बाटीसाठी -
- ३ कप गव्हाचे पीठ
- १/२ कप रवा
- १ टेबलस्पून दही
- १ टीस्पून ओवा
- चिमुटभर खायचा सोडा
- १ टीस्पून मीठ
- १/२ कप तूप
डाळीसाठी -
- १/४ कप मुग डाळ
- १/४ कप उडीद डाळ
- १/४ चणा डाळ
- १ कप तूर डाळ
- १ मध्यम कांदा
- १/२ टीस्पून हळद
- १ इंच आलं बारीक कापून
- १ टीस्पून जीरं
- चिमुटभर हिंग
- २ सुक्या मिरच्या
- ३-४ लवंगा
- २ हिरवी वेलची
- १ इंच दालचिनी
- १ पमालपत्रं
- ५-६ कडीपत्ता
- २ टोमॅटो
- २-३ हिरव्या मिरच्या
- मीठ
- २ टेबलस्पून तेल
- अर्ध लिंबू
डाळ -
सर्व डाळी अर्धा तास भिजवून ठेवा. त्यानंतर हळद घालून शिजवून घ्या.
पॅनमध्ये तेल तापवून त्यावर जीरं, हिंग, सुक्या मिरच्या, कडीपत्ता ची फोडणी करा. त्यावर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आलं, तमालपत्रं, लवंगा, वेलची, दालचिनी, बारीक चिरलेले टोमॅटो घालून परतून घ्या. कांदा तांबूस झाला
की शिजवलेली डाळ घाला आणि चांगली उकळी काढा. वरून लिंबू पिळून, बारीक चिरलेली कोथंबीर घाला.
बाटी -
भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, मीठ, खायचा सोडा, दही, ओवा आणि तूप घ्या. पुरेसं पाणी घालून चांगलं मळून ठेवा. (पीठ पोळीसाठी मळतो त्या पेक्षा थोडं घट्टं)
ओव्हन १८०°C ला प्री-हिट करून घ्या. बेकींग-ट्रे ला तुपाचा हात फिरवून घ्या. पीठाचे लिंबापेक्षा थोडे मोठया आकाराचे गोळे करून बेकिंग-ट्रे वर ठेवल्यावर ओव्हनमध्ये २०-२५ मिनिटे १८०°C वर बेक करून घ्या. २०-२५ मिनिटाने बाटी परतून
साधारण १० मिनिटे बेक करून घ्या. बाटीचा रंग खरपूस तांबूस होईल.
बाटीला थोडे तडे गेले म्हणजे पीठ बरोबर जमून आले आणि बाटी आतापर्यंत बेक झाली समजावे.
बाटी थोडी कोमट होऊ द्या, मग हाताने तोडून वर थोडे तूप आणि भरपूर गरम डाळ घालून, थोडी मऊ, थोडी कुरकुरीत बाटीचा आस्वाद घ्या!!!
पाकृचे स्टेपनुअसार फोटो काढू नाही शकलो. चालवून घ्या
हिरव्या मिरची ऐवजी, लाल तिखटाची पण छान लागते.
बाटी आता पर्यंत कुरकुरीत झाली होऊ द्यावी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
करण्यास अतिशय सोप्पा आणि रुचकर असा हा राजस्थानी/मध्यप्रदेश मधील प्रकार.
माझा एक मध्यप्रदेशातील मित्राकडे मी प्रथम हा पदार्थ खाल्ला. तेव्हांच मला हा प्रकार तुफान आवडला. दोन दिवसापूर्वी त्यालाच रेसीपे विचारली आणि विकेंडला 'दाल बाटी' करून झाली.
मस्त रेसिपी! सोपी वाटते आहे!
मस्त रेसिपी! सोपी वाटते आहे! करून पहायला पाहिजे!
मस्त... फोटोज पण छान आलेत...
मस्त... फोटोज पण छान आलेत...
वॉव....... कसले तोंपासु फोटो
वॉव....... कसले तोंपासु फोटो आलेत!!!
बाटी ओव्हनशिवाय करता येईल का?
बाटी ओव्हनशिवाय करता येईल का?
सोप्पी आहे की रेसिपी..फोटो
सोप्पी आहे की रेसिपी..फोटो मस्त
एका माबोकरणीच्या कृपेने खायला
एका माबोकरणीच्या कृपेने खायला मिळाली दाल बाटी.
अप्रतिम बनवते ती.
फोटो बिटोचे लक्षातच नाय सगळेच तुटुन पडलो.
मुग्धामानसी +१ ओव्हन शिवाय
मुग्धामानसी +१
ओव्हन शिवाय करता येईल काय बाटी??
मस्त तोंपासु
मस्त
तोंपासु
वावा! मस्त दिस्ताय बाट्या.
वावा! मस्त दिस्ताय बाट्या.
