नुकत्याच जन्मलेल्या आपल्या बाळाला मोठ्या विश्वासाने वसुदेव-देवकीमातेने गोकुळी धाडले आणि तिच्या ह्या विश्वासाला किंचितसाही धक्का न देता नंद यशोदेने श्रीकृष्णाचे मोठ्या मायेने पालनपोषण केले ही आपल्या सगळ्यांना ज्ञात असणारी कथा. काळानुसार संदर्भ बदलले. गेल्या २-३ पिढ्यांपासून आई पण बाबांच्या बरोबरीने अर्थार्जनासाठी बाहेर जाऊ लागली. आपल्या लहानग्यांना एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे सोपवून आई वडील घराबाहेर निर्धास्त राहू लागले. जन्मदाती आई किंवा वडील नसताना मुलांचे प्रेमाने संगोपन करणारे हेच ते आधुनिक युगातील नंद यशोदा! मग ते घरातीलच आजी- आजोबा असतील, शेजारच्या काकू असतील, घरी येणारी एखादी मावशी असेल किंवा मग पाळणाघरातील ताई-दादा!
आपल्यापैकी बरेच जण आपली मुलं पाळणाघरात, आजी-आजोबांकडे, मावशी-काकांकडे सोपवून कामाला जातात. आपल्या मुलांचा दिवसभरातील बराचसा वेळ या व्यक्तींबरोबर जातो. साहजिकच त्यांच्यात आणि मुलांत आपोआपच एक भावनिक बंध तयार होतो. त्यातूनच काही कडुगोड अनुभवही येतात. नकळत आपल्यात आणि या केअरटेकर्समध्ये एक विश्वासाचे, मैत्रीचे नाते तयार होते.
आपली मुलेच नव्हे तर आपल्यापैकी कितीतरी मायबोलीकरसुद्धा अशा आजी-आजोबा, काकू-मावशी-आत्यांकडे वाढले असतील. त्यांनी भरवलेला गरम-गरम वरणभात, कधी हक्काने दिलेला धपाटा, आजारपणात घेतलेली काळजी अशा अनेक आठवणी अनेकांच्या मनात पिंगा घालत असतील.
आज मातृदिनाच्या निमित्ताने तुमच्या स्वत:च्या किंवा तुमच्या मुलांच्या ह्या 'नंद-यशोदे' बद्दलच्या ज्या मजेशीर,चांगल्या-वाईट, हळव्या आठवणी असतील त्या घ्या लिहायला! तसेच जर मुलांचे कुटुंबाबाहेरील व्यक्तींकडून/पाळणाघरांतून संगोपन होत असेल तर अशा व्यक्ती/संस्थांकडून उच्च प्रतीची सेवा मिळण्याच्या दृष्टीने काय बदल झाले पाहिजेत असे आपल्याला वाटते तेही लिहा.
लिहिताय ना मग तुमचे अनुभव आणि अपेक्षा?
चिडचिड करुन घेऊ नका. शांत
चिडचिड करुन घेऊ नका. शांत राहून मार्ग काढू शकाल. एखाद दोन दिवस लवकर येऊन त्या मुलांच्या खेळायच्या वेळी तुम्ही देखील मुलाबरोबर खाली जा. काहीतरी खूप इंटरेस्टींग गेम खेळा, बरेच साहीत्य घेऊन जा, व मस्त आरडाओरडा करत एंजॉय करत मुलाबरोबर खेळा. तुमच्या खेळात, साहीत्यात त्या मुलांना इंटरेस्ट वाटला तर ते पण येतील व एकदा मैत्री झाली की त्यांच्या खेळात पण त्याला घेतील.
किंवा काहीतरी कारण काढून सगळ्या मुलांना घरी बोलावून छोटेसे गेट-टुगेदर टाईप करा, त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्या वेळी करु द्या. म्हणजे हळूहळू मैत्री होईल. हो, आणि हे प्रयत्न करण्याआधी ती मुले खरंच चांगली आहेत का हे पण तपासून पहा. शुभेच्छा !
Pages