आपले शिक्षण, आपल्या अंगी असणारे कलागुण, कौशल्ये ह्यांना वाव मिळावा, त्यांच्या योगे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, सक्षम व्हावे असे अनेक जणींच्या मनात असते. परंतु घरगुती जबाबदार्या, बालसंगोपन किंवा इतर काही कारणांनी घराबाहेर पडून पूर्ण वेळाची नोकरी/व्यवसाय करणे मात्र शक्य नसते. स्वतःमधील क्षमता, कौशल्ये माहीत असतात. घरबसल्या "काहीतरी" करायचंय ही ऊर्मी सतत अस्वस्थ करत असते. पण हे "काहीतरी" कुठून आणि कसे सुरू करावे ह्याबद्दल मात्र मन साशंक असते.
आपल्या मायबोलीकरांपैकी बरेच जण प्रथितयश व्यावसायिक/उद्योजक/उद्योजिका आहेत तर काही लघु उद्योजक/उद्योजिका आहेत. खालील प्रश्नावलीच्या आधारे ज्या आयांना अशा प्रकारे उद्योग/ व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल त्यांना आपले अनुभवी मार्गदर्शन लाभावे, त्यांच्या शंकांचे निरसन होऊन प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमाचा हेतू आहे.
तेव्हा ह्या उगवत्या उद्योजिकांना आत्मविश्वासाने नवीन सुरुवात करण्यासाठी मदत कराल ना!
आपल्या व्यावसायिक अनुभवाच्या अनुषंगाने आपण खालील प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल का?
![design.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u125/design.jpg)
१. घरगुती स्वरुपात एखादा नवा व्यवसाय/उद्योग सुरू करताना त्याची योजना कशी आखावी? लेखी आराखडा तयार करावा का? किती वर्षांसाठीचा आराखडा सुरुवातीस आखणे आवश्यक आहे?
२. कुठल्याही उद्योगास सुरुवात करताना बाजारपेठेचा अभ्यास ह्याला किती महत्त्व आहे? आपण पुरवीत असलेल्या वस्तू, कौशल्य किंवा सुविधांना बाजारात कितपत मागणी आहे हे कशा प्रकारे समजून येते? आपले भावी ग्राहक, पुरवठादार, बाजारपेठ आणि स्पर्धक कसे ओळखावेत करावेत?
३. व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल कुठल्या मार्गांनी उभारता येते? कुठले पर्याय उपलब्ध असतात? त्यासाठी सामान्यतः कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? कमीत कमी भांडवल उपलब्ध असताना देखील कोणकोणते व्यवसायाचे पर्याय उपलब्ध आहेत?
४. आपल्या व्यवसायासंबंधीचे सरकारी नियम, कायदेशीर अटी व पूर्तता यांची अधिकृत माहिती कोठे मिळते? यासंबंधी कोणाचे मार्गदर्शन घ्यावे?
५. सध्या कोणते व्यवसाय/उद्योग चलतीचे आहेत किंवा खूप मागणीचे आहेत, जे घरगुती स्वरूपात करता येऊ शकतात?
६. आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यावसायिक प्रगतीसाठी कशा प्रकारे उपयोग करून घेता येतो?
७. जाहिरात व नेटवर्किंगचा व्यवसायासाठी कशा प्रकारे वापर करावा?
८. व्यवसायासंबंधी काही विशेष प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे का? त्याचा किती फायदा होतो? कोणकोणत्या क्षेत्रातील प्राथमिक माहिती किंवा ज्ञान असणे गरजेचे आहे?
९. नव्या उद्योग व्यवसायात कोणती पथ्ये पाळावीत? तसेच कोठे पैसे वाचवावेत व कोठे वाचवू नयेत?
१०. या विषयावरील अतिरिक्त माहितीचे स्रोत.
११. अन्य काही सल्ले.
वरील दोन्ही उद्योजिका वयाची
वरील दोन्ही उद्योजिका वयाची साठ वर्षे पार केलेल्या आहेत हे विशेष! >> मस्त मस्त
हेच कंट्रोल सी कंट्रोल व्ही करून आजीच्या धाग्यावर चालेल
सुपर आजी व्हायला सख्ख नातवंड पाहिजे अस थोडीच आहे.
अकुच्या पोस्टमधल्या दोन्ही
अकुच्या पोस्टमधल्या दोन्ही उद्योजिकांचे कौतुक
खुपच इन्स्पायरींग आहे हे.
