Submitted by ओजस on 26 May, 2013 - 03:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
तोतापुरी कैरी 1 किलो, साखर पाउण किलो, 2 इंच् दालचीनी चा तुकडा, 8-10 वेलची, थोडे केशर, 2-3 लवंगा
क्रमवार पाककृती:
आधी कैरी साले काढुन किसुन घ्या. आता स्टीलच्या भांड्यात कैरीचा किस आणि साखर घालुन हलवुन घ्या.
आता या भांड्याला एक पातळ फड्के बांधुन हे भांडे 15-20 दिवस उन्हात ठेवा. मधे- मधे 5-6 दिवसांनी जरा हलवा. 15-20 दिवसांनी मस्त मुरांबा तयार होईल. आता यात दालचीनी आणि वेलची यांची भरड पुड घाला. लवंगा अख्या घाला. केशर काड्या घालुन सजवा.हा उन्हातला मुरांबा वर्ष भर टिकतो.
अधिक टिपा:
1) तोतापुरी कैरी फार आंबट नसते, म्ह्णुन साखर कमी लागते.
कैरी आंबट असेल तर साखर किलोला किलो प्रमाणात घालावी.
2) आंबट गोड मुरांबा हवा असेल तर 1/2 किलो तोतापुरी कैरी + 1/2 किलो राजापुरी कैरी घ्यावी.
माहितीचा स्रोत:
सासुबाई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा