३-४ काकड्या,पाव किलो भाजलेला रवा,तेवढाच गूळ,काजू-खोबर्याचे तुकडे,छोटी वाटी साजूक तूप,वेलचीपूड चिमूट्भर बेकिंग पावडर(ऑप्शनल).
काकड्या किसून घेऊन त्यात गूळ घालून विरघळून घेणे. त्यात भाजलेला रवा घालावा.मिश्रण सरबरित असावे.
२-३ तास झाकून ठेवावे. आता रवा फुलून येईल.काजू-खोबर्याचे तुकडे,वेलचीपूड,घालावी. धोंडस करताना तूप कडकडीत तापवून मिश्रणात ओतावे.
पसरट भांड्याला (लगडीला) तूपाचा हात लावून मिश्रण त्यात ओतावे.चिमूट्भर बेकिंग पावडर(ऑप्शनल)मिसळावी.
मोठा बर्नरच्या गॅसवर तवा ठेवून भांडे तव्यावर ठेवावे.भांड्यावर झाकण /जाड तवा ठेवून गॅस मंद करुन ४०-४५ मिनिटे ठेवणे.
(अधून मधून झाकणावर जमलेली वाफ पुसून घेणे.नाहीतर पाणी मिश्रणात पडेल.)
भांडे गॅसवरून काढून बाजूला ठेवणे.थंड झाल्यावर भांड्याच्या कडेच्या बाजूने सुरी फिरवून ताटात उपडे करूनतुकडे पाडा.
उन्हाळा सोडल्यास २-३ दिवस राहते.
हे ईडलीसारखे उकडूनही करता येते. पण त्याच दिवशी संपवावे लागते.त्यात तूप घातले नाहीतरी चालते.
माझ्या आवडीचा पदार्थ. नेहमी
माझ्या आवडीचा पदार्थ. नेहमी वाफवलेला खाल्लाय. गॅसऐवजी अव्हन वापरुनही करता येईल बहुतेक.
साधना, हो ग! अव्हनमधे छानच
साधना,
हो ग! अव्हनमधे छानच होतो.मात्र मायक्रोमधे नाही केला.मी बर्याचदा कुकरमधे केला आहे.(शिट्टी व रिन्ग काढून
तसेच पाणी न ठेवता) सध्या नॉनस्टिकवर करते.
येळेकर, आमच्याकडचा हा खास
येळेकर, आमच्याकडचा हा खास श्रावणातला प्रकार.
ते काकड्या म्हणजे तवशे, असे मात्र नक्की लिहा.
'तवशे' नाव बर्याच दिवसांनी
'तवशे' नाव बर्याच दिवसांनी वाचले.
डोळ्यासमोर आला.
लगेच जाडाजुडा थोडासा जून काकडोबा
ते काकड्या म्हणजे तवशे, असे
ते काकड्या म्हणजे तवशे, असे मात्र नक्की लिहा.>>>>>>>>>>तरीच मला हे वाचल्यापासून, तवसोळ्या आठवतायत.
मी हे प्रकार फक्त ''वाचले''
मी हे प्रकार फक्त ''वाचले'' आहेत. (आयते) खाण्याचा योग कधी येतो बघायला पाहिजे!
दिनेशदा, प्रथम मीही तवसे
दिनेशदा,
प्रथम मीही तवसे लिहिले होते.पण पुन्हा विचार केला की नॉन कोकणींना तवसे म्हणजे काय
असा प्रश्न पडेल.म्हणून काकड्याच लिहिले. तसेही हा पदार्थ मी साध्या काकड्या घालून करते.
एकदम मस्त प्रकार. कुकर मधे
एकदम मस्त प्रकार. कुकर मधे नेहेमी करते. ओवन मधे करायचा झाल्यास किती वेळ बेक करावे?
पातोळे पण हेच का? फॉर सम रिजन
पातोळे पण हेच का? फॉर सम रिजन मला तो पदार्थ कधी आवडला नव्हता.
हे ज्यांनी कुणी केलं त्यांनी फोटो टाका नं जरा.
me_mastani , अव्हनमधे नक्की
me_mastani ,
अव्हनमधे नक्की आठवत नाही. बहुतेक २०-२५ मिनिटे!
यात पाण्याची वाफ पडण्याची भिती नाही.
वेका ,
पातोळे तांदळाच्या उकडीपासून गूळ खोबरे घालून बनवतात.
खरं सांगू, मलाही धोंडस तेवढेसे आवडत नाही.
येळेकर मला वाटते वेकाला
येळेकर मला वाटते वेकाला पातोळे आवडत नाहीत
हे ज्यांनी कुणी केलं त्यांनी फोटो टाका नं जरा.
अगं जरा जाडसर बर्फी कापल्यावर कशी दिसेल तसे दिसते धोंडस. यात नेहमी जुन म्हणजे पिकलेली काकडी वापरतात, ती चांगली हातभर लांब आणि दोन्-तिन इंच जाड असते. तिला कोकणात तवसे म्हणतात. आपण सलादला वापरतो ती काकडी ही नव्हे. त्यामुळे धोंडसाचा रंग साधारण हल्का पिवळसर पांढरा असतो. पण काकडी जर हिरवी असेल तर मात्र रंग थोडासा हिरवट होतो.
मुंबईत काकडी वापरुन करावे. गोकुळाष्टमीच्या सुमारास ब-यापैकी मोठ्या काकड्या येतात त्या मिळाल्या तर उत्तम.
