पापलेट/ सुरमयी(छोटी)/ बांगडा/ जीताड/ रावस, अशा कोणत्याही माशाच्या ७-८ तुकड्या , लसून ८-१२ पाकळ्या- वाटून, हळद १/४ चमचा, तिखट १/२ चमचा , चिंचेचा कोळ-घट्ट २ चमचे, मीठ चवी नुसार, वरून लावायला बारीक रवा, २ चमचे तेल.
प्रथम मासे स्वच्छ धुवून निथळावेत. त्याला रवा आणि तेल सोडता सर्व मसाला लावून ठेवावा. किमान अर्धा तास तरी मॅरीनेट करावे.
आता नॉनस्टिक पॅन मंद आचेवर तापवावे . गरम झाला की त्यावर २ चमचे तेल सगळीकडे पसरावे. आता माशाची प्रत्येक तुकडी बारीक रव्यात घोळवून तव्यावर टाकावी. त्यावर झाकण ठेवावे. आच मंदच ठेवा. ३-४ मिनिटे झाली की हळुवार पणे तुकड्या उलटवा. पुन्हा झाकण ठेऊन ३-४ मिनिटे ठेवा. आता झाकण काढून ३-४ मिनिटे तसेच थवा. नंतर हलक्या हाताने तुकड्या उलट्या करा. आच बंद करा. ५ मिनिटे तुकड्या पॅन वरच राहू देत. पाच मिनिटांनी लगेच खायला घ्या. तयार आहेत भाजूक तुकड्या !
फोटू?
फोटू?
दोघांनी पुरवून पुरवून
दोघांनी पुरवून पुरवून खाव्यात. >>>
मस्तच.
फोतो न ताकल्याब्द्दल निषेढ
फोतो न ताकल्याब्द्दल निषेढ
दक्षिणा +१०० !!!!!! न्हिशेद
दक्षिणा +१०० !!!!!!
न्हिशेद !! न्हिशेद !! न्हिशेद !!
दोघांनी पुरवून पुरवून
दोघांनी पुरवून पुरवून खाव्यात. >>> याबद्द्ल णिशेड!
छान प्रकार. आम्ही लोक फक्त
छान प्रकार.
आम्ही लोक फक्त फोटोतूनच "खातो" त्यामूळे पुरवठ्याचा प्रश्न नाही.
फोटो केल्या की लगेच काढेन
दिनेश दा, नेक्स टाईम ही सुधारणा करण्यात येईल