ओव्हन शिवाय बट्टी- पीठ मळून
ओव्हन शिवाय बट्टी-
पीठ मळून बट्टी करण्यापर्यत क्रुती सेम ठेवायची. घडवलेल्या बट्टी एका फ्राय प्यान ठेऊन सोसवेल ईतक्या तुपात भाजुन घ्याव्यात.
डीडी नी थोड्या डायटवाल्या बट्टी केलेल्या दिसत आहेत. तुपात लोळल्याशिवाय बट्टीला मजा नाही. मी प्यानमध्ये बट्टी भरपुर तुपात भाजते(मिडियम आकाराची बट्टी २ साईडने भाजायला १५ ते २० मिनीटे)आणि तेच तुप नतर बट्टी + डाळ चुरुन त्यात घेते. या बरोबर वाग्याची मिरची +लसुण घालून घोटलेली भाजी. तोपासु.
पण या नतर कमीत कमी ३ तास झोप मस्ट. त्याशिवाय बट्टी खाल्याचे पुण्य पदरी पड्त नाही.
ओव्हन नसेल तर काय हे नाही
ओव्हन नसेल तर काय हे नाही माहित पण पॅन मध्ये? अं... नॉट टू शुअर.. पॅनमध्ये भाजून(फ्राय) केलेली बाटी आणि ओव्हन मध्ये भाजून.. फरक वाटतोय.
पिन्कि ८० >> बाटी च्या पिठात जे तूप टाकलं ते पुरेसं होतं, बाटी ओव्हन मधून सुकीच येणार, पॅन सारखी चकचकीत नाही. जपून हां नाहीतर टकाटक कडे सल्ले घ्यावे लागतील ..
मस्त होते खरच प्यानमध्ये.
मस्त होते खरच प्यानमध्ये. माझ्या माहेरी निखार्यामध्ये भाजतात आणि मग तुपात बुडवुन मग वाठतात. आम्ही बट्टीसाठी गहु थोडे जाड्सर द्ळुन आणतो.
क्रुपया माझ्या वरील प्रतिसादाबद्द्ल गैरसमज नका करुन घेऊ.
मस्त दिसतेय, आता करून बघेन.
मस्त दिसतेय, आता करून बघेन. खूप वर्षांपूर्वी नागदा(मध्य प्रदेश) येथे मावशीकडे खाल्ली होती निखाऱ्यावर भाजलेली, नंतर श्रीरामपूर येथे खाल्ली ते आठवले. म.प्र.मधली जास्त चविष्ट होती. फोटो छान आलेत.
बाट्या मस्त दिसताहेत. बहुतेक
बाट्या मस्त दिसताहेत.
बहुतेक त्या ओव्हनमधून बाहेर काढल्यावर तुपाचा पहिला अभिषेक करायचा असतो.
ताटात बाट्या आणि डाळ वेगवेगळे वाढायचे. एकेक बाटी हाताने कुस्करून त्यावर डाळ घालून वरणभातासारखी खायची.
माबोवर दालबाट्या किंवा बाफल्याची सुलेखा यांनी लिहिलेली कृती आहे.
वॉव मस्त फोटो आहेत अगदि.
वॉव मस्त फोटो आहेत अगदि.
मी तर हे खायला स्पेशल
मी तर हे खायला स्पेशल राजस्थानी मेस मध्ये जातो. मोती चौकात एक राजस्थानी हॉटेल आहे. तिथे बर्याच वेळेस दाल-बाटी खाल्ली आहे.
- पिंगू
एकदम तोंपासु
एकदम तोंपासु
जबरी फोटो पिंगू, हा मोती चौक
जबरी फोटो
पिंगू,
हा मोती चौक कुठल्या गावात?
मस्तच रेसिपी.
मस्तच रेसिपी.
अशक्य तोंपासु फोटो आहे.
अशक्य तोंपासु फोटो आहे.
मस्त फोटो
मस्त फोटो
वा! काय सुंदर फोटो
वा! काय सुंदर फोटो आहेत!
परवाच खाल्ली शेजारणीकडे. तिने ४०० डिग्रीला बेक केल्या होत्या. तुपात घोळवून खाल्ल्यावर काय छान लागतात. आणि बाटी चुरम्याबद्दल बोलायलाच नको
आमच्याकडेही अंगणात निखारा करून करतात. दाल तुरीचीच खाल्ली होती पण परवा शेजारणीने फक्त उडीद दाळ वापरून केली होती. छान झाली होती. तुम्ही दिलेल्या रेसिपीने दाल करून बघेल आता.
धन्यवाद.
'राजधानी' मधे दाल बाटी मिळते असे ऐकले आहे.
धन्यवाद मंडळी पिन्कि ८० >>
धन्यवाद मंडळी
पिन्कि ८० >> गैरसमज अजिबाद नाही. भरपुर तुपाशिवाय बाटीची मजा नाही हे अगदी खर आहे
मागच्या आठवड्यात केली पण
मागच्या आठवड्यात केली पण पाण्यात उकळुन.... ओवन बिघडला
असाच थोडा वेगळा प्रकार कोरियात मिळतो.