विदर्भातील शेतकर्यांसाठी आपण काय करु शकतो?

Submitted by चिखलु on 1 May, 2013 - 00:12

विदर्भ, शेतकरी आणि आत्महत्या हा भयानक उग्र आणि उद्विग्न करणारा ज्वलंत प्रश्न अतिशय वेदनादायक. समाजाचं देणं म्हणुन आपण नक्कीच काहीतरी करु शकतो. तुम्हाला या विषयी माहिती असल्यास सांगा, शेअर करा. माझ्यासारखे इथे अनेक असतील ज्यांना आपल्या बांधवांसाठी ठोस काहीतरी करायची इच्छा असेल.
तुम्हाला एखाद्या संस्थेची माहिती असेल जी काही करत असेल तर नक्की कळवा.
शेतकरी, त्यांचे कुटुंब, शिक्षण, आरोग्य अशा कुठल्याही क्षेत्रात आपण नक्की काय मदत करु शकतो याची माहिती हवी आहे.
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विदर्भातल्या शेतकर्‍यांना सर्वप्रथम स्वतंत्र विदर्भ राज्य देणे फार गरजेचे आहे. प. महाराष्ट्रातल्या नेत्यानी त्यांची वाट लावलेली आहे आणि विदर्भातल्या पुढार्‍यानी त्यांचे मांडलिकत्व पत्करले आहे....

विदर्भातल्या शेतकर्‍यांना सर्वप्रथम स्वतंत्र विदर्भ राज्य देणे फार गरजेचे आहे
>>माझा प्रश्न असा आहे की, आपण स्वतः व्यक्तिगतरित्या काय मदत करु शकतो?
सरकार काही करेल ही अपेक्षाच मुळात चुक आहे.

<<<< विदर्भातल्या शेतकर्‍यांना सर्वप्रथम स्वतंत्र विदर्भ राज्य देणे फार गरजेचे आहे. प. महाराष्ट्रातल्या नेत्यानी त्यांची वाट लावलेली आहे आणि विदर्भातल्या पुढार्‍यानी त्यांचे मांडलिकत्व पत्करले आहे. >>>

सहमत.

पण तेवढ्याने शेतकर्‍यांचा प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. त्या भ्रमात राहूही नये.

केंद्र सरकारचे शेतीविषयक धोरण बदलले पाहिजे. त्यासाठी सरकारचे डो़के ठिकाणावर आणणे गरजेचे आहे.

शेतकर्‍यांच्या दु:खावर नुसत्या मलमपट्ट्या केल्याने इलाज केल्याचे समाधान लाभण्या व्यतिरिक्त आणखी काही फारसे हाती लागेल, असे वाटत नाही.

<<<<< माझा प्रश्न असा आहे की, आपण स्वतः व्यक्तिगतरित्या काय मदत करु शकतो? >>>>

आभाळ एवढे फाटले आहे की, व्यक्तिगतरित्या एकेकाने शिवत बसण्यात उपयोग नाही.

फाटण्याचा वेग वादळी आणि शिवण्याची गती मुंगीपावलाची, समिकरण विसंगत होतेय.

मात्र

सरकारला जाग येण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करता येऊ शकतात.

आभाळ एवढे फाटले आहे की, व्यक्तिगतरित्या एकेकाने शिवत बसण्यात उपयोग नाही.
>>> मान्य, पण म्हणुन काहीच न करता बसुन रहायचं का?
सरकारला जाग येइल तेव्हा येइल पण म्हणुन आपण काहीच नाही करायचं का?
एखाद्या कुटुंबातल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च, बियाणांचा खर्च, दवाखान्याचा खर्च किंवा अजुन इतर जी काही मदत उभी करता येईल ते तर आपण करु शकतो ना.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कधीतरी मृत्यु येणारच आहे म्ह्णुन जगण्याची आशा सोडायची का?
कृ गै नसावा.

माझा प्रश्न असा आहे की, आपण स्वतः व्यक्तिगतरित्या काय मदत करु शकतो
>>
व्यक्तिगत मदत ही शाश्वत उपयोगाची नसते. गरजूला मासा देण्याऐवजी गळ देणे योग्य असते. राजकीय व्यवस्थेबद्दल काहीही मत असले तरी संस्थात्मक उपाययोजना महत्वाचीच असते....

