Submitted by हर्ट on 14 May, 2013 - 04:36
मला एक माहिती मिळाली की नवीन घर ज्याचे पुर्ण बांधकाम झाले आहे... अशा घराचे एक दोन लाख रुपये दिल्यानंतर लगेच घराचा ताबा मिळतो. हे खरे आहे का? की असे काही केसेस मधे होते काही नाही?
जर घराचे निम्मे पैसे रोकड दिलेत आणि निम्मे कर्ज काढून तर घराचा ताबा लोनची रक्कम मिळेपर्यंत मिळत नाही असे आहे का?
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बी.. कुठलाही बिल्डर पुर्ण
बी.. कुठलाही बिल्डर पुर्ण पैसे मिळाल्याशिवाय वास्तूचा ताबा देत नाही.
पैशाची देवाण घेवाण आणि ताबा
पैशाची देवाण घेवाण आणि ताबा हा अगदी विकणारा आणि विकत घेणारा यांच्या आपसातला विषय आहे. काही बिल्डर्स पुर्ण पैसे घेतल्याशिवाय ताबा देत नाहीत. माझे पुर्ण पैसे देऊनही २ आठवडे ताबा मिळाला नव्हता. पुढे व्हॅट च्या इशूमुळे ही माझे घराचे कागदपत्रं (कंप्लिशन सर्टिफिकेट वगैरे) त्याने रिलिज केले नव्हते. असेही बिल्डर्स असतात.
छोटे बिल्डर्स अंडरस्टँडिंग वर पैशाची तारिख, ताबा पुढे मागे करू शकतात. आत्ता हेच माझा कलिग सांगत होता की त्याला २००७ साली बिल्डरने ताबा दिला.. आणि तो त्याचे पैसे अगदी मागच्या वर्षीपर्यंत देत होता.