काळ बदलला. साधनं बदलली. तंत्रज्ञान बदललं. एकंदर जीवनमान बदलत चाललंय तसं माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत चाललाय. पूर्वीची, तुमच्या- आमच्या काळातली छान छान गोष्टी सांगणारी, देवघरात वाती वळणारी, मुलं नातवंड सुना हेच एक विश्व मानणारी ही आजी तरी कशी ह्याला अपवाद असेल बरं?
एकीकडे नातवंडांना छान गोष्टी सांगत, त्यांच्याकडून इंटरनेटचे धडे घेणारी ही आजच्या काळातली आजी नव्या दमाने, नव्या उत्साहात आयुष्याच्या ह्या दुसर्या खेळीस सुरुवात करते. नोकरी /व्यवसायातून किंवा गृहिणीपदावरून निवृत्ती घेतल्यानंतर, घरातील जबाबदार्या पुढील पिढीकडे सुपूर्त केल्यानंतर पुन्हा एकदा आनंदाने जगण्याची उर्मी असणारी ही आजी. काही वेळेस जोडीदाराची साथ संपल्याने, मुलं आपापल्या घरट्यात रमल्याने आलेला एकाकीपणा, तब्येतीच्या कुरबुरी, नात्यांचे न सुटलेले अनाकलनीय गुंते, आयुष्यभरातील सुख- दु:खांचा हिशोब मांडताना हेलकावणारं मन, त्यातून क्वचित येणारं नैराश्य हे सगळं बाजूला सारून सकारात्मक दृष्टीकोनातून "आजीपण" उपभोगणार्या ह्या सगळ्या आज्यांना आज मातृदिनानिमित्त संयुक्तातर्फे अभिवादन!
स्वतःच्या आरोग्याबद्दल सतर्क राहून वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या करून घेणे, आधुनिक तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करणे, नवनवीन गोष्टी शिकण्यात उत्साही/ तत्पर असणे, अनेक वर्षांच्या धकाधकीच्या आयुष्यात मागे पडलेल्या एखाद्या जुन्या छंदाला पुन्हा आपलेसे करणे, नवीन व्यवसाय / उद्योगात झेप घेणे, सामाजिक उपक्रम राबविणे ह्या आणि अश्या नानाविध गोष्टींनी आपले जीवन हसत-खेळत जगणार्या अश्या अनेक आज्या आजूबाजूला दिसतात.
मोबाईल वापरायला शिकणे, एकटीने विमानप्रवास करणे किंवा परदेशगमन करणे, स्वतःच्या व कुटुंबीयांच्या विकासासाठी ह्या वयातही जागरूक असणे, समाजात सुधारणांना खतपाणी घालणे यांपैकी अनेक गोष्टी ही आजी करत असते. तुमच्या घरात/परिचयात असलेल्या आजींबद्दल इथे जरूर लिहा.
तुमच्या परिचयातील आजी ही शहरी वळणाची कदाचित नसेलही... पण पुरोगामी विचार व सुधारणांना आपल्या आयुष्यात मोलाचे स्थान देणारी, गावातल्या लोकांना, लेकीसुनांना आपल्या आचार-विचारांनी प्रेरित करणारी, त्यांना योग्य मार्ग दाखवणारी, कधी फटकारणारी आजी हीदेखील आजच्या युगातील आजी म्हणता येईल. अशा या आजीबद्दलही इथे लिहायला विसरू नका!
आणि हो, तुमच्यापैकी जर कुणी अशी "सुपर आजी" असाल तर तुमचे हे "आजीपणाचे" अनुभव सुद्धा नक्की लिहा!
मस्त पोस्ट मधुरीता. ग्रेट आहे
मस्त पोस्ट मधुरीता. ग्रेट आहे आजी तुमची.
माझ्या अजून एका आजीबद्दल लिहायचं राहिलं होतं. उपक्रम संपला म्हणून लिहु की नको विचार करत होते. मधुरीताची पोस्ट वाचल्यावर वाटलं आपण पण लिहावं
ही आजी म्हणजे माझ्या वडिलांची आत्या. तिचं नाव खरं तर अन्नपूर्णा पण सगळे तिला जिजी म्हणायचे. काळाची कल्पना यावी म्हणून सांगते आहे, जिजीचा जन्म १९०१ सालातला. जिजी शाळेत-बिळेत काही गेली नाही. तिचे यजमान सरकारी नोकरीत होते. त्यांच्या ऑफिसमधला शिपाई (किंवा जे काही पद असेल ते) घरी यायचा कामानिमित्त. जिजी त्याच्याकडून लिहायला, वाचायला शिकली. त्या काळी लोकं बाय डिफॉल्ट धार्मिकच असायची बहुतेक. तिने वाचायला शिकल्यावर सगळे धार्मिक ग्रंथ वाचायला घेतले. वाचायला शिकणे आणि त्याचं आकलन होणे, त्याची सुसंगती लावता येणे या दोन वेगळ्या पायर्या असतात. जिजीला ही दुसरी पायरी चढल्यावर स्वर्ग गाठल्यासारखं झालं असणार. तिने हाती लागतील ती धार्मिक पुस्तकं वाचून काढली. स्वतःला मिळालेलं ज्ञान इतरांना सांगायचं म्हणून आधी आजूबाजूच्या बायांना मग बाहेर देवळांमध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचनं द्यायला लागली. तिची प्रवचनं अतिशय रसाळ असत असे ऐकले आहे. रोज कुठल्या तरी देवळात तिचा प्रवचनाचा कार्यक्रम असे. एकदा एक वाट धरली ती तिने सोडली नाही. पुढे नजर अधु झाली, एकटीने चालत जाइल अशी परिस्थिती नव्हती तर ही भाच्याचा हात धरून जात असे पण प्रवचनांमध्ये खंड पडु दिला नाही.
किती ग्रेट आहेत सगळ्या आज्या!
किती ग्रेट आहेत सगळ्या आज्या! हा उपक्रम खूप आवडला.
मस्त पोस्ट मधुरीता. ग्रेट आहे
मस्त पोस्ट मधुरीता. ग्रेट आहे आजी तुमची.<<<<<<
thanks सिंडरेला,
तुझ्या जिजींबद्द्ल वाचुन मलाही माझ्या लहानपणीच्या ओळखितल्या आज्या आठवल्या. त्या सगळ्या खरंच खुप ग्रेट होत्या. अगदी काळाच्याही पुढ्च्या.
मधुरीता...सहिच मस्त
मधुरीता...सहिच मस्त लिहिलस....
मधुरिता, सिडरेला
मधुरिता, सिडरेला मस्तच.
मधुरिता, आजींची शिकवण लक्षात राहील, धन्यवाद!
सगळ्या आज्ज्या एकदम भार्री
सगळ्या आज्ज्या एकदम भार्री
धन्यवाद अनघा आणि चिन्नु
धन्यवाद अनघा आणि चिन्नु
Pages