प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतर भारत स्वतंत्र झाला १५ ऑगस्ट, १९४७ रोजी. आपल्या देशासमोर असंख्य समस्या होत्या. दारिद्र्य होतं, जातीय दंगली सुरू होत्या. पण या देशाला एक सबल राष्ट्र बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून सर्व देशवासीयांची वाटचाल सुरू झाली. गेल्या पासष्ट वर्षांत अनेक व्यक्तींनी या देशाच्या भवितव्याला परिणामकारक आकार देण्याचा प्रयत्न केला. असंख्य घटनांनी देशाचं वर्तमान, भविष्य बदलवून टाकलं.
सध्याच्या वेगानं बदलत्या, काहीशा अनिश्चिततेच्या वातावरणात अशा व्यक्तींबद्दल, घटनांबद्दल आपण विचार करणार आहोत. त्यासाठी रोहन प्रकाशन आणि मायबोली.कॉम आयोजित करत आहेत एक लेखनस्पर्धा.
१० जुलै - १५ ऑगस्ट, २०१३ या कालावधीत ही स्पर्धा मायबोली.कॉमवर आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी विषय असतील -
१. स्वातंत्र्योत्तर काळातील (म्हणजे १९४७ सालानंतर) अशी घटना, जिच्यामुळं भारताच्या वर्तमानावर, भविष्यावर सकारात्मक परिणाम घडून आला.
२. स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व (राजकीय नेता / समाजसेवक / शास्त्रज्ञ / खेळाडू / लेखक / कलावंत) व त्याचं कार्य.
३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती (पुस्तक, चित्रपट, नाटक, शिल्प, गाणं, कविता इत्यादी)
या स्पर्धेतील विजेत्यांना मिळतील आकर्षक बक्षिसं.
बक्षिसांचा तपशील, परीक्षकांची नावं, स्पर्धेचे नियम लवकरच जाहीर केले जातील.
रसग्रहण स्पर्धा, गाथाचित्रशती लेखनस्पर्धा यांना मायबोलीकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद या स्पर्धेलाही मिळेल, ही खात्री आहे.
मस्त विषय आहेत. खूप काही
मस्त विषय आहेत. खूप काही चांगलं वाचायला मिळेल. या नविन उपक्रमाबद्दल अभिनंदन.
मस्त विषय आहेत. खूप काही
मस्त विषय आहेत. खूप काही चांगलं वाचायला मिळेल. या नविन उपक्रमाबद्दल अभिनंदन. >> +१
चांगला विषय. सविस्तर नियम
चांगला विषय. सविस्तर नियम लवकरच येऊ देत.
मस्त विषय आहेत. खूप काही
मस्त विषय आहेत. खूप काही चांगलं वाचायला मिळेल. या नविन उपक्रमाबद्दल अभिनंदन. >> +१
विषय छान आहेत. लिहायला कितपत
विषय छान आहेत.
लिहायला कितपत जमेल याची शंका आहे पण नक्कीच खूप काही चांगलं वाचायला मिळेल.
एक शंका आहे. व्यक्तिमत्वाबद्दल लिहिताना राजकीय नेता / समाजसेवक / शास्त्रज्ञ / खेळाडू / लेखक / कलावंत यांना एकाच पारड्यात कसे मोजणार? प्रत्येकाचे कार्यक्षेत्र आणि प्रभावक्षेत्र वेगळे आहे.
उत्तम उपक्रम! विषयही छान
उत्तम उपक्रम! विषयही छान निवडले आहेत. उपक्रमासाठी शुभेच्छा!
मस्त विषय आहेत. माहितीपूर्ण
मस्त विषय आहेत.
माहितीपूर्ण लेख वाचायला मिळतील
मस्त विषय.
मस्त विषय.
आयला, विषय मस्त आहेत. पोखरण
आयला, विषय मस्त आहेत. पोखरण आणि होमी भाभा लई डिमांडीत येणार वाट्टे!
-गा.पै.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/...?
इथल्या अनेकांकडून खूप
इथल्या अनेकांकडून खूप गोष्टींवर अभ्यासपुर्ण वाचायला मिळणार आहे.
मस्तच!!!
नमस्कार, स्पर्धेचा निकाल
नमस्कार,
स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.
परीक्षकांनी निकाल आमच्याकडे सुपूर्त केला आहे. मात्र काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यास विलंब होत असल्याने येत्या काही दिवसांत आम्ही निकाल जाहीर करू.
सहकार्याबद्दल धन्यवाद.