अकुच्या पोस्टमधल्या दोन्ही
अकुच्या पोस्टमधल्या दोन्ही उद्योजिकांचे कौतुक >>>> +१
अकु, त्यांना इथे यायला सांग नाही तर ही प्रश्नावली देऊन त्यांचे सल्ले घेऊन ये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिशय उपयुक्त माहिती मिळतेय
अतिशय उपयुक्त माहिती मिळतेय ह्या धाग्यावर.
अजय, फार छान पोस्ट. सायो, नविन क्षेत्रात झेप घेऊन जम बसवत असल्याबद्दल खूप अभिनंदन! नवीन प्रोजेक्टसाठी अनेक शुभेच्छा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिंडरेलाच्या वरच्या पोस्टला अनुमोदन.
बिल्वाला अनुमोदन. अतिशय
बिल्वाला अनुमोदन. अतिशय उपयुक्त माहिती!
अजय तुमची पोस्ट दि बेस्ट !!!
सगळ्यांच्याच खुप छान आणि
सगळ्यांच्याच खुप छान आणि उपयोगी पोस्ट्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा!!!!
वा!!!!
घरगुती उद्योग म्हणजे नेमकं
घरगुती उद्योग म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे इथे हे मला जरा नीट कळालं नाहिये. घरातनं करता येणारे कुठलेही उद्योग की अगदी कमी भांडवलाचे, हॉबी टाइप उद्योग?
घरातनं मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देणारे टेक बेस्ड उद्योग करता येतात किंवा हॉबी बेस्ड एकट्याने करण्याचे उद्योगही. हॉबी बेस्ड इथे बरेच लिहिले आहेत म्हणून टेक बेस्ड लिहिते.
१. तुम्ही ज्या विषयात तज्ञ असाल त्याची कन्सल्टन्सी. (अर्थात मागणी असेल असाच विषय). त्यासाठी कस्ट्मर कंपन्यांशी टाय-अप्स. हळूहळू वाढवता येइल.
२. तुमच्या विषयाचे कोचिंग (जसे प्रोग्रॅमिंग लँग्वेज, मॅथ्स्-सायन्स, इंजिं.चे काही विषय, कॉमर्सचे अनेक विषय अन इतरही बरेच). यात लेक्चरचे व्हिडिओज बनवून विकु शकता.
३. ब्लॉगिंग (वेळ अन पेशन्सचं काम आहे, मान्य).
४. तुमच्या/तुम्ही होलसेल भावात घेतलेल्या कुठल्याही प्रॉडक्ट्/सर्विस ला ऑनलाइन विकणे.
५. वेब डेवलपमेंट
६. टेक्निकल फ्रीलान्सिंग-मोबाइल अॅप्स, वेब अॅप्स बनवणे. सॉफ्टवेअर टेस्टिंग.
७. पे पर क्लिक, डेटा एंट्री, ऑनलाइन फॉर्म भरणे इ. उद्योग
८. भाषांतर, ऑनलाइन कंटेंटचे मुद्रित शोधन
इतर प्रश्नांची उत्तरं अपडेट करते उद्या...
वाचतेय...
वाचतेय...
सही धागा! वाचतेय...
सही धागा! वाचतेय...
>>ब्लॉगिंग (वेळ अन पेशन्सचं
>>ब्लॉगिंग (वेळ अन पेशन्सचं काम आहे, मान्य)>>
इंग्लिश ब्लॉगिंग/मराठी ब्लॉगिंग अॅज अ प्रोफेशन कोणी करते आहे का? असल्यास डीटेलमध्ये माहिती देता येईल का?
सगळ्याच पोष्टी माहीतीपूर्ण!
सगळ्याच पोष्टी माहीतीपूर्ण!
वाचतेय. खूप स्फूर्तिदायक
वाचतेय. खूप स्फूर्तिदायक पोस्ट्स आहेत.
अशा कुणी आहेत का ज्यांच्याजवळ कल्पना भन्नाट आहे पण पैसा कमी पडतोय किंवा पैसा आहे पण तो गुं तवण्यासाठी चांगला बिझिनेस शोधताय ?
