Submitted by हर्ट on 13 May, 2013 - 06:34
माझे काही प्रश्न आहेतः
१) घरासाठी जर लोन घ्यायचे असेल तर कुठली बॅक आजमितिस चांगली आहे?
२) लोन मिळायला किती दिवस लागताद?
३) कुठली कागदपत्र द्यावी लागतात?
४) एन आर आय म्हणून लोन घेणे कितपत योग्य/फायदेशीर आहे?
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्यामते एस बी आय बेस्ट होम
माझ्यामते एस बी आय बेस्ट होम लोन मध्ये पण अतिचशय किचकट प्रोसेस.
वेळ फार लावतात.
मी एचडीएफसी बॅन्केतुन घेतलय.
खाजगी बॅन्कातली जरा कमी चोर बॅन्क असेल अस वाटतय.
माझे आणि बॅक ऑफ ईंडियाचे
माझे आणि बॅक ऑफ ईंडियाचे गेल्या १५ वर्षापासून व्यवहार आहेत. ही बॅक होम-लोनसाठी कशी राहील?
घर निश्चित होण्यापुर्वीच होम लोनसाठी अर्ज करता येतो का?
मी एल. आय. सी. हाऊसिंग
मी एल. आय. सी. हाऊसिंग फायनान्स मधुन घेतले होते. प्रोसेस बरीच सरळ आहे.
घर निश्चित होण्यापुर्वीच होम
घर निश्चित होण्यापुर्वीच होम लोनसाठी अर्ज करता येतो का?>>
हो. प्री सॅन्कशन लोन घेतलेले बरे!
Nationalise banks बेस्ट फॉर
Nationalise banks बेस्ट फॉर होम लोन्स. आम्ही Bank of Baroda मधुन होम लोन घेतले. सगळे म्हणतात किचकट प्रोसेस, पण जर पेपर्स रेडी असतील तर किचकट होत नाही.
सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे दोन/तीन इन्स्टॉल्मेंट नंतर प्रीपे करू शकता. एक्स्ट्रा चार्जेस नाहीत. माझ्या कलिग ने आयसीआयसीआय बॅन्केतुन घेतले आहे. त्याला लोन प्रीपे करायचे असल्यास चार्जेस लागतील म्हणून सांगीतले.
BOB मधे जास्त रक्कम जमा केल्यास लगेच रीवाईस स्टेट्मेंट देतात. इन्ट्रेस्ट calculation मधे लगेच फरक पडतो.
खाजगी बॅन्केतून लोन घेणार्याना calculations नीट माहीत नसतात.
एस बी आय मधून मिळाले तर नक्कि घ्या. All the best.
माझ्या वडलांचे होम लोन बँक ऑफ
माझ्या वडलांचे होम लोन बँक ऑफ इंडियामधूनच घेतले आहे. आधी आयसीआयसीआय मधून लोन घेतले होते. पण त्यांची एकंदर पद्धत आम्हाला अजिबात आवडली नाही, हप्ते भरलेले असूनसुद्धा त्यांनी दोनदा आमच्या घरी त्यांचे रीकव्हरी एजंट (म्हणजे गुंड) पाठवले होते. हप्त भरल्याची पावती दाखवूनसुद्धा ते गुंड रस्त्यात उभं राहून शिव्या देऊन गेले होते. त्यानंतर रीतसर तक्रार वगैरे करून काही उपयोग नाही. उलट, तुम्हीच हप्ते वेळेवर भरत चला असा सल्ला आईला मिळाला. हप्ते भरण्यात उशीर आजवर कधी झाला नाही हे सांगितल्यावर, मग यापुढे पण करू नका, मग घरी कुणी येणार नाही असा आचरट सल्ला मिळाला.
त्यानंतर आम्ही ते गृहकर्ज बॅन्क ऑफ इंडियामधे करवून घेतले आजवर काहीही त्रास झालेला नाही. मधे आईवडील मुंबईत असताना हप्ते भराय्ला उशीर झाला आणि तसं त्यांना फोनवर कळवलं तरी त्यांनी काही त्रास वगैरे दिला नाही. आता २०१४ मधे लोन संपत आलंय.
एसबीआय ची कोरेगांव पार्कात
एसबीआय ची कोरेगांव पार्कात स्वतंत्र एनआरआय शाखा आहे. तिथे चौकशी करून बघ. तुझ्या डॉक्युमेंटसबद्दल आणि घर घेण्याच्या प्रोजेक्टबद्दल आधीच कल्पना देऊन ठेव. घरातल्या एका केसमध्ये त्यांनी लोन आधीच सँक्शन करून ठेवले होते, आणि अॅप्लिकांट भारतात आला त्याच दिवशी लोन अॅग्रीमेंटची अॅपाईंटमेंटही ठेवली होती. एका दिवसात सारे उरकुन घेतले त्यांनी. एसबीआय मध्ये नॉर्मली अशी वागणूक मिळत नाही, त्यामुळे जरा चकितच झालो होतो.
