फ्राईड चिकन विथ चिज सॉस

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 May, 2013 - 15:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन अर्धा किलो (स्वच्छ धुवून)
बटर (अमुल बटर नाही चहात बुडवून खायचे :हाहा:) ५-६
२ अंड्यातील पांढरा भाग
चिली फ्लेक्स १ चमचा किंवा आवडीनुसर कमी अधिक
मिक्स हरब्स १ चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार
कॉर्नफ्लावर २ ते ३ चमचे
मिठ चवीनुसार
साखर १ चमचा

सॉस साठी
चिज (फोटॉतील पॅकमधील पाव भाग)
१ वाटी दूध
पिझ्झा टॉपिंग २ चमचे

क्रमवार पाककृती: 

ही पाककृती मी केलेली नसुन माझ्या पुतण्याने अभिषेक म्हात्रे याने केलेली आहे. वरील प्रमाण मी अंदाजे दिला आहे कारण तोही अंदाजे टाकतो त्यामुळे त्याला विचारले की हे किती टाकलेस की आय एम द शेफ एवढेच उत्तर देऊन पुढे कामाला लागतो Lol आमच्या घरातील तो तरूण शेफ आहे. सध्या बारावीत आहे. पण रिकामपणात ही शेफगीरी चालू असते. पिझ्झा, नुडल्स, पास्ता, बर्गर, चिकनचे प्रकार स्वतः करतो व आम्हालाही खायला घालतो. Happy

तर पाककृती कडे वळूया. मी फक्त फोटो काढले आहेत.

* चिली फ्लेक्स, मिस्क हरब्स, मिठ, साखर एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या. व ते एका बाऊल मध्ये काढून त्यात कॉर्नफ्लॉवर मिक्स करा.

* बटराचा मिक्सरमध्ये रवा करा व एका डिश मध्ये काढून घ्या.

* कढईत तेल गरम करत ठेवा व तोपर्यंत आधी चिकन नंतर चिली फ्लेक्स व हरब्स चे मिश्रण त्यानंतर अंड्याचे पांढरे आणि शेवटी बटराचा रवा असे रचून ठेवा म्हणजे तळताना सोपे पडते

* आता चिकनचा प्रत्येक पिस प्रथम चिली फ्लेक्स-मिक्स हरब्स- कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणात घोळवून तो अंड्याच्या पांढर्‍या भागात बुडवायचा.

त्यातून बुडवून झाला की बटराच्या रव्यामधून घोळवून घ्यायचा.

* आधी असे सगळे किंवा एका वेळी तळता येतील एवढे पिस करून घ्यायचे.

कढईत तेल चांगले तापले की मध्यम आचेवर हे तुकडे तळून काढायचे. साधारण १०-१२ मिनीटे ठेवायचे.

हे आहे तय्यार फ्राईड चिकन.

आता सॉसची रेसिपी पाहू.

दुध एका भांड्यात गॅसवर गरम करा. त्यात चीजचे तुकडे घाला व मधून मधून ढवळा

* थोड्या वेळात चीज विरघळेल चमच्याने ते एकजीव करा व त्यात पिझ्झा टॉपींग घालून थोडावेळ ढवळा.

* वाटल्यास सॉसवर सजावटीसाठी थोडी कोथिंबीर चिरून टाका.

हे आहे तय्यार फ्राईड चिकन विथ चिज सॉस.

वाढणी/प्रमाण: 
तसे सांगणे कठीण आहे पण मनसोक्त खायचे असेल तर २ ते ३ जणांसाठी.
अधिक टिपा: 

वरील herbs मला निट टाईपता आला नाही. टाईपायला गेल्यावर हर्ब्स असे होते.

प्रमाण कमीजास्त करू शकता आवडीनुसार.

माहितीचा स्रोत: 
अभिषेक
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे चिकनएवजी मशरुम, ब्रोकोली अश्या भाज्या वापरता येतीलच. कारण माझ्यासारख्या घासफूसवाल्यांना हेच चालू शकेल..

बाकी पाककृती जबरीच आहे.

- पिंगू

Pages