मी आहे प्रिंसेस... कल्पनेच्या
मी आहे प्रिंसेस... कल्पनेच्या भरार्या खुप आहेत, सगळ्या गोष्टींचं फूलप्रूफ प्लानिंग आहे, येणार्या अडीअडचणींची कल्पना आहे, त्यांच्यातून मार्ग काढण्याचं मानसिक बळ आहे, हे सारं असूनपण पैसा जळीस्थळीकाष्ठीपाषाणी वाकुल्या दाखवतोच!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ओके टोकु ! अग मला पण अशा काही
ओके टोकु ! अग मला पण अशा काही जणी माहिती आहेत.
उद्योजिका संयुक्तांनी यातुन कसा मार्ग काढला ते वाचायला आवडेल.
संयुक्ता संयोजकांकडून मला मेल
संयुक्ता संयोजकांकडून मला मेल आली की ईथे मत मांडावं म्हणून पण मला जे सांगायचं होतं ते बहुतेक सगळं आधीच सांगितल गेलय... उलट कित्येक पोस्टस मधली माहिती माझ्या ज्ञानात अजून भर टाकणारी आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांनी उपयुक्त आणि छानच माहिती दिली आहे.
HH, दीपांजली, अजय, ललिता प्रीती यांच्या पोस्ट्स विशेष आवडल्या.
भ्रमरचा स्मार्ट फंडा मस्त.
स्मार्ट फोन अॅप्स लिहिणे हा
स्मार्ट फोन अॅप्स लिहिणे हा पण एक चांगला पर्याय आहे. टेक्निकल बॅकग्राउंड असेल तर बरेच टुल्स आहेत. अजून एक सध्या वेब बेस्ड असलेली अॅप्स कन्वर्ट करून देणे.
उद्योजिका संयुक्तांनी यातुन
उद्योजिका संयुक्तांनी यातुन कसा मार्ग काढला ते वाचायला आवडेल.>>>>>>>>> + १०००००००००
तो मार्ग मला नवी दिशा दाखवेल. उद्योजिकांनो कृपया आपले अनुभव शेअर करा. सगळे काही तयार असताना जेव्हा पैशाची अडचण समोर आली तेव्हा तुम्ही त्यातून कसा मार्ग काढलात??
संयुक्ता संयोजकांकडून मला मेल
संयुक्ता संयोजकांकडून मला मेल आली की ईथे मत मांडावं म्हणून पण मला जे सांगायचं होतं ते बहुतेक सगळं आधीच सांगितल गेलय >> +१
सगळ्यांच्याच पोस्ट्स मस्त आहेत. अजयनी नेमकी माहिती दिली आहे.
उद्योग चालू करताना किंवा करत असताना, आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि काय करायचं नाहिये हे माहिती असणं आणि ते अमलात आणणं महत्वाचं आहे. एकाचवेळी खूप गोष्टी करायचा प्रयत्न करू नये. आम्ही जेव्हा कॅफेचं प्लॅनिंग करत होतो तेव्हा लोकांनी खूप आयडिया दिल्या होत्या. पण आम्हाला जो कस्टमरबेस पाहिजे होता आणि आमची कॅफेची जी कन्सेप्ट होती त्यात बर्याचशा कल्पना बसत नव्हत्या. त्यामुळं आम्ही त्यांना नाही म्हणून सांगितलं.
व्यवसाय करताना खर्च आटोक्यात ठेवता आला पाहिजे. आम्ही सगळा कच्चा माल शक्यतो घाउक दुकानातूनच घ्यायचो कारण फूड इंडस्ट्रीमध्ये कच्च्या मालाच्या खर्चात जेवढी बचत करता येइल तेव्हडेच नफ्याचे प्रमाण वाढते.
) वापरली. अन्नपदार्थ तयार करायच्या कृती अश्या ठरवल्या आणि लिहिल्या, की त्यातले घटक मेजरेबल असतील, नासाडी कमीतकमी व्हावी आणि तयार करणार्याच्या स्किल सेटस् वर फारसे अवलंबून रहावे लागू नये. नाहितर कॅफे/रेस्टॉरंट व्यवसायात शेफ्/कूकवरती खूप अवलंबून रहावे लागते. आम्ही ते होउ दिले नाही. बनवणारा कोणिही असला तरी चवीत, क्वालिटीत, प्रेझेंटेशनमध्ये कधी फरक पडू दिला नाही.
