Submitted by विजय देशमुख on 20 June, 2013 - 00:25
गेल्या काही दिवसात रुपयात प्रचंड घसरण चालु आहे. आज डॉलरमागे ५९.९४ रुपये असा भाव आहे. युपीए सरकारच्या स्थपनेच्यावेळी हाच भाव ३४ रुपयांच्या आसपास होता. रुपया घसरण्यामागे नेमकं कारण काय आहे? रुपया घसरला म्हणुन महागाई वाढलीय (कारण प्रेट्रोल साठि द्यावी लागणारी जास्त रक्कम). खुद्द पंतप्रधान अर्थतज्ञ्य असुनही अशी वेळ का येतेय?
याचा पुढचा टप्पा म्हणजे आर्थिक दिवाळखोरी किंवा आर्थिक संकट आहे का?
की पैसा असुनही तो योग्य प्रकारे वापरल्या जात नाही आहे.
मला अर्थशास्त्रातलं काहीही कळत नाही, त्यामुळे कोणी सोप्या शब्दात सांगीतल तर बरं होईल.
बहुदा १९४७ मध्ये १ डॉलर = १ रुपया असा दर निश्चित केला होता, पण जागतिक बँकेकडुन कर्ज घेण्यासाठी रुपयाचं अवमुल्यन करावं अशी अट होती असं बहुदा राजीव दिक्षीत यांच्या व्याख्यानात ऐकलं होतं, हे खरय का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इज ऑल धिस कमिंग फ्रॉम रामदेव
इज ऑल धिस कमिंग फ्रॉम रामदेव स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स?>>>>>
अरेच्या, ही तर आरेसेसच्या
अरेच्या, ही तर आरेसेसच्या 'स्वदेशी' चळवळीची लिस्ट असल्यासारखं वाटतंय. जेव्हा स्वदेशीचा पुरस्कार आरेसेसने सुरू केला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. नुकतीच आपली अर्थव्यवस्था 'मुक्त' होत होती (९०चं दशक), येणार्या व्यवस्थेबद्दल बरीचशी अनिश्चितता, भीतीही अनेकांमधे होती. नव्याने येणारा आर्थिक वसाहतवाद अशी काहीशी भूमिका स्वदेशीपुरस्कर्त्यांनी घेतली होती. तेव्हा या असल्या याद्या/उपाय निघायचे
आताची परिस्थिती वेगळी आहे. आपली अर्थव्यवस्था एवढी 'स्वदेशी/परदेशी' कॅटेगरीजमधे विभागता येणारी नाहीये तर गुंतागुंतीची आहे आणि बाहेरच्या अर्थव्यवस्थांशी जोडली गेलेली आहे.
इतकं सोपं असतं असं रुपया कंट्रोल करणं तर भारतात एवढे मोठे मोठे अर्थतज्ज्ञ आहेत ते गप्प बसले असते का?
तेव्हा प्लीज अशा लिस्ट्सना फसू नका..
राजीव दीक्षित यांचा संदेश
राजीव दीक्षित यांचा संदेश ऐकून भारावलेल्या कुणीतरी मला काही वर्षांपूर्वी अशीच यादी ऐकवली होती. त्यात सर्फऐवजी निरमा वापरा असाही संदेश होता. मागल्या पानावरची यादी लिंगसापेक्ष असावी का?
भारताकडे जे जागतिक बाजारात
भारताकडे जे जागतिक बाजारात आणि विशेषत: तेल विकणाऱ्या देशांना विकता येईल असे काही आता राहिलेले नाही .या वस्तु ते इतरा देशांकडून घेऊ लागले आहेत .हेच खरे कारण आहे रुपया घसरण्याचे .आपल्या वस्तुंना मागणी नाही =रुपयाला मागणी नाही . शिवाय त्यांच्याकडचे तेल ,सोने ,यंत्रे मात्र आपल्याला हवी आहेत .या अगोदर जे व्यापारी करार झाले ते संपत आले आहेत .
<भारताकडे जे जागतिक बाजारात
<भारताकडे जे जागतिक बाजारात आणि विशेषत: तेल विकणाऱ्या देशांना विकता येईल असे काही आता राहिलेले नाही >
भारताची निर्यात वाढतेच आहे पण आयात त्यापेक्षा जास्त दराने वाढते आहे.
भारत->सौदी अरेबिया निर्यात
भारत->सौदी अरेबिया निर्यात गेल्या पाच वर्षांत जवळजवळ दुप्पट झाली आहे.