चिखल्या, माबोवर सुपंथ म्हणून संस्था/ग्रूप आहे. वर्गणी काढून एखाद्या संस्थेला मदत करतात.
जर खरेच कोणी इंटरेस्टेड असेल तर एखादे गाव/ संस्था वर्गणी काढून दत्तक घेऊ शकतो.
त्या गावातले मुख्य प्रश्न जर कर्जासंबंधी असतील तर ठराविक पतपेढीतले कर्ज कमी करण्यासाठी मदत करू शकतो.
प्रॉब्लेम असा आहे की कर्जाची समस्या सोडवायला गेलं तर बाकीचे एकमेकांत अडकलेले प्रश्न समोर दिसतात.
तीस- चाळीस हजाराच्या कर्जापायी कुणी जीव देतंय हे पाहिलं की आपण एका महिन्यच्या उत्पनात किती जीव वाचवू शकतो असा मन विचार करू लागतं.
पण खरंच केवळ कर्जमुक्ती करून ही समस्या दूर होणार आहे का?

पण खरंच केवळ कर्जमुक्ती करून ही समस्या दूर होणार आहे का?>>
नक्कीच दुर नाही होणार, त्याला अनेक कंगोरे आहेत, पण निदान कुठेतरी सुरुवात करायला हवीये.
श्रमदान, जलसंधारण, शिक्षण असं कुठेतरी आपण मदत करु शकतोच ना.
बर्याच गोष्टी आपल्या हातात नाहियेत, जसं पाउस, निसर्ग इ इ.
आणि तुम्ही म्हणता तसं ३०-४०००० रुपयांसाठी होणार्या आत्महत्या पाहणं अतिशय क्लेशदायक आहे.
यातुन नक्कीच काहीतरी मार्ग काढता येइल.

चिखल्या, माबोवर सुपंथ म्हणून संस्था/ग्रूप आहे.
>> धन्स, मला ही माहिती नव्हती.

aapan kahi karu shakat nahi ani aapan karun kahi upayoghi hoil asa vatat nahi........tyani swatahach prayatn kele pahijet.... Jar tyanchi iccha asel tarach kahi hou shakate ani apanahi madat karu shakato.... Nahitar tyanchi iccha tar sarkarne ghas bharavava ashich ahe.....

शिक्षण, शिक्षण, शिक्षण.
आजचा प्रश्न आजच सुटणार नाही. काही दिवस असेच राहील. पण आजच्या शिक्षणामुळे उद्याचे प्रश्न सुटतील.

शिक्षण, शिक्षण, शिक्षण.
आजचा प्रश्न आजच सुटणार नाही. काही दिवस असेच राहील. पण आजच्या शिक्षणामुळे उद्याचे प्रश्न सुटतील. >>>>>> +१००

विदर्भात "चेतना विकास" ही संस्था शेतकरी आणि स्त्रियांसाठी काम करते.
आणखी माहिती http://www.chetanavikas.org/our-work/sustainable-agriculture/

"चेतना विकास" ही संस्था आमच्या वर्ध्याचीच. श्री अभय बंग यांचे मोठे बंधू श्री अशोक बंग चालवतात.
पण संस्थांच्या मदतीने शेतकर्‍यांच्या समस्या सोडवू शकतो, असा त्यांनीही दावा केलेला नाही.
त्यांच्या संस्थेच्या कार्यक्षेत्रातही आत्महत्त्या झालेल्या आहेत.

सर्वोदयी विचारांचे आणि गांधीजीचे शिष्य श्री ठाकूरदासजी बंग हे आमच्या शेतकरी चळवळीत बराच काळ सामील होते.

<<<< विदर्भातल्या शेतकर्‍यांना सर्वप्रथम स्वतंत्र विदर्भ राज्य देणे फार गरजेचे आहे >>>>

काल १ मे रोजी नागपूर येथील विधानभवन परिसराजवळील रिसर्व्ह बॅंक चौकात विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन आणखी तिव्र करण्याचे ठरवण्यात आले.