शिवाय शक्य तेथे स्टँडर्ड प्रोसेस (IT मध्ये असल्याचा परिणाम
स्मार्ट फोन अॅप्स लिहिणे हा पण एक चांगला पर्याय आहे. >> हे तर आहेच पण असे उपलब्ध स्मार्ट फोन अॅप्स आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी वापरणं हा पण एक चांगला पर्याय आहे.
खुप उपयुक्त पोस्टी!!!
खुप उपयुक्त पोस्टी!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्मार्ट फोन अॅप्स लिहिणे हा पण एक चांगला पर्याय आहे>> +१
अकुच्या पोस्टमधल्या दोन्ही उद्योजिकांचे कौतुक >>+१
मस्त, खूप माहितीपूर्ण पोस्ट्स
मस्त, खूप माहितीपूर्ण पोस्ट्स आहेत सगळ्यांच्या.
घरगुती व्यवसायापासून प्रारंभ करुन मग पुढे मोठी उद्योजिका होणं, किंवा आहे त्याच मर्यादित व्यवसायात टिकून रहाण्यात आनंद मानणं या दोन वेगवेगळ्या मानसिकता आहेत असं वाटतं. अर्थात व्यवसाय वाढवणं, प्रोफेशनली वाढवणं यात कुटुंबाच्या सहकार्याचा फार मोठा हात असतो. लढाई शेवटी त्या बाईलाच लढायची असली तरी जोडिदाराचा पाठिंबाही खूप महत्वाचा ठरतो.
असा पाठिंबा, सहकार्य खरंच मिळते का? नाही मिळाले तर ती बाई त्यातून कसा मार्ग काढते? की व्यवसाय सोडून देते?
एका यशस्वी उद्योजिकेच्या मागे अशा निदान दहा तरी अयशस्वी उद्योजिका असेल जिची अनसक्सेस स्टोरीही इथे महत्वाची आहे. त्यावर काय मार्ग काढायला हवे, बाईची मदतीवर अवलंबून रहाण्याची मानसिकता कशी बदलायला हवी यावरही चर्चा हवी.
घरगुती उद्योग वाढवायला कर्ज कुठून, कसे मिळवावे? स्त्रियांकरता काही विशेष सवलती असतील तर त्या कोणत्या? महिला उद्योजक संघाचे पाठबळ कसे मिळवावे? नेटवर्किंगकरता काही माध्यमे उपलब्ध आहेत का? संयुक्तातल्या उद्योजक महिला असे नेटवर्किंग, एकत्रित जमून काही विचारविनिमय करतात का हेही इथे येऊ द्या.
मातृदिनाचा धागा आत्ताच वाचायला सुरुवात केली आहे. यावेळी वेगळेपणा जाणवला जो स्वागतार्ह आहे.
बाईची मदतीवर अवलंबून
बाईची मदतीवर अवलंबून रहाण्याची मानसिकता कशी बदलायला हवी यावरही चर्चा हवी. >> इथे दोन वाचलेली वाक्य शेयर करावीशी वाटतात: Obstacles are things that you see when your eyes are off the goal. अडचणी कुठल्याही प्रवासात असणारच. पण रोख नुसत्या अडचणी सोडवण्यापेक्षा ध्येयाकडे जाणारा असा हवा. (जसे अरुंधतीने दुसर्या धाग्यावर लिहिले आहे - दोन मुली घेऊन काका हॉस्पिटल ड्युटीसाठी गेला. काय मस्त किस्सा आहे तो. उद्योजीकेचा नाहीये पण शिकण्यासारख आहे)
दुसरे वाक्य - Drop the story: He said She said. मदत घेताना काही वेळा सल्ले/ मते ऐकावी लागतात. ऐकण्याने (hearing, not obeying) कोणी झिजत नाही. ऐकल पण पुढे त्यावर विचार करताना 'प्रथम पुरुषी' केला. "हे असे बोलले, त्या अस म्हणाल्या" ह्याने जाम त्रास होतो. त्याऐवजी - ह्या बोलण्याने मला दुःख झाले ही खुणगाठ मारावी आणि तिथेच विषय संपवावा. माझे ध्येय अमुक ढमुक आहे असे सांगत ४ ऐवजी ४० जागी मदत मागीतली, लोक प्रेमाने पाठीशी उभे राहिले.(ह्याबाबतीत भरपूर स्वानुभव आहे. भरवशाच्या म्हशीला टोणगा ही स्थिती कायम होती. पण कधी कुठे मदत मागायला लाजले नाही. पण महत्त्वाचे म्हणजे एका व्यक्तीच्या मदतीवर कधी अवलंबून राहिले नाही. इतर जास्त आवडणारे ऑप्शन खुले झाल्याने व्यवसाय सध्या करीत नाहीये. पण करीत होते तेव्हाच्या अनुभवावर लिहिलंय.)