पण माझं म्हणणं, बँक ऑफ इंडियाशी आधी बोलावं. तुझे खूप वर्षांपासून व्यवहार आणि अकाऊंट असल्याने अगदीच अबकड पासून सुरूवात होणार नाही, असं वाटतं. जुने, खात्रीचे आणि (तुलनेने) सुरक्षित असे खातेदार बॅकांनाही कर्जदार म्हणून हवेच असतात. शाखाधिकार्यांशी आधीच फोनवर बोल. 'मला वेळ कमी आहे, त्यादृष्टीने कसं करता येईल' हे आधीच बोलून ठेव. एनआरआय असल्याचेही आधीच सांग. शिवाय कर्जासाठी एसबीआयशीही बोलतो आहे, असं स्पष्ट सांग.
बॅ़क ऑफ इंडियात प्रिसँक्शन लोन ची प्रोसेस आताच चालू करून ठेऊ शकतोस. घर फायनल होण्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. कर्जाचे दोन भाग असतात- १) तुमची इलिजिबिलिटी २) प्रॉपर्टीची इलिजिबिलिटी . यातला पहिला भाग आधीच करून ठेऊ शकतोस.
बाकी घराबद्दल- रिमोट माहितीवर
बाकी घराबद्दल- रिमोट माहितीवर फार विश्वास ठेऊन फायदा नाही. मोठा निर्णय आहे, त्यामुळे तो तू स्वतःच घ्यायला हवास. फारतर जवळच्या एखाद्या मित्रा/ नातेवाईकाला ७-८ लोकेशन्स शॉर्टलिस्ट करून ठेवायला सांगू शकतोस. आणि आल्यावर दोन दिवसात ती सारी धडाधड बघून निर्णय घेऊ शकतोस. मात्र त्या मित्रा/नातेवाईकावर काम सोपवण्याआधी १) तुझं बजेट २) साधारण पसंतीची ठिकाणे / उपनगरे या दोन गोष्टी फायनल कर.
रिमोट माहितीवर फार विश्वास
रिमोट माहितीवर फार विश्वास ठेऊन फायदा नाही. मोठा निर्णय आहे, त्यामुळे तो तू स्वतःच घ्यायला हवास. फारतर जवळच्या एखाद्या मित्रा/ नातेवाईकाला ७-८ लोकेशन्स शॉर्टलिस्ट करून ठेवायला सांगू शकतोस. आणि आल्यावर दोन दिवसात ती सारी धडाधड बघून निर्णय घेऊ शकतोस. मात्र त्या मित्रा/नातेवाईकावर काम सोपवण्याआधी १) तुझं बजेट २) साधारण पसंतीची ठिकाणे / उपनगरे या दोन गोष्टी फायनल कर.>> +१!
आणि कोणतेही घर मनापासून नाही आवडले, तर घेऊ नकोस! घर घेणे ही एक खूप मोठी गुंतवणूक आहे. शंका असेल किंवा असमाधान असेल, तर मारून मुटकून डील करू नकोस.
एस.बी. आय. माझा बेस्ट
एस.बी. आय.
माझा बेस्ट ऑप्शन.
पेपर्स तयार असतील तर २० दिवसात बिल्डरला पैसे मिळतात. (स्वानुभव)
साजिरा, आजकाल लोन खातं खूप प्रोफेशनल आहे एस.बी. आय. चे.
आमचे एस.बी.आय. आहे. प्रीपेमेंट स्वतःच्या पैश्याने केले तर काहीही चार्जेस नाहीत.
रेट ऑफ ईंटरेस्ट, लोन कालावधीत एकदाच बदलता येत. उर्वरीत मुद्दलाच्या ०.०५% घेतात ते त्यासाठी.
SBI बद्दल +१. एकूणच
SBI बद्दल +१. एकूणच राष्ट्रियीकृत बँका चांगल्या.
आणि कोणतेही घर मनापासून नाही
आणि कोणतेही घर मनापासून नाही आवडले, तर घेऊ नकोस! घर घेणे ही एक खूप मोठी गुंतवणूक आहे. शंका असेल किंवा असमाधान असेल, तर मारून मुटकून डील करू नकोस. <<< अनुमोदन.