साधना, अगं मी माझी आवड(?)
साधना,
अगं मी माझी आवड(?) सांगितली! मला धोंडस एवढे आवडत नाही.
वा मस्त पदार्थ.
वा मस्त पदार्थ. हं...........साध्या काकड्याही चालतात तर!
आजच केला होता धोंडस. मस्त
आजच केला होता धोंडस. मस्त झाला होता. धन्यवाद.
साध्या काकडीचं बनत नाही का?
साध्या काकडीचं बनत नाही का?
me_mastani , खूप छान! ऊकडून
me_mastani ,
खूप छान! ऊकडून केलेस का? सुंदर दिसतय!
मी अमि,
साध्या काकडीचं अगदी आरामात होते. मी त्याच काकड्याचे करते.
@ येळेकर, हो ऊकडून केले
@ येळेकर, हो ऊकडून केले कुकरमधे.
परवाच ही रेसिपी वाचली आणि
परवाच ही रेसिपी वाचली आणि तों.पा.सु.
मी सा.बा. करतात त्या प्रमाणे एक-दोन वेळाच करून पाहिली होती. त्या हे सरबरीत मिश्रण शिजवून घेतल्यावर दुसर्या सपाट बुडाच्या भांड्यात खाली हळदीची पाने पसरून त्यावर तूप सोडून शिजलेले मिश्रण त्यावर पसरतात. आणि मग ते झाकून जरावेळ गॅस वर ठेवतात.. पानांमुळे तळाला चिकटत तर नाहीच पण खरपूस वास मात्र जबरी सुटतो.. आवडत असेल आणि पानं मिळत असतील तर जरूर ट्राय करून पहा..:)
हळदीच्या पानाचा वापर करायची
हळदीच्या पानाचा वापर करायची पारंपारिक पद्धत आवर्जून सांगीतल्याबद्दल आभार सोन्चाफा !!
आता पर्फेक्ट झाली ही पारंपारिक रेसेपी !!
हळदीच्या पानाचा स्वाद मस्तच
हळदीच्या पानाचा स्वाद मस्तच असतो.कधी असतील त्यावेळी मी घालते.
सरबरीत मिश्रण शिजवून घेतल्यावर म्हणजे किती शिजवावे? मी जेव्हा
हा प्रकार करते, त्यावेळी गॅसवर हे ठेवून जेऊन घेते. बाकी आवरेपर्यंत
धोंडस तयार होते. बाकी बघायला लागत नाही!
हळदीच्या पानातले पातोळे...
हळदीच्या पानातले पातोळे... कित्ती वर्षात नाही खाल्ले. १०-१५ मिनिटे वाफ आणली की होतील, आई कुकर मध्ये एक दोन इंच उंच भांडे उपडे घालून त्यावर एक सपाट ताटली ठेवून परत एक जरा उंच भांडे ताटली वर ठेवते. आणि त्या भांड्याला टेकवून गोल पातोळे ठेवते. त्याने वाफ एकमेकांवर पडत नसावी.
ही पाने १-२ वेळा recycle पण करता येतात. वास टिकतो.
इकडे पान मिळतील आस वाटत नाही. ओली हळद कुंडीत लावली तर पान आली पाहिजेत ना.
ओली हळद कुंडीत लावली तर पान
ओली हळद कुंडीत लावली तर पान आली पाहिजेत ना.>>>>>>>>>>>येतात हो! कुंडीतल्या हळदीला छान पाने
येता.थोडी लहान येतात.आता तुमच्या तिकडची कल्पना नाही.
असाच फणसाचे सांदण करतात. गरे
असाच फणसाचे सांदण करतात. गरे वाटून उकडून करतात.
येळेकर, मी कालच धोंडस बनवले
येळेकर, मी कालच धोंडस बनवले होते.. मिश्रण दहा मिनिटं जरासं परतत शिजवून घेतलं मग पसरट भांड्यात खाली पानं पसरवली, त्यावर तूप घालून शिजवलेलं ( गोडाच्या शिर्याइतपत) मिश्रण थापून सारखं करून घेतलं आणि अंदाजे दहा मिनिटं (खाली तवा न ठेवता) बारिक गॅसवर ठेवलं.. खरपूस झालं होतं. पुढच्या वेळेस थोडी बेकिंग पावडर घालून कूकरमध्ये उकडून घेऊन बघेन.. मलाही काल तवसं मिळालं नव्हतं पण मी इथे मि़ळणारी बँगलोर काकडी वापरली होती.
अमितव, हळदीची पानं रिसायकल करता येतात हे मला माहित नव्हतं.
असाच फणसाचे सांदण करतात. गरे
असाच फणसाचे सांदण करतात. गरे वाटून उकडून करतात.>>>>>>>>>>हे आम्ही लहानपणी खाल्ले आहेत. छान लागतात.
सोनचाफा, तुमची रेसिपी वाचुन
सोनचाफा, तुमची रेसिपी वाचुन आठवले, माझी आई आधी असेच बनवायची धोंडस. तुमच्या कृतीसारखी कृती लहानपणी पाहिल्याचे आठवतेय.
नंतर तिनेही शॉर्टकट मारायला सुरवात केली बहुतेक...
छान
छान
Amchyakade ase kakdi n phanas
Amchyakade ase kakdi n phanas donhiche kartat..kakadiche tavsoli..n phansache sandan..mast garam garam ..n varun sajuk tup..tondala pani sutale..