यावेळी वेगळेपणा जाणवला जो स्वागतार्ह आहे.>>+१००
चांगली चर्चा सुरू आहे
चांगली चर्चा सुरू आहे इथे.
आता जे लिहिते आहे याची चर्चा वाहत्या धाग्यावर झाली होती, पण ती इथे असणं औचित्यपूर्ण आहे असं वाटलं म्हणून.
आई झाल्यानंतर व्यवसाय सुरू करताना दिवसातले काही तास त्यासाठी राखीव (डेडिकेट) करणं आवश्यक आहे हा मुद्दा वर आला आहे. या राखीव तासांत अपत्याची जबाबदारी अन्य कोणाकडे सोपवावी असं तुम्हाला वाटतं का? की मांडीवरच्या मुलाला थोपटत फोनवर कस्टमरशी बोलणं हेच भागधेय आहे असं तुम्ही (किंवा घरातील बाकी सदस्यांनी) ठरवून टाकलं आहे? सुरुवातीच्या काळात कदाचित ही आर्थिक गरज असू शकते, पण लवकरात लवकर हे करता यावं हा निअर-टर्म-प्लॅनिंगचा भाग असतो का? असायला हवा असं तुम्हाला वाटतं का? (हो किंवा नाही यापैकी काहीही उत्तर असेल तर) का?
आई झाल्यानंतर व्यवसाय सुरू
आई झाल्यानंतर व्यवसाय सुरू करताना दिवसातले काही तास त्यासाठी राखीव (डेडिकेट) करणं आवश्यक आहे हा मुद्दा वर आला आहे. >> हो प्रगती करायची असेल तर हे अतिशय आवश्यक असते. एवढेच नाही तर स्वतःलाच वेगळा पगार देणे ही जरूरी. व्यवसायातील नफा हा वेगळा विषय. तो व्यवसायातील स्थितीप्रमाणे विनियोग होईल (पुन्हा व्यवसायातच गुंतवणे, पुढील लोन साठी विचारपूर्वक गुंतवणूक इ इ).
पण कुणाला घर सांभाळून काही करायचे असेल (खुलभर दुधाच्या कहानिसारखे, आधी घरातील लोकांना साम्भालेन मग काय ते उद्योग) तर अडचणीच्या दिवशी क्वचित फोनवर थोपटत बोलणे झाले तरी ठीकच. चालती का नाम गाडी.
शर्मिलाच्या पोस्टला अनुमोदन!
शर्मिलाच्या पोस्टला अनुमोदन!
एका यशस्वी उद्योजिकेच्या मागे अशा निदान दहा तरी अयशस्वी उद्योजिका असेल जिची अनसक्सेस स्टोरीही इथे महत्वाची आहे. त्यावर काय मार्ग काढायला हवे, बाईची मदतीवर अवलंबून रहाण्याची मानसिकता कशी बदलायला हवी यावरही चर्चा हवी. >>> हे अनुभव खरच वाचायला मिळावेत.
घरगुती उद्योग वाढवायला कर्ज
घरगुती उद्योग वाढवायला कर्ज कुठून, कसे मिळवावे? स्त्रियांकरता काही विशेष सवलती असतील तर त्या कोणत्या? महिला उद्योजक संघाचे पाठबळ कसे मिळवावे? नेटवर्किंगकरता काही माध्यमे उपलब्ध आहेत का? संयुक्तातल्या उद्योजक महिला असे नेटवर्किंग, एकत्रित जमून काही विचारविनिमय करतात का हेही इथे येऊ द्या.>>>>> + १०००
सिमन्तीनी आपण कुठला उद्योग करायचात? त्याबद्दल लिहा ना थोडे.
छान आहे धागा. वाचतेय.
छान आहे धागा. वाचतेय.
छान माहीती आहे.
छान माहीती आहे.
छान विषय आणि पोस्टस वाचते
छान विषय आणि पोस्टस
वाचते आहे.
मार्गदर्शन आनि स्वानुभवाच्या
मार्गदर्शन आनि स्वानुभवाच्या पोस्टी छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages