३/४ वाटी सोललेली कोलंबी
दीड वाटी बासमती तांदुळ
१ मध्यम आकाराचा कांदा चीरलेला
१ टोंमेटो चीरलेला
२ चमचे अद्रक लसुण ची पेस्ट, बारीक कापलेले असेल तरी चालेल
अख्खा मसाला - ह्यात ४/५ लवंग, ६/७ मीरे, दालचीनीचा १ इन्च तुकडा, वैगरे येते
१ चमचा गरम मसाला
१ चमचा लाल तिखट (चवी प्रमाणे कमी जास्त )
हळद चीमुटभर
१ पळीभर तेल
मीठ चवी प्रमाणे
कोथींबीर बारीक चीरलेली
ह्याला भात शिजायला जितका वेळ लागतो तेव्हडाच वेळ लागतो म्हणुन झटपट.
तांदुळ चांगला धुउन राईस कुकरला लावा.
कोळंबी ला मीठ हळद लावुन बाजुला ठेवा.
त्यानंन्तर कांदा वैगरे कापुन बाकी तयारी करा.
तेल गरम करुन त्यात अख्खा मसाला टाका. मग २ मिनीटांनी अद्रक लसुण आणी कांदा टाकुन चांगला ब्राउन होईपर्यन्त परतवुन घ्या.
मग टोमॉटो टाकुन एकजीव होउ द्या.
नतंर गरम मसाला, तीखट व कोलंबी टाकुन २ मीनीट परतवुन घ्या.
तो पर्यन्त तांदुळ अर्धवट शिजलेला असतो.
त्या अर्धवट शिजलेल्या भातात कोळंबीची ग्रेव्ही टाकुन चांगली एकत्र करुन राईस कुकर बंद करुन भात पूर्ण शीजु द्या.
वाढतांना चीरलेली कोथींबीर टाकुन सजवा.
Agadich zatapat....mast
Agadich zatapat....mast
फोटो वरती देता आले नाहीत
फोटो वरती देता आले नाहीत म्हणुन इथे दिलेत.
![KPulaw-1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u27618/KPulaw-1.jpg)
![KPulaw-2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u27618/KPulaw-2.jpg)
रेडी टू ईट!
![KPulaw-3.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u27618/KPulaw-3.jpg)
प्रिती धन्यवाद
प्रिती धन्यवाद
तो. पा . सु .....
तो. पा . सु .....
कोलंबी सोलुन साफ करता येत
कोलंबी सोलुन साफ करता येत नाही, त्यामुळे फक्त फोटो बघुन समाधान मानेन.
सेम अशीच करते. फक्त गरम मसाला
सेम अशीच करते. फक्त गरम मसाला कमी वापरते. कुकरमध्येच ग्रेव्ही तयार करून त्यात धुतलेले तांदूळ टाकून भात लावतो तसं लावायचं. (आधी भात शिजवोन घेत नाही. डायरेक्ट कच्चे तांदूळच धुवून त्या ग्रेव्हीत शिजायला ठेवते. ) तयार झाल्यावर साजूक तूप आणि भरपूर कोथिंबीर पेरावी.
अशीच सोड्याची खिचडीही (सोडे- सुकवलेली साले काढलेली कोलंबी. सुकट/जवळा नव्हे) करता येते.
मस्तमस्त
मस्तमस्त
तो. पा. सु. रविवारी हाच बेत
तो. पा. सु. रविवारी हाच बेत करणार. माहितीबद्दल धन्यवाद.