एचडीएफसी लिमिटेड्च्या/बॅकेच्या गृहनिर्माण कर्जाबाबत माहिती

Submitted by हर्ट on 28 May, 2013 - 23:54

नमस्कार. मी पुण्यात बावधन मधे एक घर निवडले आहे. एकूण परिस्तिथी, वेळ, आपले रहाण्याचे ठिकाण हे सगळे बघता मी एचडीएफसीकडे लोनचा अर्ज भरला आहे. मला माहिती आहे इतर राष्ट्रीयकृत बँका खूप छान आहेत पण माझ्या काही समस्या आहेत ज्यावर मला सध्या जोर देता येत नाही.

तुमच्यापैकी कुणाचे बरे वाईट अनुभव आहेत ह्या एचडीएफसी बॅकेबद्दल? सांगाल का मला?

मी जे कर्ज घेतो आहे ते मला लवकरात लवकर अगदी पाच वर्षाच्या आत फेडायचे आहे. जर मी मधेच घाऊक रक्कम घरली तर ही बॅक स्विकारते का? काही शिवाय कर लावते का? त्यांचा रीपे-ऑप्शन कसा आहे?

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, ज्या एजन्ट थ्रु कर्ज घेतोस त्याने न विचारताही ही माहिती तुला दिली असेलच.
नसेल तर त्यालाच विचार.

मी एचडिएफसी मधुनच कर्ज घेतलय. काम फास्ट होतं.
लोकं थोडे फ्लेक्झिबल आहेत.
सध्या तरी नीटनेटकं सुरु आहे... सर्व..
मला दिलेल्या माहितीनुसार खालील मुद्दे

१) रिपेमेन्ट करु शकतो. त्यासाठी कसलाही चार्ज / पेनल्टी लागत नाही.
फक्त ज्या पैशातुन रिपेमेन्ट करणार ते स्वतः कमवलेले असावेत. पण मित्र / इतर नातेवाइक (आई वडील बायको सोडले तर) यांच्याकडुन उसने पैसे घेवुन अथवा दुसर्‍या बॅन्केत लोन टेक ओव्हर करुन रिपेमेन्ट करत असेल तर कर्जाच्या राहिलेल्या रकमेच्या २ टक्के इतकी पेनल्टी.

२) पहिल्या तीन वर्षात आपल्या राहिलेल्या कर्जाच्या जास्तीत जास्त २५ टक्के इतकेच पैसे आपण रिपेमेन्ट म्हणून करु शकतो.

३) तीन वर्षानंतर कितीही रिपेमेन्ट करु शकतो. मुद्दा नंबर एक लक्षात ठेवुन.

बी माझं ही होम लोन एच डी एफ सी मध्येच आहे. ४ वर्ष झाली आहेत ऑलमोस्ट. मला काही प्रॉब्लेम आला नाहिये अजून. सर्व काही सुरळित. बाकी झकासच्या पोस्टला अनुमोदन.

आणि एक विनंती वजा सुचना..कितीही वाईट वेळ आली तरिही आय सी आय सी आय कडून कर्ज घेऊ नकोस.

जर मी मधेच घाऊक रक्कम घरली तर ही बॅक स्विकारते का? << प्रत्तेक बँकेनुसार हा नियम वेगळा असू शकतो.
माझे आय. डी.बी. आय. चे लोन आहे, घाऊक रक्कम भरण्याबद्दल त्यांचा नियम आहे की ती रक्कम तुमच्या सेव्हीग मधली असली पाहीजे दुसरीकडून कर्ज काढुन भरलेली नसावी. कमीत कमी ४००००/- असे वर्षातून दोनदाच पेमेंन्ट करता येईल

बी, माझं ही गृहकर्ज HDFC मध्येच आहे, पहिलचं वर्ष आहे. अक्षरशः ७ दिवसात कर्ज मंजूर झालं. काही अडचण आली नाही. रिपेमेंट बद्दल सर्वांना अनुमोदन. आम्ही घरी प्लॉट घेण्यासाठीही HDFC निवडलं आणि कर्ज फेडेस्तवर काहीही अडचण नाही आली, त्यांच्याकडून.

एचडिएफसी जिंदाबाद....

गेली १७ वर्ष त्यांच्याशी प्रामाणिक आहे. बँकीग शी नीअटचा संबंध असल्याने एचडिएफसी शी फार नाते जुळले आहे. गेल्या १७ वर्षात ३ घरे घेतली. तिन्ही घरांचे लोन एचडिएफसी मधुनच घेतले.

सध्यच्या घरच्या वेळेला एस. बी. आय. चा अति म्हणजे अति वाईट अनुभव आला. ( त्यांच्याशी रोजचे कॉर्पोरेट संबंध असुनही... सगळ्या वरिष्ठंना ओळखुनही.... नगण्य लोन असुनही)...शेवटी नेहेमी प्रमाणे एचडिएफसी दारी गेलो तर.. रेड कार्पेट.... आधीची लोन हिस्टरी असल्याने अक्शर्शः ३ दिवसात चेक मिळाला...