Vidarbha Rajy आणखी वृत्त येथे.
http://www.baliraja.com/node/475

वेगळ्या विदर्भाचे समर्थन होऊ शकत नाही. (किम्बहुना, सातारचे भोसले घराणे अन पक्षी त्यान्चे पेशवे दुसरे बाजीराव यान्नी १८१८ मधे इन्ग्रजान्चे पुढे नान्गी टाकण्याचे कित्येक वर्षे आधी इन्ग्रजान्शी तैनाती फौजेचा करार करणार्‍या नागपूरकर भोसले घराण्याच्या घरभेद्या/मराठेशाहीभेद्या/राज्यभेद्या कृतीसारखीच ही वेगळा विदर्भ मागणारी कृती ठरते असे माझे मत.)
एक नक्की की पश्चिम घाटावरील नेते मन्डळीन्नी विदर्भाची उपेक्षा केली, पण केवळ विदर्भच का? तर नाही, यशवन्तराव चव्हाणान्च्या काळात सातारा जिल्हा फळलाफुलला, गावोगावी रस्ते वगिअरे झाले, वसन्तदादान्च्या काळात सान्गली, व असेच निरनिराळे तेच ते नेहेमीचे पश्चिमी पुढारी आपापल्या जिल्हा/मतदारसन्घापुरते काम करत राहिले हे वास्तव आहे. अन त्यामुळेच, सातारा जिल्ह्याबाजुच्या वेल्हे तालुक्यात लिम्बीच्या गावी १९८५ पर्यन्त वीज नव्हती, तर १९९५ पर्यन्त पक्की सडक नव्हती. आजही परिस्थिति फारशी वेगळी उत्साहवर्धक नाही. सबब स्वतंत्र विदर्भाची वेगळी चूल मान्डणे हा उपाय होऊ शकत नाही. अन तसा प्रकार केला गेलाच, तर तो मराठ्यान्ना ग्रासलेल्या निखळ "भाउबन्दकीचे अन काठ्याकुर्‍हाडीन्नी एकमेकान्ची डोचकी फोडण्याचे" आधुनिक रुप असेल.

मी गेली कित्येक वर्षे केळी/सन्त्री/मोसंबी विकत घेणे विसरुन गेलो होतो. २००५ च्या सुमारास लिम्बीने काशीयात्रेहून रेल्वेने विदर्भमार्गे येताना तेथीस दर स्टेशनगणिक जी परिस्थिती वर्णन केली, तेव्हापासून मला आर्थिकदृष्ट्या जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा मी केळी/सन्त्री/मोसम्बी नक्कीच विकत घेतो. माझ्याकडून वैदर्भीय शेतकर्‍यान्ना तेवढाच कणभर हातभार असू शकतो.

<<< मी केळी/सन्त्री/मोसम्बी नक्कीच विकत घेतो. >>>>

अहो हे काय लिंबूटिंबूजी, नुसते संत्री विकत घेतल्याने थोडाच पूर्ण प्रश्न सुटणार आहे?

संत्री विकत घ्या, गाभा तुम्ही खा आणि सालीचा रस सत्ताधार्‍यांच्या डोळ्यात पिळा की राव. मग सरकारचे डो़के ठिकाणावर येण्यासाठी तुमचा हातभार लागल्यासारखे होईल. Happy

विदर्भात "चेतना विकास" ही संस्था शेतकरी आणि स्त्रियांसाठी काम करते.
>>> धन्यवाद अजय

पण आजच्या शिक्षणामुळे उद्याचे प्रश्न सुटतील.
>>+१

aapan kahi karu shakat nahi ani aapan karun kahi upayoghi hoil asa vatat nahi........tyani swatahach prayatn kele pahijet.... Jar tyanchi iccha asel tarach kahi hou shakate ani apanahi madat karu shakato.... Nahitar tyanchi iccha tar sarkarne ghas bharavava ashich ahe.....
>> अतिशय बेजबाबदार पोस्ट आहे ही
तुम्हाला काय वाटतं ते लोक आत्महत्या आवडीने करतात काय?
गरिबीत राहणे ही कुणाची इच्छा कशी काय असु शकते?
सरकारने घास भरवावा??? इथे मनमाडलाच महिन्यातुन एकदा पाणी मिळतं, यांचे सगळे प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात. अशा वेळेस विदर्भावर अन्याय होतो ही भावना असणे नैसर्गिक आहे. मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रातला आहे तरीही हे म्हणतोय.

