
फार हेवी ड्रेपरी असेल, तर तिच्यात धूळ जमते, पुढे अॅलर्जी प्रॉब्लेम्स तयार होतात. घरात मांजरी कुत्री इ. पेट्स असतील तर त्यानुसार पडद्यांत जमणारे त्यांचे केस, वा त्यांनी नखांनी पडदे फाडणे इत्यादी प्रकार असतात.
या सर्व बाबींचा विचार आधी करा, मग रूम्सच्या कलर स्कीमप्रमाणे देखणेपणाचा विचार करा!
तुम्हाला पडदानशीन होण्यास शुभेच्छा!
इब्लीस, छान माहीती. पडदे
इब्लीस, छान माहीती.
पडदे बनवताना एक महागातले व डिसेंट रंगाचे, व एक जरा स्वस्तातले पण झटॅक कलरचे असे दोन पडदे एका वेळेस घेतले तर आलटून पालटून जरा बदल करता येतो घरात.
>>>> तुम्हाला पडदानशीन
>>>> तुम्हाला पडदानशीन होण्यास शुभेच्छा! >>> हे वाचल्यावर बी फॉर बेगम अस काही तरी आचरट डोक्यात आलं..
तुमच्या परिसरात डस्ट जास्त
तुमच्या परिसरात डस्ट जास्त असेल तर कमीतकमी सींथेटीक मटेरीयल असेल असे कापड निवडा. नाही तर पडदे ज्या भिंती लगत असतात ती काळी पडत जाते. वारंवार पुसावी लागते. स्टॅटीक चार्ज मुळे असेल. कॉटनचे त्यासाठी चांगले किंवा अस्तर तरी लावावे कॉटनचे.
बी तुझा कुठलाही ड्युआयडी
बी
तुझा कुठलाही ड्युआयडी नाही. किरण या नावाने प्रश्न विचारण्याऐवजी जर मी तो सी या नावाने विचारला असता तर कदाचित मला उठाठेवी लोकांच्या रोषाला बळी पडावं लागलं नसतं. जुनं दुखणं आहे ते.
Pages