वासंतिक कोशिंबीर

Submitted by लोला on 31 May, 2013 - 20:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

-स्प्रिंगमध्ये येणार्‍या ताज्या नाजूक काकड्या. जरा भरल्या अंगाच्या काटेवाल्याही चालतील. त्या थोड्या नंतर येतात. ३ मध्यम.

-स्नॅप पीज. कोवळ्या मटाराच्या शेंगा. यात दाणे नसतात. आख्ख्या शेंगाच खायच्या असतात. वाटीभर.

-रंगीत मिरच्या. या तश्या कधीही मिळतात पण वसंतातही मिळतात. वेगवेगळ्या रंगाच्या घ्याव्यात. बोटभर उंचीच्या असतात. ४-५ पुरे होतील.

-२ चमचे डांगर (उडीद, धणे-जीरे इ. चे तयार मिश्रण मिळते ते)

-मीठ, साखर, लाल मिरच्यांचे बी चवीप्रमाणे

-तेल, हिंग, लाल मिरचीचे बी (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

रंगीत मिरच्या आख्ख्या ग्रिल कराव्यात किंवा तव्यावर भाजून घ्याव्यात. काकडी कोचून घ्यावी. मिरच्या भाजतानाच काकडीचे काम होऊ शकते.

मटाराच्या शेंगांचे तुकडे करावेत.

मिरच्या भाजून थंड झाल्या की त्यांचे तुकडे करावेत.

काकडी, काकडी शेंगांचे आणि मिरच्यांचे तुकडे एका भांड्यात एकत्र करुन घ्यावेत. वरुन २ चमचे डांगर पसरुन घालावे.

थोडे तेल गरम करुन त्यात हिंग, लाल मिरचीचे बी घालावे आणि ते तेल या भांड्यात पसरुन घालावे.

खायला घेताना चवीनुसार मीठ-साखर घालून मिसळून घ्यावे.

kosh1.jpgkosh2.jpg

अमेरिकेत वसंत सुरु झाला की मे महिन्यांत "फार्मर्स मार्केट्स" सुरु होतात. स्थानिक शेतकरी तिथं प्रोड्यूस घेऊन येतात. हा बाजार वीकेन्डला एक दिवस सकाळी भरतो. सुरुवातीला फुले, फळे, भाज्यांची रोपे, फुलांच्या हँगिंग बास्केट्स असं कायकाय येतं. मग प्रत्यक्ष भाज्या, पालेभाज्या, फळं, herbs आणि त्यापासून बनवलेले पदार्थ म्हणजे साल्सा, चटण्या, जेलीज, पास्ता सॉसेस या गोष्टी येतात.

छोटे व्यावसायिक ताजे ब्रेड्स, पेस्ट्रीज, केक्स आणतात. winery वाले वाईन्स आणतात. मांसाहारी प्रकारात ताजी अंडी नेहमीच मिळतात. बाकी मांसाचे प्रकार मिळतात. मटण आणि लँब मीट जरा नंतर मिळतं. आधी विचारलं तर अजून तयार नाहीत, पुढच्या महिन्यात कापू म्हणतात. मग कापून आणण्याआधी ऑर्डर घेतात, त्या वीकेन्डच्या आधी फोन करुन "घ्यायला या" म्हणून सांगतात.

परवा दोन गोर्‍या रोपं विकणार्‍यांकडं गेले तर ते इंग्रजीत म्हणाले "तुम्ही काय काय वाढवताय?" मग मी आपल्या काही भाज्यांची नावे आणि स्नेक, बिटर, रिज इ. आपल्याकडच्या गोअर्ड्सची नावे सांगितली. तर ते म्हणाले याला मागणी आहे आम्हाला माहीतच नव्हतं, नावं लिहून द्या. इथे पिकते हे? पुढच्या वर्षी आम्हीपण करु. मग मी नावं लिहून दिली, गवारी इ. सुद्धा.
हे मार्केट स्थानिक लोकांचे असल्याने त्यांच्याकडची रोपंही जवळपासच वाढणारी असतात ती जास्त चांगली टिकतात आणि वाढतात. इथे मटणाचा (गोट मीट) प्रवेश असाच झाला. मटण खाणारी जनता तिथे अ‍ॅगस बीफवाल्यांकडे जाऊन मटण आहे का विचारायची.

हे मार्केट ऑक्टोबर एन्डपर्यंत चालते. शेवटी शेवटी भोपळ्यांचे आगमन होते.

तर अश्या मार्केटमधून नुकत्याच येऊ लागलेल्या सॅलडच्या पानांचाही यात वापर करु शकतो. ती ऐनवेळी मिक्स करायची म्हणजे पचपचीत होणार नाहीत. किंवा ती पानात वेगळी घेऊन त्यावर ही कोशिंबीर वाढायची.

डांगराची चव चांगली येते. हे माझे अ‍ॅडिशन आहे. काही (विशिष्ठ) लोक ज्यात त्यात दाकू घालतात. शें. दाकू! ते घालू नये. सारखं चांगलं नसतं ते तब्येतीला.

तर तुम्हीही अश्या वासंतिक मार्केट स्पेशल रेसिपीज टाका.

वाढणी/प्रमाण: 
६ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

काही नाहीत.
(माहितीच्या स्त्रोतमध्ये इमेज टाकली तर दिसत नाही)

माहितीचा स्रोत: 
:)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसत आहे, करुन बघेन नक्की.
बर हे डांगर कुठे विकत मिळेल का घरीच तयार करुन ठेवतेस?

छान आहे की!

काही (विशिष्ठ) लोक ज्यात त्यात दाकू घालतात. शें. दाकू! ते घालू नये. सारखं चांगलं नसतं ते तब्येतीला. >>>>> Lol

दुसरा फोटो छान आहे पण डांगर घरात नाही आणि विशेष आवडतही नाही.
(वासंतिक कल्लोळानंतर बारा, डिसी, कॅरोलायना इ. मंडळींचं गटग वासंतिक कोशिंबीर म्हणून खपू शकेल. बरं ही मंडळी सिझनल नसून वर्षभर उपलब्ध असतात Wink )

अरे वा .. छान आहे .. फोटोही छान आहे ..

ज्यात त्यात दाण्याचं कूट छान लागतं, खमंग एकदम .. आम्हाला वाडतं .. आम्ही ह्यातही घालू .. Wink

चांगली दिसते आहे रेसिपी - रंगीबेरंगी. (रंगीच - बेरंगी का म्हणतात?!)
कल्लोळाला प्रात्यक्षिक दाखवा. Proud
(तरी आम्ही करताना बहुतेक दाण्याचं कूट घालूच. त्याशिवाय मिळून येत नाही. :P)

सायो Lol

माझ्याकडे शें. दा. कू. आहे आणि मी स्वतः घरी केलेलं डांगर आहे पण त्यात फक्त उडीद डाळ आहे जीरे बीरी नाहीत, मी दोन्ही घालीन पण मिरच्या न भाजता घालीन आणि दारचा पुदीना पण ढकलू का?

शिवजीने सिमला मिरची , ती पण लाल खाल्ली होती की कॉय?

मस्तं रेसिपी.
फार्मर्स मार्केटची माहिती भारी आहे.

म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला अमेरिक फार्मर्सनी पिकवलेल्या देशी भाज्या खायला मिळणार तर!

छान दिसतीये कोशिंबीर. करून बघीन.
>>>>(माहितीच्या स्त्रोतमध्ये इमेज टाकली तर दिसत नाही)
कसली इमेज टाकणार होतीस ह्याबद्दल जामच क्युरिऑसिटी आहे Proud