हाउसिंग सोसायटीमध्ये नवर्‍यासोबत बायकोचं नाव फ्लॅटवर घालण्याबाबत प्रश्न

Submitted by स्वप्ना_राज on 24 June, 2013 - 01:24

नमस्कार मंडळी, हा प्रश्न मी एका मैत्रिणीच्या वतीने विचारत आहे.

तिचे आई-वडिल ज्या फ्लॅटमध्ये रहातात तो फक्त तिच्या वडिलांच्या नावे आहे. त्यावर त्यांच्यासोबत तिच्या आईचं नाव घालायचं असेल तर काय प्रक्रिया असते? ह्यासाठी तिच्या वडिलांची संमती आवश्यक आहे का? झालंय असं की तिच्या वडिलांना ओसीडी आहे, तसेच थोडे मानसिक प्रॉब्लेम्स आहेत. पत्नीने ह्याबाबत विचारलं तर त्यांना अशी भीती वाटू शकते की ही आपल्याला घराबाहेर तर काढणार नाही ना. पण पुढल्या भविष्याच्या दृष्टीने पत्नीचंही नाव फ्लॅटवर असणं जरुरीचं आहे. कारण तिला अशी भीती आहे की मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याने तिचे मिस्टर कोणा परक्या माणसाच्या नावावर करु शकतील.

कोणाला काही माहित असेल तर प्लीज सांगाल का? धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्लॅटच्या अ‍ॅग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन करताना दोघांचं नाव घातलेलं उत्तम. पुन्हा एखाद्याचं नाव त्यात समाविष्ट करायचं असेल तर स्टँप ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी चा भुर्दंड पडतो. पण ज्याच्या नावावर मिळकत आहे त्याची संमती लागणारच आहे, त्याशिवाय ते होणारच नाही. तुम्ही सांगितलेल्या परिस्थितीत मृत्यूपत्र हा एक चांगला ऑप्शन आहे (पण त्या व्यक्तीने ते पुन्हा पुन्हा बदलू नये ).

वकिलाकडून खातरजमा करून घ्यालच .

१. आतावर फक्त नवर्‍याचे नाव असेल तर नवर्‍याची संमती असावी लागेल. त्याच्या संमतीनुसार नॉमीनी म्हणून बायकोचे नाव ठेवावे लागेल.
२. सोसायटीला कळवावे लागेल. मॅनेजिंग कमिटीशी बोलावे लागते,
३. सोसायटीच्या नावाच्या पाटीवर नाव टाकावे लागेल.
४. खालील जरूरी नाही पण वरती जी काही नवर्‍याची स्थिती आहे त्यासाठी म्हणून,
४अ) फोन, ईलेक्ट्रीक बिलावर सुद्धा नाव टाकून घ्यावे. बँकेत जाँईंट खाते वगैरे.

कागदपत्रांची लिस्ट मोठी आहे, लग्नाचे सर्टिइफिकेट, पासपोर्ट कॉपी वगैरे..(सोसायटीचे जे काही नियम आहेत त्यानुसार लिस्ट असू शकते कधी कधी).

नॉमिनी म्हणुन त्यांच नाव लावता येइल बहुद्धा/

आता अ‍ॅग्रीमेन्ट करतानाच नवरा बायको दोघांचं नाव असतं.

खरं म्हणजे नक्की काय करायचे आहे ?सोसायटीला ब्लॉक खरेदीचं रेजिस्टर केलेलं अग्रीमंट सादर केल्यावर त्यातील नाव मेँबर म्हणून 'आय' रेजिस्टर मध्ये नोँद होते . मुळात दोनजणांची नावे तिथे असायला पाहिजेत .तसे करायला अग्रीमंटच बदलावे लागेल .किंवा वडिलांच्या (मेँबर)च्या अनुमतीने आईने सहसभासद(associate member) होण्याचा अर्ज शंभर रुपये फी भरून करावा .फक्त एकट्या आईच्या नावावरच ब्लॉक असेल तरच वडिलोपार्जित मालमत्ता ठरणार नाही .

सर्वांना मनापासून धन्यवाद! मैत्रिणीला ही लिंक देते. वडिलांची संमती लागत असल्याने त्यांना काही करता येईल असं वाटत नाही. Sad