त्या लिस्ट मधे बाटा वापरा
त्या लिस्ट मधे बाटा वापरा म्हणून दिले आहे. बाटा ही देशी कंपनी नाहिये, चेक रिपब्लिक मधली आहे.
त्या लिस्ट प्रमाणे खरेदी केली तर रूपया वधारेल ते पण १$ ला ४० पर्यंत म्हणजे या वस्तू खरेदी केल्या तर परत अमेरिकेत मंदी येइल असं म्हणायचंय का त्यांना?
काल पंतप्रधानांनी सांगितले आहे सोने आणि पेट्रोलची खरेदी कमी करा म्हणून. मुख्यतः सोने आणि पेट्रोल खरेदी करण्यात डॉलर्स लागतात आणि जसे त्यांची मागणी वाढते तशी रुपयाला मागणी कमी होते आणी रुपया घसरतो. शिवाय जोपर्यंत सिरियावर हल्ला करायचा अमेरिकेचा विचार असेल तोपर्यंत पेट्रोलचे दर कमी व्हायची शक्यता कमी आहे. तोपर्यंत रुपया फारसा वधारेल असं नाही वाटत (I hope I am wrong)
#भरत मयेकर 'आयात फार वाढते
#भरत मयेकर 'आयात फार वाढते आहे ' बरोबर . कपडे ,बासमती ,डाळी ,मसाले यांना स्पर्धा वाढली .
दुर्दैवाने मनीष चुकिचं बोलत
दुर्दैवाने मनीष चुकिचं बोलत नाहीय. पेट्रोल कमी वापरा असं म्हणणार्या पंतप्रधानांनी एकदा सरकारी गाड्या किती पेट्रोल उडवतात, ते चेक करावच.
वर अन्नसुरक्षेचं भुत आहेच.
इथे लिहिले की देशी वस्तुच
इथे लिहिले की देशी वस्तुच वापरा......
.
.
.
.बरोबर आहे.....
.
एक सांगा.......
आपल्या पैकी किती जण वस्तु खरेदी करताना ....सेल टॅक्स व्हॅट वगैरे भरुन पक्की पावती घेतात ?
हे चालु करा....थोडाफार का असेना.. फरक पडेल......
भरत त्यासाठीच ही मेल फक्त
भरत
त्यासाठीच ही मेल फक्त डकवतोय हे आधी स्पष्ट केलं होतं. बहिष्कार घाला हे सांगण्यापेक्षा जी उत्पादने स्वदेशी म्हणून खरेदी करायला सांगितलीत त्यांची निर्यात वाढली तर प्रॉब्लेम?सॉल्व नाही का होत त्यांच्याच थिअरीप्रमाणे ?
थियरी काही चुकीची नाही फक्त
थियरी काही चुकीची नाही फक्त खुप लांबचे कनेकश्न आहे आणि म्हणूनच खुप कमी इंपॅक्ट असलेला तोडगा आहे.
रुपया डॉलरच्या तुलनेत ७४ ला
रुपया डॉलरच्या तुलनेत ७४ ला जाऊन आज ६९.८५ आहे
उद्दाम हसेन आहेत का अजुन ?
उद्दाम हसेन आहेत का अजुन ? भारतीय वस्तु वापरत आहेत का नाहित ?
८० पर्यत रुपया पोहिचला म्हणुन विचारले
छान
छान
छान
छान
80 चला दुबईला जाऊ
80
चला दुबईला जाऊ
कॉग्रेस ला हे ५० वर्षात जमले
कॉग्रेस ला हे ५० वर्षात जमले नाही. BJP नी ५ वर्ष तुट कमी ठेवली होती तेव्हा रुपया strong झाला होता.
Submitted by साहिल शहा on 2 July, 2013 - 18:51 >>>>>
हा हा हा
हे साहेब अर्थसाक्षर आहेत हे मी एलआयसी च्या धाग्या वळच ओळखले होते.
सरकारचे काम सर्वांना केवळ
सरकारचे काम सर्वांना केवळ धान्य देणे नाही तर आर्थिक सबलता प्राप्त करुन देणे आहे >>> विजय कुलकर्णी आहेत का ? मोदीने ८० कोटिना धान्य मोफत दिले आहे आणी नोकर्या गेल्या आहेत.
काय म्हणणे आहे याचे आता !
Pages