सर्वप्रथम आपले या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचल्याबद्दल हार्दिक अभिनंदन।
१ प्रसन्न , तुम्ही मुळच्या कोणत्या गावाचे आहात ?
महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या भागात माझे बालपण गेले , विशेषत: कोल्हापूर,रत्नागिरी,रायगड जिल्ह्यातील पेण येथे आणि नंतर गेली २० वर्षे पुण्यात -
२. तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?
संगीतातील विशेषत: गाण्याच्या आवडीचा मागोवा घ्यायचा झाल्यास माझे आई वडील सांगतात म्हणून - माझ्या वयाच्या ३ ऱ्या वर्षापासून घ्यावा लागेल. लहान असताना माझे बोलणे सुद्धा गाण्यात असायचे - इति आमचे पालक :)
माझी हि नैसर्गिक गाण्याची आवड लक्षात घेऊन माझ्या आई वडिलांनी माझ्या वयाच्या ८ व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे धडे मला मिळण्याची व्यवस्था केली. पुढे कॉलेज दिवसात मी उपशास्त्रीय आणि सुगम संगीतात रस घेऊ लागलो या बाबतीत मी ज्यांना दैवत मानतो त्या पं . हृदयनाथ मंगेशकर , लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा शास्त्रीय व सुगम संगीताकडे पाहण्याचा दृष्टीकोन मला उपयोगी पडला .
३. संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात ? आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे ?
मी ७ वर्ष शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला आणि नंतर काही वर्षे सुगम संगेताचा . तसं तर शिक्षण हे कधीच संपत नाही त्यामुळे आजपर्यंत U S मध्ये होणार्या शास्त्रीय व सुगम संगेताच्या अनेक प्रसिद्ध व नावाजलेल्या कलाकारांच्या मैफिलींचा मनमुराद आस्वाद घेऊन ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे .
४. संगीतातील तुमचे गुरु कोण ?
पं . जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य श्री. चंद्रकांत नाईक हे माझे पहिले गुरु. माझ्यात जे काही गाण्याचे गुण असतील ते त्यांच्यामुळे. हिंदुस्तानी संगीतात मी काही करू शकलो ते केवळ त्यांच्यामुळे - हे मी मोकळेपणाने मान्य करतो.
५. तुमच्या संगीतातली विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल ?
महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागात तसेच उत्तर व दक्षिण भारतात व USA मध्ये साधारण ५०० कार्यक्रमांपैकी ३५० मराठी कार्यक्रम आतापर्यंत मी केले आहेत.
१. बीएमएम २००७ स्तुत्य उपक्रम - मम आत्मा गमला ( सुगम संगीत नियोजन ) - सचिन सुप्रिया पिळगावकर , रवींद्र साठे , सोनाली कुलकर्णी आदि नावाजलेल्या कलाकारांसमोर सादर केलेला कार्यक्रम
२. EL TV च्या मस्त मस्त या शो मध्ये विजयी
३. झी टी व्ही , दूरदर्शन व All India Radio कडून अनेक बक्षिसे
४. व्यावसायिक CD करिता पार्श्वगायन. उदा: - सप्तपदी ते सप्तपदी , गदिमाचे स्मरण , अनेक टीव्ही व रेडीओद्वारे जिंगल्स साठी गाणी .
५. pacific north west यांनी आयोजिलेल्या स्पर्धेत परीक्षक
६. मराठी छोट्या नाटकांचे संगीत दिग्दर्शन आणि पडद्यामागील सहाय्य
७. US मध्ये गेली १३ वर्षे चालू असलेला स्वराली ह्या उपक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभाग आणि सहाय्य .
८. कवी अनिल कांबळे यांच्या कवितांवर चालू असलेल्या अल्बमवर सध्या काम चालू आहे .
६. . संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात ?
आठवड्यातून किमान ५ तास तरी चांगल्या संगीतावर लक्ष ठेवून काम करतो . विक एंड कडे माझे सारखे लक्ष असते कारण त्याच वेळात मला माझ्या गाण्याकडे , संकलना कडे , साउंड इंजीनिअरिंग कडे लक्ष देता येते. अर्थात सियाटल व US मधील इतर ठिकाणी हि माझे कार्यक्रम कसे होतील या कडे सतत ध्यान ठेवून असतो कारण त्यामुळेच माझा उत्साह वाढतो.
७. तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते ? कोणाचे संगीत ऐकायला तुला जास्त आवडते ?
माझ्या आवडत्या गायिका - लता मंगेशकर , माझं आवडतं गाणं सांगणं अवघड आहे पण सांगायचेच झाले तर जिंदगी का सफर
माझे आवडते संगीतकार - हृदयनाथ मंगेशकर
८. आपल्या कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे ?
रोजचा रियाज - मुख्यत्वे करून
९. संगीता खेरीज आपले अजून काय काय छंद किवा आवड आहे ?
माझे रोजचे काम आणि कुटुंब यासाठी वेळ देऊन उरलेल्या वेळात संगीत , संगीत रचना यात माझा एव्हढा वेळ जातो कि मला इतर छंदासाठी वेळ मिळत नाही. आणि खंर सांगतो संगीत हा माझा इतका विरंगुळा आहे कि त्यात पुढील काळात मला जास्तीत जास्त काय करता येईल याचा मला ध्यास आहे .
१०. आपल्या कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत ?
tracks वरून सराव आणि गाण्यातील शब्द लक्षात ठेवणे या वर मी खूप मेहनत घेतली .
११. आपला कौटुंबिक परिचय ?
माझी पत्नी भक्ती हि उत्तम गाणारी आहे . मला दोन मुले आहेत अर्चित आणि अन्विता .
खालील लिंक्स वर तुम्ही मी गायलेली काही गाणी ऐकू शकाल .
दयाघना - http://youtu.be/36wF1hYOvGI
लळा जिव्हाळा - http://youtu.be/Jd5wHo7K9kc
medley - http://youtu.be/ZKmxtBtHkl8
माझी website - http://www.ganapule.com/index-2.html
कृपया मला मत देण्यासाठी - http://www.bmm2013.org/culturalprograms/saregama.html
मुलाखत शब्दांकन : सरिता देशपांडे, मराठी अनुवादः सुरेश डीके, फोटो : दिपाली खानझोडे.
प्रसन्न ला खुप सार्या
प्रसन्न ला खुप सार्या शुभेच्छा !
प्रसन्नला शुभेच्छा. त्याने
प्रसन्नला शुभेच्छा. त्याने गायलेले दयाघना खूप आवडते गाणे आहे.
प्रसन्नला पुढील वाटचाली करता
प्रसन्नला पुढील वाटचाली करता शुभेच्छा!!
हार्दिक शुभेच्छा, प्रसन्न!
हार्दिक शुभेच्छा, प्रसन्न!