अष्टोत्तरी आणि विन्शोत्तरी

Submitted by आकाश नील on 31 May, 2013 - 16:45

माबोवर अनेक तज्ञ आहेत - त्यांच्यासाठी प्रश्न:

अष्टोत्तरी आणि विन्शोत्तरी महादशांपैकी कोणती पद्धत जास्त वापरली जाते (आणि का)?
कोणत्या पद्धतीचे अनुभव जास्त बरोबर येतात?

आधीच धन्यवाद Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर अमोल यांनी उत्तर दिलेच आहे. विशोत्तरी जास्त प्रचलित आहे.
गुरू व शनिचे भ्रमणकालाचे हिशोबाप्रमाणे ते बरोबरही आहे. गुरूची (१२ वर्षे प्रमाणे )दहा भ्रमणे व शनिची (३० वर्षे प्रमाणे) चार भ्रमणे असे मिळून १२० वर्षे कल्पिलेली आहेत. पैकी वयाचे साठावे वर्शी, गुरूची ५ भ्रमणे, व शनिची २ भ्रमणे पूर्ण होऊन जवळपास जन्मकालीन ग्रहस्थिती पुन्हा येते.

अष्टोत्तरीला मात्र केवळ गुरुचे ९ भ्रमणान्ची जोड आहे.
प्रसन्गविशेषत्वाने, व जातकाचे प्रश्नाचे स्वरुप लक्षात घेऊन या दोन्ही पद्धती वापरल्या जातात.

लिंबुजी,

वयाचे साठावे वर्शी, गुरूची ५ भ्रमणे, व शनिची २ भ्रमणे पूर्ण होऊन जवळपास जन्मकालीन ग्रहस्थिती पुन्हा येते. >>

संवत्सर या संकल्पनेचा जोतिषशास्त्रात काहीतरी वैशिष्ट्य असावे. एकुण संवत्सर ६०. म्हणजे साठाव्या वर्षी जन्मवर्षीचे संवत्सर येते.