फोडणीसाठी : तेल-२ चमचे, मोहरी, जिरे, मेथी दाणे, हळद, हिंग, कडिपत्ता.
गोडा मसाला - १/२ चमचा, पाणी - ३ वाट्या, मिठ- चवीप्रमाणे आणि आंब्याची (गरासहित) कोय - १.
[वरिल प्रमाण, २ वाट्या फजिता करण्यासाठी आहे. ]
फोडणीचे साहित्य वापरुन फोडणी करुन घ्यावी, त्यात गोडा मसाला, ३ वाट्या पाणी आणि चवीप्रमाणे मिठ घालावे. पाण्यात आंब्याची कोय टाकुन उकळत ठेवावे. कोयीचा गर सुटुन येइपर्यंत उकळायचे आहे [यात साधारण १ वाटी पाणी आटुन जाते]. गर सुटुन आला की कोय काढुन टाकावी, २ मिनीटांनी गॅस बंद करावा.
गरम / गार दोन्ही चांगले लागते.
१.आंबा थोडा आंबट असेल तर छान आंबट-गोड चव येते. पुर्ण पिकलेला गोड आंबा असेल तर एखादे आम्सुल घालावे.
२.तयार झालेला फजिता आमटी सारखा दिसतो, चवीला मात्र थोडासा कैरीच्या मेथांब्यासारखा लागतो.
३.ताकातला फजिता पण करतात. त्याला तुपाची फोडणी घालतात आणि उकळायचे नाही. [असे ऐकले आहे]
छान प्रकार आहे. आंबट
छान प्रकार आहे. आंबट आंब्याचाच जास्त चांगला लागेल. ताकातला केला तर जास्त उकळल्यावर फाटेल.
छान वाटतोय! आमच्याकडे पण
छान वाटतोय! आमच्याकडे पण अस्लाच प्रकार करते आई, डफळ का काय म्हणतात...
मी आधी ते आंब्याची फजीती वाच्लेल!
हे उकडांब्यासारखं लागत असेल
हे उकडांब्यासारखं लागत असेल का चवीला?
मी आधी ते आंब्याची फजीती
मी आधी ते आंब्याची फजीती वाच्लेल!..मी पण..
दिनेश, ताकातला गरम करतच नाहीत
दिनेश, ताकातला गरम करतच नाहीत म्हणे. कोयी ताकाने धुवायच्या आणि त्याला तुप-जिर्याची फोडणी घालायची, चवीप्रामाणे साखर-मीठ, मसाला वगैरे काही नाही. असे काहीतरी आहे.
प्रज्ञा, मेथांब्या सारखी चव लागते. गरम गरम खायला मजा येते.
ओह हे पिकलेल्या आंब्याचं
ओह हे पिकलेल्या आंब्याचं करायचंय होय. प्रयोग करणेत येईल.
कैरीचं केलं तर गूळ घालेन - मग तो आमसुलाच्या सारासारखा प्रकार होईल. त्यालाच बेसन किंवा नारळाचं दूध लावलं की कढी - मग गोडा मसाला बाद.
(श्या! मी किती हिरिरीने 'त्याला फहिता म्हणतात' असं लिहायला आले होते! :P)
(श्या! मी किती हिरिरीने
(श्या! मी किती हिरिरीने 'त्याला फहिता म्हणतात' असं लिहायला आले होते! फिदीफिदी) >>
मलाही ते फहिता म्हणायचं असावं
मलाही ते फहिता म्हणायचं असावं असं वाटलं होतं. फोटो पाहिल्यावर लक्षात आलं
आरती, एका रायवळ आंब्याचा रस
आरती, एका रायवळ आंब्याचा रस काढून त्याला हिंग, मोहोरी, जिरं, मेथी, उडीदडाळ, हळद, तिखट आणि कढिपत्त्याची फोडणी.. चवीप्रमाणे मीठ.. पाणी अजिबात घातलं नव्हतं.. (नवरा असले प्रकार खात नाही, त्यामुळे 'वाढवायची' गरज पडत नाही. :D) कालच सासम (?) केलं होतं (ह्यालाच सासम म्हणतात का ?) गरम भाताशी खूप छान लागलं.. आज तुझी रेसिपी पाहिली.. चवीला दोन्ही सारखंच लागत असेल असं वाटतं.. फक्त मी केलं ते गरम करत नाहीत असं वाटतं.. जाणकार सांगतिलच !
(श्या! मी किती हिरिरीने
(श्या! मी किती हिरिरीने 'त्याला फहिता म्हणतात' असं लिहायला आले होते! )>>मी सुद्धा
मी तर हा पदार्थ फक्त
मी तर हा पदार्थ फक्त सासुबाइंकडुन ऐकला आहे, आणि स्वतः करुन खाल्ला आहे, त्यामुळे त्याला अजुन काय-काय नावे आह्व्त, तो नक्की कुठल्या प्रदेशातला आहे वगैरे वगैरे काहिच माहिती नाही
आरती, आंबे आहेत घरी, आज करून
आरती,
आंबे आहेत घरी, आज करून बघते. आंब्याच्या रसाला फोडणी वगैरे प्रकार कधी केले नाहीत त्यामुळे चवीची कल्पना नाही, पण पावसाळी हवेत गरम गरम खायला छान वाटेल.
यालाच आंब्याचं रायतं म्हणतात
यालाच आंब्याचं रायतं म्हणतात ना?
आंब्याच्या रसाला फोडणी वगैरे
आंब्याच्या रसाला फोडणी वगैरे प्रकार कधी केले नाहीत >> मला पण प्रश्न पडला होता, करु की नको
राज,
हा आमटी / सुप सारखा पातळ पदार्थ आहे, त्यामुळे रायतं नक्कीच नाही.