धन्यवाद! इतक्या कमी वेळात
धन्यवाद! इतक्या कमी वेळात खूपच छान माहिती मिळाली आणि घर घ्यायला जो धीर हवा असतो तोही ह्यातून मिळतो आहे.
घराच्या लोनसाठी नक्की कुठली कागदपत्रे हवी असतात ह्याबद्दल एक अंदाज मिळू शकेल का?
पुण्यात सध्या माझी पुतणी घर शोधते आहे. उन्हाळ्याच्या सुट्या आहेत म्हणून बहिण देखील तिला मदतीला आहे. पण पुण्याची जास्त माहिती पुतणीलाच आहे. भाचा पण पुण्यात आहे पण तो नोकरी करतो म्हणून फार वेळ देऊ शकत नाही.
६ महिन्यांची बँक
६ महिन्यांची बँक स्टेटमेंट्स
३ फोटो
३ पे स्लिप्स
पासपोर्टची कॉपी
सहाअवेदकाची सगळी हिच कागदपत्रे.
इतर उत्पन्न किंवा कर्ज असल्यास त्याची कागदपत्रे
बिल्डरचे पूर्ण पेपर ( सी सी सकट), (कन्वेअन्स सकट)
काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (किती % झाले त्याचे, वास्तुविशारद देतो)
सेकंडचा असल्यास -
सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र
मालमत्ता भरल्याची पावती
शेअर सर्टीफिकेट्स
लोन असल्यास, बँकेचे डिटेल्स आणि मॉर्गेज अॅग्रीमेंट
मला एवढाच अंदाज आहे.
एन आर आय स्टेटस आहे का? तर त्याची नक्की महिती मला नाही.
SBI >> +1 फार पेपरवर्क लागतं
SBI >> +1
फार पेपरवर्क लागतं , पण नंतर कटकट नसते .
आम्ही DHFL मधून घेतल होतं तिथलाही अनुभव चन्गला आहे , फार चटकन काम झालं
पण शेवटी राष्ट्रीयक्रुत बँकाचा भरवसा महत्वाचा .
एक वर्शानी SBI मध्ये takeover केलं .. आता EMI ही थोडा कमी जातोय
एन आर आय ना व्याजदर
एन आर आय ना व्याजदर वेगळे(जास्त) असतात. चौकशी करा.
एच डी एफ सी बँक घरपोच सेवा..
एसबीआय चा चांगला अनुभव हा
एसबीआय चा चांगला अनुभव हा अत्यल्प लोकांना येतो. तुम्ही त्याच्या नादी लागू नका असा सल्ला माझ्या बायकोने तिच्या एका डील मधे खरेदीदाराला दिला. त्याच्या मते एसबीआय चे रेट कमी आहेत व त्याचे एक नातेवाईक त्याला बँकेचे लोन मिळवून देणार होते. त्याने तिचा सल्ला ऐकला नाही. परिणामी त्याचा व्यवहारावर परिणाम होउन त्याला व्हेंडरच्या बँक लोनचा एक अतिरिक्त हप्ता भरावा लागला. वेळ व मनस्ताप तर वेगळाच. कट टू कट प्रोग्राम असेल तर एसबीआय च्या अजिबात नादी लागू नका.
एस.बी. आय. चा मलाही खुप
एस.बी. आय. चा मलाही खुप चांगला अनुभव आला आहे. आपले पेपर्स ओके असल्यास काहीही अडचण येत नाही. आताचा नवीन स्टाफ़ही प्रोफ़ेशनल आहे... सो नो प्रोब्लेम!
आणि तुलनेने एसबीआयचा व्याजदरही कमी आहे!
so go for it!
SBI >> +1००
SBI >> +1००
बी, जर तू होम लोन घेतल्यावर
बी, जर तू होम लोन घेतल्यावर पुण्यात राहणार असेल तर राष्ट्रियीकृत बँकचे होम लोन चांगले.. SBI बँक सगळ्यात चांगली... RBI ने व्याजदर कमी केले तर SBI बँक लगेच तो Benefit होम लोनरला देते.. प्रॉव्हेट बँका तो Benefit होम लोनरला एक/ दोन महिन्यानी देते... पण प्रॉव्हेट बँकेची (खास करुन आयसीआय) Online Service खूपच छान असते..
दुसर महत्त्वाचं, होम लोन देताना बॅक घराचं Technical Audit करते.. ती खूप किचकट प्रोसेस असते... ते Avoid करण्यासाठी बिल्डरने Listed केलेल्या किंवा त्या बिल्डींगमधल्या इतर घरमालकांनी ज्या बॅक/ ब्रांचमधून घेतले तिकडून घ्यावे.. मग ती बॅक/ब्रांच घराचं Technical Audit लवकर करते कारण त्याचाकडे Data उपलब्ध असतो..