वर झकासरावांनी झकास माहिती दिली आहे....

वर ..... तुम्ही जर एचडिएफसी चे लोन कस्टमर असाल आणि तुम्ही पुढे मागे त्यांच्या कडे डिपॉझीट ठेवायला गेलात तर ०.२५% इंटरेस्ट जास्त मिळतो. तुम्ही तुमचं नाव दुसरं टाकुन इतर जवळच्या नातेवाईकांचा फायदा करुन देवु शकता. माझ्या सा.बा, सासरे, आई ह्या सगळ्यांची नावं पहिली ठेवुन मी माझं नाव दुसरं टाकलं आहे आणि त्यांच्या साठी एचडिएफसी ने सीनीयर सिटिझन चा ०.५% + लोन बेनेफिट ०.२५ % असा जवळ जवळ ०.७५% रेट जास्त दिला आहे.....

माझ्या बाबांनी १९८३ मधे पुण्यच्या घर साठी एचडिएफसी मधुन कर्ज घेतलं होतं. तेंव्हा मी आठवीत होते. त्या वेळेस ते फक्त ९०,००० कर्ज देत. बांबानी यथाअवकाश कर्ज फेडुन त्यांचे डॉक्युमेंट सुखरुप परत घेतले. काहीही अडचण आली नाही.

आतातर एकदमच फ्लेक्जिबल....

तरिही आय सी आय सी आय कडून कर्ज घेऊ नकोस.>> Lol
हे मात्र खरं आहे हा...

एचडिएफसी चे लोन कस्टमर असाल आणि तुम्ही पुढे मागे त्यांच्या कडे डिपॉझीट ठेवायला गेलात तर ०.२५% इंटरेस्ट जास्त मिळतो>> हे नव्हतं माहिती.
धन्यवाद मो की मी. Happy

सगळ्यात महत्त्वाचे... घरासाठीचे कर्ज एचडीएफसी करते .. तर बाकीची कर्जे एचडीएफसी बँक करते... दोन्हीत फरक आहे.... दोन्हीचे मूळ एकच असले तरी दोन्ही संस्था वेगवेगळ्या कार्यरत आहेत...

माझेही लोन एचडीएफसीतच आहे... अजून पर्यंत काहीही अडचण आलेली नाही...

मोकिमी माहिती साठी धन्यवाद...

बी.. ५ वर्षात परतफेड करायची असेल तर पाच वर्षासाठीच लोन घेणार (इएमआय जास्त पडेल) की दहा वर्षासाठी घेऊन पाच वर्षात फेडणार (इएमआय कमी पडेल पण इन्टरेस्ट जास्त द्यावा लागू शकेल) ... दोन्ही प्रकारचे फायदे तोटे आहेत.. त्याचा नक्कीच विचार कर...

गृहकर्ज :
अ या गृहस्थाची ब आणि क ही दोन मुले आहेत .
'अ' यांचे दोन फ्लॅट आहेत..त्यामधला एक त्यांना विकून त्याचे पैसे दोन्ही मुलांना द्यायचे आहेत.

'ब' हा परदेशी असल्याने त्याला पैसे घेणे सोइस्कर आहे ..
'क' ला पैसे पेक्षा फ्लॅट असणे जास्त महत्वाचे आहे ..पण 'ब' ला देण्यासाठी एकरकमी पैसे नाहीत..

तर 'क' मुलगा 'अ' वडिलांकडून फ्लॅट विकत घेण्यासाठी बँकेकडे कर्ज मागू शकतो का ? बँक अशा नात्यामधल्या व्यवहारांना कर्ज देते का ?

हे खरेतर अतिशय सोपे आहे..

अ ने घर क ला विकावे.. आलेले पैसे ब आणि क ला निम्मे निम्मे देऊन टाकावे..

क घर विकत घेण्यासाठी बँकेकडून कर्ज काढू शकतो.. इथे नात्यांचा काहीच प्रश्न येत नाही...

जर अ ला घर मुलांच्या नावावर करायचे असेल तर मात्र गोष्ट वेगळी होईल...

मी २००२ साली एचडीएफसी चे लोन घेतलेले आहे. ३ दिवसात मंजुर केले. अजुन लोन चालु आहे.
आता पर्यंत सुरळीत चालु आहे. अनुभव एकदम बेस्ट!

मागे पुढे हप्ते झाले तरी योग्य मार्गदर्शन करतात. शक्यतो हप्ते वेळेवर भरावे. तसे झाले तर फोन करुन सांगावे.
२००२ साली लोन मंजुर झाले तेव्हा मी चेंबूर च्या एचडीएफसी ब्रान्च मधे पेढे घेऊन गेलो होतो. ज्याच्या कडे माझी फाईल होती तो अमराठी होता. मी त्याच्या टेबल वरती पेढ्याचा बाक्स ठेवला. काही सेकंदाच्या आत तो उठला, घाबरला आणी बोलला की "एसा यहा नही चलता! मुझे स्वीट नही चाहीये, मेरा यही काम ह य वह मय किया" त्याने पेढे घेण्यासाठी नकार दिला. त्याने मला ब्रान्च मॅनेजर कडे पाठवीले. तीथे सुधा नकार मीळाला. मी तिथे लगेच त्यांच्या परवानगीने ब्रान्च मध्ये सर्वांना पेढे वाटले. सगळे अवाक?

