Submitted by देवकी on 17 May, 2013 - 12:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोदकं कळपुटी
सहित्यः २ वाटे मोदकं ,२ मोठे कांदे,३ हिरव्या मिरच्या, थोडे आले, ओले खोबरे, कोथिम्बिर,२-३ कोकमे
क्रमवार पाककृती:
क्रमवार पाककृती: मोदकांना (आम्ही वेरल्या म्हणतो) मीठ् + हळद लावावे. मिरचीपूड २चमच्रे घालणे.
तेलावर बारीक चिरलेला कांदा,बारीक चिरलेले आले,हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकुन शिजविणे.त्यात
मोदकं टाकून झाकण लावून प्ण पाणी न घालता २ मिनिटे शिजवावे.त्यात ओले खोबरे, कोथिम्बिर चिरून घालावी. .गरम असतानाच कोकमे घालावी.
अशीच कळपुटी पापलेटची पण करतात.
संपादन
वाढणी/प्रमाण:
३ जण
माहितीचा स्रोत:
माझी आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान रेसिपी. पण तुम्ही रेसिपी
छान रेसिपी.
पण तुम्ही रेसिपी शब्दखुणांमधेही टाकलेली दिसते आहे. तिथे फक्त ती पटकन शोधता यावी असा एखाद-दुसरा शब्द लिहायचा असतो. तेवढं बदलाल का?
मस्त पाकृ.
मस्त पाकृ.
मोदक म्ह्णजे आपण करतो तसले
मोदक म्ह्णजे आपण करतो तसले सारण घालुन मोदक? कि ह काही वेगळा प्रकार आहे?
हसु नका बरे , पण नाहीच कळाले ...
रिमझिम बरोबर. बहुतेक तिखट
रिमझिम बरोबर. बहुतेक तिखट सारण घातलेले मोदक असावेत. त्याची आमटी करतात हे माहित आहे. पण तयार असे मोदक मिळतील का? त्यावरून ते कुठल्यातरी माशाला मोदक म्हणत असावेत असा संशय आला
(दक्षता जास्त वाचल्याचा परिणाम असावा.) माझी अवस्था पण तुझ्यासारखी झाली - नाही कळले.
मोदकं हा माशांचा प्रकार आहे.
मोदकं हा माशांचा प्रकार आहे. जागूची मासे सिरिज वाचत चला म्हणजे अज्ञानाचा अंध:कार दूर होइल
स्वाती, मलाही ते खूप खटकले
स्वाती,
मलाही ते खूप खटकले आहे.पण पहिलाच प्रयत्न आहे. < तेवढं बदलाल का? > कसे बदलायचे
कळत नाही. तेव्हा क्षमस्व!
क्षमस्व काय! कसं बदलायचं
क्षमस्व काय! कसं बदलायचं 'तेवढं सांगाल का?' विचारलं की मी सांगू की!
मलाही रिमझिम म्हणते आहे तसाच
मलाही रिमझिम म्हणते आहे तसाच प्रश्न पडला होता..
लोला, खरच सांग. रिमझिम,
लोला,
खरच सांग.
रिमझिम, सिमंतिनी,
मोदकं मासे आहेत.(क वर अनुस्वार आहे.)
बी काय हे! मोदक कधीपासून वाट्यावर मिळायला लागले?
वर रेसिपीच्या नावाच्या बाजूला
वर रेसिपीच्या नावाच्या बाजूला तुम्हाला 'संपादन' असे लिहीलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. मग एडिट करता येईल. 'शब्दखुणा' मध्ये रेसिपी लिहीली आहे ती काढून टाका. मोदकं आणि कळपुटी एवढं अॅड करा त्यात.
मोदकं आणि कळपुटी एवढं अॅड
मोदकं आणि कळपुटी एवढं अॅड करा की.
लोला थँक्स !
लोला
थँक्स !
येळेकर फोटो टाकत जावा की
येळेकर फोटो टाकत जावा की पाकृचा
कोकमे = आमसुले का हो ?
रच्याकने :मोदकं माशाचा प्रकार आहे हे वाचून फूट्भर उड्लो मी काय काय नावं ठेवतात लोक माशांना
असो आपल्याला काय आम्ही शाकाहारी आहोत
कळपुटी माशांचीच करतात कोकमे
कळपुटी माशांचीच करतात
कोकमे म्हणजे आमसुलेच!
वैभव वसंतराव कु... अहो ते काम
वैभव वसंतराव कु...
अहो ते काम जागूच करु जाणे!
मला तर प्रश्नच पडलेला आहे की ती कॅमेरा घेऊन स्वयंपाक कशी काय करते?
टाक फोडणी काढ फोटो!