- १ मध्यम पापलेट (Black/Silver/Golden)
- मीठ
- ३-४ चमचे तिखट
- १ छोटा चमचा हळद
- १ वाटी ओलं खोबरं
- ३-४ लसूण पाकळ्या
- २ चमचे धणे
- ८-१० काळी मिरी
- १ मध्यम कांदा
- ५-६ आमसुले (कोकमे) (नसल्यास चिंच)
- २ चमचे तेल
- मीठ
पापलेट स्वच्छ करुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत.
त्यांना मीठ, हळद व २-३ चमचे तिखट लावून साधारण तासभर मॅरिनेट होऊ द्यावेत.
वाटण-
खोबरे, अर्धा कांदा, ३-४ कोकमे, मिरी, धणे, २ चमचे तिखट आणि थोडे पाणी मिक्सर चटनी जार मध्ये घ्यावे.
शक्यतो ताजे, नुकतेच खवलेले खोबरे घ्यावे. (पण मला शक्य नसल्याने, नाईलाजाने पॅकेट मधलं खोबरं घेतलंय)
बारीक वाटण करुन घ्यावे.
वाटण जितके बारीक होईल ग्रव्ही तेव्हडी स्मुथ होईल.
भांड्यात तेल तापवावे. लसुण बारीक चिरुन परतवून घ्यावी, त्यावर उरलेला अर्धा कांदा बारीक चिरून घालावा.
कांदा गुलसर झाल्यावर त्यावर पापलेटचे तुकडे घालुन ३-४ मिनिटे परतवून घ्यावेत.
आता त्यात वाटण घालावे आणि थोडे पाणी घालुन मंद आचेवर १०-१२ मिनिटे शिजवावे.
आच मोठी असेल तर पापलेटचे तुकडे फुटू शकतात. चवीनुसार वरुन मीठ घालावे. (मॅरिनेट करताना मीठ लावले असल्याने चव घेऊनच मीठ घालावे.)
गरमागरम पापलेट करी वाफाळत्या भातासोबत सर्व् करावी
काळ्या पापलेटला हलवा असही म्हणतात असं ऐकल मी.. पण नावात काय ठेवलय.. असो.
फिश करी साठी एकमेव टिप म्हणजे मासा ताजा असावा.. बाकी पाडत थोड इकडे तिकडे झालं तरी खुप फरक नाही पडत.. सगळी मदार माश्यावर
प्रसिक हे स्मायली तुम्ही कसे
प्रसिक हे स्मायली तुम्ही कसे टाकता?
Pages