होम लोन देणे आणि न देणे हे बॅक ठरवते... राष्ट्रियीकृत बँक जास्त रिस्क घेत नाही आणि म्हणून ते प्रत्येक काम सावकाश आणि पूर्णपणे पडताळून करतात... ह्यामध्ये तुमच्या बिल्डरचे सहकार्य लागते.. Online Service प्रत्येक Service साठी नसते आणि काही Service १००% online नसतात..
प्रॉव्हेट बँकेचे Hidden charges असू शकतात.. पण mostly सगळ्या Services ह्या Online असतात.. RBI guidelines मुळे काही Services ह्या Online नसतात (Loan Agreement/ Final Loan Settlement)
नवीन RBI guidelines मुळे कोणतेही बँक आता परतफेड लवकर करायला Addiitonal charges घेत नाही..
टीप - जर तुम्ही Preferred Customer असाल तर प्रॉव्हेट बँका सगळ्या Services घरपोच आणि Prioritzed based वर देतात..
एस बी आय.............भारतातली
एस बी आय.............भारतातली सर्वात भिक्क्कार बँक आहे..... साधे खाते उघडायला गेलात तरी असे काही भाव आनतात की आपण लोन मागायला आलोय... एक तर काम वेळेवर करत नाही .....वर असे बोलतात जसे ते काम करुन आपल्यावरच उपकार करत आहेत...
५ पैसे जास्त द्या पण आरामात काम होईल अशीच बॅंकेत लोन घ्या......... पैसे देउन मनस्ताप नाही घ्यायचा...
SBH पण बघा.. SBI चे फायदे आणि
SBH पण बघा.. SBI चे फायदे आणि जरा चांगला अॅटिट्युड.. आम्ही कुटुंबात ३ गृहकर्ज त्यांच्याकडुन घेतली आहेत..अनुभव एकदम चांगला..
ICICI कडे जाऊ नक. एकदम चोर
ICICI कडे जाऊ नक. एकदम चोर लोक आहेत. तसेच अजून एक सल्ला - ICICI Prudential कडे कोणतीही policy घेऊ नका . माझ्याकडे दोन्ही आहेत. अतिशय खराब अनुभव.
साधे खाते उघडायला गेलात तरी
साधे खाते उघडायला गेलात तरी असे काही भाव आनतात की आपण लोन मागायला आलोय... एक तर काम वेळेवर करत नाही .....वर असे बोलतात जसे ते काम करुन आपल्यावरच उपकार करत आहेत...
>> याला अनुमोदन. आम्ही चेन्नईत आल्यावर घराजवळील बँकेमधे अकाऊंट उघडायला आणि लॉकरची चौकशी करायला गेलो असताना त्या मॅनेजरने आमचे म्हणणेदेखील ऐकून घेतले नाही. त्या बोर्डवर डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे ती कागदपत्रे असतील तर पुढे बोला वगैरे भाषा. पासपोर्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड असून उपयोग नाही. (आमच्याकडे तेव्हा अजून चेन्नई अॅड्रेस प्रूफ नव्हता असे त्याचे म्हणणे). रेंट अॅग्रीमेट चालत नाही म्हणाला, एम्प्लॉयर्स लेटर चालत नाही, इतर बॅकेचं (म्हणजे स्टेट बॅक ऑफ ट्रावणकोरचे) क्रेडिट कार्ड बिलिंग अॅड्रेस चालत नाही, मोबाईल फोन बिलींग अॅड्रेस चालत नाही (फोन क्या रिक्षावाले के पास भी होता है, वो अॅड्रेस प्रूफ कैसे चलेगा?) पोस्टामधे अॅड्रेस प्रूफ ला अर्ज दिलाय तेव्हा ते काम चारपाच दिवसांत होईल तेव्हा अॅड्रेस प्रूफ आणून देते म्हटल्यावर ऐकून घ्यायला तयार नाही.
कागदपत्रांमधे काही कमीजास्त असेल तर नीट भाषेत सांगणं सोडून नुसती दादागिरी आणी मुजोरी. सरळ त्या बँकेतून बाहेर पडलो. जवळच इंडियन बँक आहे; त्यांच्याकडे गेलो तर अक्षरशः दहाव्या मिनीटाला पासबूक हातात होतं आमच्या.
SBI home finance (not
SBI home finance (not bank)
पेपरवर्क आणि सुरुवातीला थोडाफार व्याप होऊ शकतो (आम्हाला झाला नाही - पण ते प्रत्येकाच्या व्यापाच्या व्याख्येवरही ठरतं), पण फसवाफसवी नाही.
