सकाळी तळ्यावर जायला बाहेर पडले तेव्हा दोघी म्हाताऱ्या झाडाखाली बसल्या होत्या. मला बघून एक कुजबुजली “ही लग्न करायचं म्हणतीये” दुसरी उद्गारली “देवा रे! वाटलं नव्ह्त ही अस काही करेल. सालस आहे तशी. केव्हढी असेल ही वयाने?” सोयर असेल तेव्हा आई ह्या पहिल्या आज्जीलाच बोलवायची, माझ्याही वेळेला हीच असणार. सगळ गावच तिला बोलवायचं. पण म्हणून कोणाच वय ती विसरली अस थोडी होणार! ती म्हणाली “बहुतेक वीसावर पाच किंवा सहा असेल.” दुसऱ्या आज्जीने लगेच शेरे झाडले “लहान आहे का? तरी अस लग्न करायचं म्हणते! आपल्या ना रक्ताचा ना मांसाचा. अशा माणसाबरोबर आयुष्यभर रहायचं. काही कळत नाही ह्या हल्लीच्या मुलींचं. ‘नवरा’ म्हणे! अग पाकिटावर टपालतिकीट लावतो ना तसलं ते चिकटवलेल नात. मग काय होत पाकिटाच - आयुष्य सैरभैर होतय. आणि तीच काहीही होऊ द्या. ह्या वयात आईला असले दिवस दाखवायचे म्हणजे … ” पहिल्या आज्जीला उगीच माझ्याबद्दल उमाळा आला “आईचं नाही ऐकायची, पण मामा मोठा प्रेमाचा आहे तिचा. समजावेल ग.” माझे लक्ष त्यांच्याकडे जातय बघितल्यावर दोघी तोंडचे बोळके पसरून हसल्या आणि पहिली म्हणाली “का ग, होडी यायची वेळ झाली का?” मी उत्तरले “हो आज्जे, आज ३ होड्या येणार आहेत. त्या tourist लोकांसाठी तळ्याजवळ गाण्याचा कार्यक्रम आहे. पण रात्री शेकोटीचा नाच आहे. या दोघी नंतर जेवायला”.
लुगू तळ्याकाठी बसून मी होडीची वाट बघू लागले. शांघायपासून आठ तासावर आमच लुगू तळे. रोज होडीची वाट बघणे एक प्रकारचे ध्यान. शांतता मला वेढून घेई. पण आज ताईचे लग्नाचे सर्टीफिकेट आईला सापडले तो दिवस नकळत मला आठवू लागला. आमच्या मोसुआ (mosuo) जमातीच्या मानाने ताई जास्तच शिकली. आईला ही ते आवडलं. आईच्या मागे घर, गुरे, शेती सगळे ताईच सांभाळणार होती. शिकल्यावर ती नीट सांभाळेल असा आईला विश्वास होता. पण सध्या ताई शेती, गुरे बघत नव्हती. गावातल्या बायांना हिशेब शिकवण्यासाठी एक छोटी शाळाच तिने सुरु केली होती. आईला त्याचाही अभिमान. ताई शाळेत जाई तेव्हा माझी भाची आईच सांभाळायची. मोसुआ आई अशीच असते. तिचा संसार म्हणजे तिची मुले, तिच्या बहिणी, तिच्या बहिणींची मुले आणि आता मुलीची मुले. मदतीला घरात भाऊ. पती, पिता ही नाती आम्हाला माहीतच नाहीत. आईला तिच्या आईकडून मिळालेली जमीन ती कसतीये आणि आम्हाला सांभाळतीये. माझ्या भाचीचा बाबा मोसुआच आहे, ताईपेक्षा जास्त शिकलेला. त्याच्या बहिणीची मुले तो मायेने सांभाळतो. तो त्याच्या घरी, ताई आमच्या घरी. रीतीनुसार ताईचा आणि त्याचा ‘तीसेसे’ आहे. ‘तीसेसे’ म्हणजे फिरते लग्नच म्हणा हवे तर. रात्री प्रेमी भेटतात, दिवसा आपापल्या घरी जातात. ‘तीसेसे’ असला म्हणून कोणी वरचढ नाही की प्रेमी बदलला म्हणून कुणी कमी नाही. झाली मुले तर नेहमी आईच वाढवते. इतके सगळे सोपे सुटसुटीत असताना ताईसारख्या बाईने लग्न करावं आणि आईला सांगू ही नये. झाडताना लग्नाचा कागद सापडला, थोडीफार अक्षर ओळख असलेल्या माझ्या आईने तो झटकन ओळखला. मनगटाला धरून फरफरत ताईला देव्हाऱ्यासमोर उभी केली. पुष्कळ टाकून बोलली. ताईचा केविलवाणा चेहरा आज राहून राहून आठवतोय. ताई रडत रडत म्हणाली “अग, जाळून टाकलस तो कागद तरी चालेल मला. मला नव्हत लग्न करायचं पण त्याच्या बरोबर जेव्हा शांघायला गेले होते तेव्हा रहायला हॉटेल हवे होते ना. तिथला माणूस आम्हाला खोलीच देईना. रात्र स्टेशनवर काढली मग सकाळी लग्न केल. मी कुठे गेलीय त्याच्याकडे नांदायला? सगळ चालू आहे न पूर्वीसारखं.” आईचा जीव भांडयात पडला. मला मात्र त्या काळातला ताईचा खिन्न चेहरा राहून राहून आठवत होता.