शेवटी एचडीएफसी मुळे घर झाले. कारण वेळेवर लोन मंजुर झाले. Customer Care Service पण छान आहे.

आता मंजुरीबाबत बोलायचे तर माझे कर्ज २ तासात मंजूर झाले.
त्याहीपेक्षा जास्ती म्हणजे माझ्या एलिजिबिलिटीपेक्षा २.५लाख वाढवून. कारण तेव्हढे कमी पडत होते.

मी मागच्याच महिन्यात ३.५ हजार भरून रेट ऑफ ईंटरेस्ट कमी करून घेतला. ११.४०% चा १०.१५% झालाय. ई एम आय ची अमाऊंट तेव्हढीच ठेवली आहे, वर्ष कमी झालीत आता.

कारण तेव्हढे कमी पडत होते.>> दक्षिणाच्याच मार्गदर्शनाखाली एजन्ट मुद्दाम अडवणुक करत असलेले एक काम मी डायरेक्ट बॅन्केत जाउन करुन घेतले होते.
त्यात जवळपास दहा हजार रुपयाना पडणारा फटका वाचला..

माझ्या नवऱ्याने २००७ मध्ये एचडिएफसी मधून कर्ज घेतले होते जे आता फेडून झाले होते. आम्ही पण ते मध्ये मध्ये रीपे केले आहे.

ज्या अर्थी तुम्ही बाहेर राहता त्या अर्थी तुमचे एनआरआय होम लोन खाते असेल. तर रीपे करताना नेहमी तुम्हाला ते remitt केलेल्या पैशांमधूनच करावे लागेल. आणि त्या खात्यात तुम्ही indian currency deposit करू शकत नाही. (हे तुम्हाला माहित असेलच. तुम्ही परत तपासून घ्या माहिती )

माझा एचडीएफसीचा अनुभवही उत्तम आहे. काम वेगात झाले. काही महिन्यापूर्वी इंट्रेस्ट रेट कमी करण्याचे कामही पट्कन झाले आणि मॅनेजरने सगळे व्यवस्थित समजावूनही सांगितले.

<<आणि एक विनंती वजा सुचना..कितीही वाईट वेळ आली तरिही आय सी आय सी आय कडून कर्ज घेऊ नकोस.>>>>+ १०००

दक्षिणाच्याच मार्गदर्शनाखाली एजन्ट मुद्दाम अडवणुक करत असलेले एक काम <<< दक्षिणा, अशा गोष्टींसाठी मार्गदर्शन करत जाऊ नकोस एजंटांना. Lol

आणि एक विनंती वजा सुचना..कितीही वाईट वेळ आली तरिही आय सी आय सी आय कडून कर्ज घेऊ नकोस.>>> अनुमोदन. फार वाईट अनुभव आहे त्या बँकेचा.

गजा Lol
तिने मला मार्गदर्शन केले रे.
एजन्टाला नाय काय?

बी ला पुण्यातल्या केटररचा देखील पत्ता ह्याच धाग्यात देवुयात...
Lol
तो लैच धागे काढतोय.

आयसीआयसी बंडल बँक आहे लोनच्या बाबतीत. लोकं तर एकदम माजोरडी.

एचडीफसी मी लोन घेतलेले होते, फेडले कधीच. काही प्रॉबलेम झाला नाही.

होम लोन साठी एचडीएफसी शिवाय चांगला पर्याय नाही. इंटरेस्ट रेट वाढत असेल आणि त्याचा बोजा EMIवर येत असेल तर RPLRची ठराविक रक्कम भरुन इंटरेस्ट रेट खाली आणता येतो.

रिपेन्ट बद्दलची माहिती तुम्ही स्वतःच बॅंकेकडून मिळवणे योग्य ठरेल. एचडीएफसीवाले चांगल मार्गदर्शन करतात.

बी, तू HDFC Ltd बद्दल बोलतो आहेस की HDFC Bank बद्दल? दोन्ही अजून merge झाले नाहीत ना?

HDFC मधून मी लोन घेतले नाही पण नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींचे अनुभव चांगले आहेत.

मी HDFC Ltd बद्दल बोलत आहे. तुम्ही नक्की कशाबद्दल लिहित आहत इथे? खूप फरक आहे का दोन्हीत?

१) HDFC Bank ही एक खाजगी (प्रायव्हेट) बँक आहे (जशा Axis Bank, ICICI Bank, Yes Bank,IndusInd Bank)
२) HDFC ही गृहवित्त क्षेत्रातील एक कंपनी आहे.
३) HDFC Bank चे प्रवर्तक (प्रमोटर) HDFC आहेत.

Pages