५० लाखाचं कर्ज घेतलं तर व्याज वगैरेची रक्कमही थोडीथोडकी नसते - त्यामुळे ५ पैसे जास्त गेले तरी म्हटलं तरी ते ५ पैसे न होता बरेच होतात.
तुम्ही लोन प्रीपे केलत (पूर्ण बंद नव्हे) तरी त्यावर ओडी काढू शकता जो त्या वेळच्या व्याजदरानुसार असेल.
म्हणजे माझं सध्याचं आऊटस्टँडिंग प्रिन्सिपल ४५ लाख असेल आणि मी २० लाख भरले
तर माझं व्याज २५ लाखानुसार कॅलक्युलेट होईल, पण लोन संपेपर्यंतच्या काळात मी ते २० लाख रुपये गरज पडल्यास पुन्हा उचलू शकते.
IDBI च्या प्रिपेमेंटच्या वेळेस कटकट झालेली दर वेळेस. लोन बंद करायच्या वेळेसही.
खूपच छान मोलाची माहिती.
खूपच छान मोलाची माहिती. धन्यवाद.
काल मी आमच्या अकोल्यातील बॅक ऑफ ईडियाशी बोललो. आमच्या घरातील प्रत्येकाचे तिथे खाते आहे आणि ते सर्वांना खूप छान ओळखतात. १५ वर्ष मी त्यांच्याशी व्यवहार करतो आहे. त्यांचे व्याजाचे दर १०.२० आहेत. मी त्यांच्याचकडून लोन घेणे योग्य आहे का? त्यांच्याशी मी फोनवर बोललो. तर ते म्हणाले की प्रत्येक हाऊसिंग प्रोजेक्टची मास्टर फाईल असते. ती तुम्ही आम्हाला द्या आणि लोन घ्या. त्याशिवाय आम्ही लोन देत नाही.
मास्टर फाईलबद्दल माहिती मिळेल का?
अकोल्यात एस बी आय बॅक आमच्या अगदी घरासमोर आहे. तिथे माझे नाही पण आईचे पेन्शनचे खाते आहे. सिनीअर सिटिझनला हाऊसिंग लोन मिळते का कमी व्याजाच्या दरात?
पुण्यात घर घेताय ना? मग लोन
पुण्यात घर घेताय ना? मग लोन अकोल्यात का?
पुण्यात घर घेताय ना? मग लोन
पुण्यात घर घेताय ना? मग लोन अकोल्यात का?>>
जाईजुई, मी मुळचा अकोल्याचा आहे. माझे अकोल्यातील बँकाशी व्यवहार आहे. म्हणून मी पुण्याच्या घरासाठी अकोल्यातून लोन घ्यायचा विचार करत आहे. आता तू मला विचारात पाडल की जर आपण पुण्यात घर घेत आहोत तर अकोल्यातील बॅक ऑफ ईंडियातून लोन मिळेल का?
मी एस. बी. आय. च्या
मी एस. बी. आय. च्या संकेतस्थळावरुन होमलोनसाठी लागणार्या कागदपत्रांची यादी पाहिली. ती अशी आहे. ही यादी बरोबर आहे का?:https://www.sbi.co.in/user.htm
DOCUMENTS
[Print Page]
List of papers/ documents applicable to all applicants:
·
Completed loan application
·
3 Passport size photographs
·
Proof of identify (photo copies of Voters ID card/ Passport/ Driving
licence/ IT PAN card)
·
Proof of residence (photo copies of recent Telephone Bills/ Electricity Bill/
Property tax receipt/ Passport/ Voters ID card)
·
Proof of business address for non-salaried individuals
·
Statement of Bank Account/ Pass Book for last six months
·
Signature identification from present bankers
·
Personal Assets and Liabilities statement
For guarantor (wherever applicable):
·
Personal Assets and Liabilities Statement
·
2 passport size photographs
·
Proof of identification as above
·
Proof of residence as above
·
Proof of business address as above
·
Signature identification from his/her present bankers
Additional documents required for salaried persons :
·
Original Salary Certificate from employer
·
TDS certificate on Form 16 or copy of IT Returns for last two financial years, duly acknowledged by IT Deptt.
Additional documents required for Professionals/self- employed/ other IT assesses:
·
Acknowledged copies of three years I.T. returns/ Assessment Orders.
·
Photocopies of challans evidencing payment of Advance Income Tax.
इंडिया बुल्सचा कुणाला काही
इंडिया बुल्सचा कुणाला काही बरा वाईट अनुभव आहे का?
Pages