मला आईसारखा तीसेसे नको, ताई सारखं धेडगुजरी तीसेसे-लग्न नकोय. शांघाय मधल्या मुली करतात तस लग्नाचं पूर्ण नात हवय. माझे बाळ मला त्याच्या बाबा बरोबर वाढवायचंय. इथे कुणाला मनाच नातं समजतच नाही, एकत्र राहायचं तर रक्त एक का हवं? विचारांच्या गलक्यात मी हरवले आणि ताई शेजारी कधी येउन बसली ते कळले नाही. मी तिला म्हणाले “तू गेलीयेस न शांघायला. राहतात न तिथे मुली बिनरक्ताच्या नाते संबंधात. मग मी लग्न केल, एक परंपरा मोडली ह्यात काय इतक चुकलं?” तळयाकाठाची नीरव शांतता अधिकच बोचरी झाली. ताई हळुवारपणे म्हणाली “तो हान वंशाचा आहे ना? मोसुआपद्धती त्याला काय समजणार” मी म्हणाले “पण मला हान पद्धती समजतात. मला त्या मान्य आहेत. ताई, तो त्याच्या पद्धतीप्रमाणे आपल्या मामाला चांगला हुंडा ही देणार आहे. आम्ही लग्न करू, मी त्याची होईन. कायमची!! आम्ही एकत्र बीजिंगला जाऊ. ताई मी काही चूक करत नाहीये ग, मला प्रेमाने पाठव. आई- मामा ऐकणे कठीण आहे. पण निदान तू तरी.” ताई म्हणाली “असं काय करतीयेस. मी आहे तोवर तुला घर आहे. परंपरा प्रत्येक पिढीने मोडल्या, त्यात तू एक. लग्न समाजमान्य नाही म्हणून बंडखोरी, लग्न समाजमान्य आहे म्हणून बंडखोरी…. वयच तुझ तसं. पण हुंडा घेतला, लग्न केलस म्हणून तू त्याची झालीस हे इथे कुणाला पटेल ग. तू तुझ्या मर्जीची! अग, रक्ताचं काय आणि मनाच काय कुठल्याही व्यक्तीशी नाते असणे हा तसा अपघात. दोन ओंडक्यांची समुद्रात भेट व्हावी तसा. ह्या अपघातात आपलं गाणं हरवू नकोस. एक नात आपलं आपल्या भाताशी असतय. नेहमी समाधान देणारं. आई काय नवरा काय तू प्रेम दिलेस म्हणून बदल्यात तुला प्रेम मिळेल ह्याची खात्री नसते. मात्र अन्नासाठी कष्ट करावे आणि मग भात कायम गोडच लागतो बघ. ते नाते जप. तू tourist गाईड राहशील न?” मी हसून मान हलवली. हो, बीजिंगमध्येही मी चांगली गाईड होईन.
(The Kingdom of Women ह्या डॉक्युमेंटरीवर आधारित)
मस्त वेगळच वाचल काहीतरी
मस्त
वेगळच वाचल काहीतरी
आधी विडंबन वाटले.... पण नंतर
आधी विडंबन वाटले.... पण नंतर एक कविताच झाला आहे हा अनुवाद. वेगळे आहे हे मात्र नक्की.
