गुलाबी कोशिंबीर

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2013 - 02:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गाजर १ किंवा २
काकडी २
बिट अर्धे किंव १ छोटे
डाळींबाचे दाणे अर्धा वाटी
शेंगदाण्याचा कुट पाव वाटी
सैंधव (काळे) मिठ १ अर्धा चमच
मिठ अर्धा चमचा
साखर १ चचमा
अर्धा चमचा किसलेल आल
१ वाटी दही

क्रमवार पाककृती: 

गाजर, बिट, काकडी सोलून किसून घ्या. ह्यात डा़ळींबाचे दाणे, शेंगदाणा कुट, सैंधव मिठ, मिठ, साखरम आल्याचा किस घालून एक्जीव करा. मग त्यात आवश्यकतेनुसार दही घालूण पुन्हा ढवळा. झटपट, रंगीत आणि पौष्टीक कोशिंबीर तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
५ जणांसाठी
अधिक टिपा: 

तुम्ही ह्यात अजुन आवडीनुसार मुळा, कांदा, अननस, अ‍ॅप्पल वगैरे घालू शकता.

जास्त बिट घातला तर बिटाचा थोडा वास येऊन मुले खाण्यास कुरकुर करतात म्हणून अर्धा घालायचा. निदान तेवढातरी ते खातात.

शेंगदाणा कुट नाही घातला तरी छान लागते.
पहिल्या फोटोत आल्याचा किस टाकायचा राहून गेलाय.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्त गं. ऐशुला तिच्या शाळेत गुलाबी कोशिंबीर द्यायचे आणि तिला ती आवडायची. आज रात्री ही करुन बघते.

मस्तच लाग्ते ही को. मी आलं घालून करत नाही आता एकदा तशी करुन बघेन. लेकीच पिंक ऑब्सेशन तिला खायला भाग पाडतं Wink

यम्मी Happy

मी डाळिंबाचे दाणे नाही घातले कधी.

दही घालुन केली तर शेंगदाण्याचे कूट नाही घालत. लसणीचा वास आवडत असेल तर अगदी थोडी लसुण ठेचुन घालायची.

दाण्याचे कूट, मोहरी. हिंग, कडीपत्त्याची चरचरीत फोडणी कच्च्या कोशिंबीरीला Happy यात हिरव्या कॅप्सिकमचे तुकडे घालते कधीकधी... काकडी नाही घालत.

मायनस दाण्याचे कुट छान आहे रेसिपी.
लाजोची लसणाची सजेशन छान आहे. दह्याला छान गार्लीकी फ्लेवर येइल. (फक्त ऑफिसला टिफीनमधे नेता येणार नाही. )

सगळ्यांचे धन्यवाद.

साधना तुझ्यासाठीच म्हणजे ऐशूसाठीच ही टाकली ग कोशिंबीर.

लाजो पुढच्यावेळी लसुण टाकुन बघेन.

रेसिपी मस्त आहे. आजच काकडीची कोशिंबीर केली होती. उद्या बीटाची करेन म्हणत होते. त्याऐवजी ही पिंक कोशिंबीर करेन. Happy

मी बहुतेकदा आलेलसूणाऐवजी भाजलेल्या जिर्‍याची पूड आणि चाट मसाला टाकते कोशिंबीरीमधे.

नंदीनी चाट मसाला टाकल्यावर सैंधव मिठाची आवश्यकता नाही. जिरे करपऊन छानच लागते. मी ताकात टाकते नेहमी.

मस्त. Happy

गाजर आणि बीट कच्चे किसून त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, थोडा आल्याचा कीस, हिरवी मिरची, कोथिंबीर, दाण्याचं कूट, मीठ, साखर - अशीसुद्धा छान लागते.