आवडलच्! आता डॉक्युमेंटरी
आवडलच्!
आता डॉक्युमेंटरी मिलवून बघायला हवी.
आवडले
आवडले
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
व्वा आवडली !!
व्वा आवडली !!
छान आहे, काहीतरी वेगळचं!
छान आहे, काहीतरी वेगळचं!
खरच वेगळं... मूळ
खरच वेगळं... मूळ डॉक्युमेंन्टरी बघायला मिळाली तर बहार येईल... पण अनुवाद छान वाटतोय वाचायला.
<<अग, रक्ताचं काय आणि मनाच काय कुठल्याही व्यक्तीशी नाते असणे हा तसा अपघात. दोन ओंडक्यांची समुद्रात भेट व्हावी तसा. ह्या अपघातात आपलं गाणं हरवू नकोस. एक नात आपलं आपल्या भाताशी असतय. नेहमी समाधान देणारं. आई काय नवरा काय तू प्रेम दिलेस म्हणून बदल्यात तुला प्रेम मिळेल ह्याची खात्री नसते. मात्र अन्नासाठी कष्ट करावे आणि मग भात कायम गोडच लागतो बघ. ते नाते जप<<>>
छान आहे!
छान आहे!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=WjqBAZfhuT0
https://www.youtube.com/watch?v=bbzG0n3shTM
मलाही ह्या फिल्म वेगळ्या वाटल्या. जरूर बघा. शब्दशः असा अनुवाद नाहीये. पण १.५-२ तासांच्या डॉक्युमेटरी मध्ये जे मनात राहील त्यानुसार लिहील.
आवडलं!!!
आवडलं!!!
आवडलं
आवडलं
मस्त. आवडलं.
मस्त. आवडलं.
आवड्ल . छान!
आवड्ल . छान!
वेगळीच आहे गोष्ट. छान!
वेगळीच आहे गोष्ट. छान!
एकदम वेगळीच आहे. आवडली.
एकदम वेगळीच आहे. आवडली.
छान आहे. आवडली कथा.
छान आहे. आवडली कथा.
मस्त लिहिली आहे. वेगळ
मस्त लिहिली आहे. वेगळ काहीतरी. नवीन नवीन नावे. नवीन नवीन स्थळे. नवीन नवीन प्रश्न.
त्या दोन लिंक रात्री बघेन. मला आवडतात डोक्यूमेन्टरीज बघायला. धन्यवाद.
वा! मस्त लेखन. (मला आवडली
वा! मस्त लेखन.
(मला आवडली मोसुआ पद्धत.)
अरेरे मातृसत्तेकडून
अरेरे मातृसत्तेकडून पितृसत्तेकडे वाटचाल का
छान आहे.
छान आहे.
मस्त
मस्त
Kerala chya kahi Bhagat Mosua
Kerala chya kahi Bhagat Mosua sarakhich pratha hoti ..... fakt prajananasathi sambhadham .... kunich raktach naat sodun jayache nahi .... Shankaracharya ni ya pratha badalalya n aata mostly sarv jan patriarchal zale aahet
छानच आहे... वेगळं काही
छानच आहे... वेगळं काही
https://www.theguardian.com
https://www.theguardian.com/lifeandstyle/2017/apr/01/the-kingdom-of-wome...
हा एक मस्त लेख वाचला. तिथले शेवटचे वाक्य (They don't know how good they have it!) अगदी अगदी आहे :अरेरे:े
आवडलं!
आवडलं!
खुप दिवसांनी काहीतरी वेगळं
खुप दिवसांनी काहीतरी वेगळं वाचायला मिळालं.. लेख आवडला.. पुलेशु!
Chan,aawadale
Chan,aawadale
वेगळी आहे आवडली.
वेगळी आहे आवडली.
वाह! साध्या माण्सांचे सरळ
वाह! साध्या माण्सांचे सरळ सुटसुटीत तत्वज्ञान, त्या खेड्यातील जीवनाचे चित्रमय वर्णन - सर्वच आवडले.
>>>>> एक नात आपलं आपल्या भाताशी असतय. >>>>>>>>>> खरे आहे.