चिखल्या, खुपच कळकळीचा विषय घेतला हाती. त्याबद्दल आभार मानते तुमचे. आमच्या इथे म्हणजे अमरावतीला हनुमान व्यायाम शाळा ही २००७ पासुन शेतकर्यांना मदत करते आहे.
१] दर शनिवार व रविवारला या संस्थेतर्फे जिल्ह्यातील एकेका गावातील शेतकर्यांना येथे आणुन [संस्थेच्या वाहनानेच] प्रशिक्षण दिल्या जात. ८० हजार शेतकरी आतापर्यंत प्रशिक्षित झालेत.
२] त्यांच्या मुलांना [ १५ ते २५ वयोगटातील मुलांना ]मोफत शारिरीक शिक्षण दिल्या जात.
३]इतर जोडधंद्याबद्दल त्यांना माहीती दिल्या जाते.
क्रुषी क्षेत्रातील अनेक अडचणी, व त्यावर कशी मात करायची, कर्जासाठी मदत अस काहीस स्वरुप आहे. सविस्तर माहीती हवी असल्यास नक्की देइन.

जग-प्रसिद्ध अशी ही संस्था आता शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे. या संस्थेबद्दल मला लिहायच आहेच. बघु या केव्हा जमत ते. आणखी काही माहीती हवी असल्यास कळवेन.

प्रभा,
सविस्तर माहीती हवी असल्यास नक्की देइन.
>>सविस्तर माहिती नक्कीच लिहा, संस्थेचे फोन क्रमांक, किंवा अजुन काही उपयुक्त माहिती असेल तर इथे शेअर करा प्लीजच

विदर्भातल्या शेतकर्‍यांना सर्वप्रथम स्वतंत्र विदर्भ राज्य देणे फार गरजेचे आहे. प. महाराष्ट्रातल्या नेत्यानी त्यांची वाट लावलेली आहे आणि विदर्भातल्या पुढार्‍यानी त्यांचे मांडलिकत्व पत्करले आहे....
---- विदर्भ स्वातंत्र झाल्याने प्रश्न कसा सुटेल?
वसंतराव नाईक (पुसद?) ह्यांनी अनेक वर्षे (१९६३ - ७५) महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवण्याचा मान मिळवला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासांत सलग १२ वर्षे मुख्यमंत्री पद त्यांनाच मिळाले आहे, यश्वंतरावांचे खंबिर पाठबळ होते...

निव्वळ राज्य वेगळे झाल्याने फरक पडतो असे मला वाटत नाही. फरक पडतच असेल तर मुख्यमंत्री, राज्यपाल, अनेक मंत्री, त्यांचे नातलग यांची राजकिय सोय होते.

उदय, विदर्भातले ३ मुख्यमंत्री झाले (२ नाईक व कन्नमवार)पण त्यांचा रिमोट कोण होता हे पाहिले पाहिजे. ते विदर्भात कोणत्या योजना नेऊ शकले. ? वसन्तराव नाईकांनी मुम्बईत रेक्लमेशन करून फोर्टमध्ये जमीन निर्माण केली यात विदर्भाचा काय फायदा? विलासराव साळुंखे म्हणत त्याप्रमाणे पाणी ही दारिद्र्य व श्रीमन्ती यांना छेदणारी रेषा आहे. विकासासाठी उपलब्ध साधनसामुग्री कोणत्याही विकसनशील देशात अपुरीच असते. पण तिच्या समन्यायी वाटपाचे काय. ? विदर्भातल्या सिंचनाच्या अनुशेषाबाबत काय स्थिती आहे? झुडपीजंगलांच्या म्हणजे त्यामुळे येत असणार्या धरण कामात अडथळ्याबात काय प्रयत्न झाले. ? नक्षलिझ्म ही आर्थिक मुस्कटदाबीतून निर्माण होत नाही का? आपले शासन तो लॉ अ‍ॅन्ड ऑर्डरचा प्रश्न मानते तर आंध्र तो सोशियो इकॉनॉमिक प्रश्न मानते व उपाययोजनाही करते . आज आंध्रात नक्शलींचा मागमूसही नाही.

वैदर्भीय जनतेची मानसिकता हाही त्याचा भाग आहेच . त्याबद्दल नन्तर लिहीन ..
(ता.क. मी विदर्भातला नाही :))

शेतकरी अभियाना बद्दलची माहीती पाठवत आहे.ही सगळी निस्वार्थ सेवा आहे. चिखल्या, आपणहि या कामात मदत करता आहात हे कौतुकास्पद आहे. पुनश्च धन्यवाद.

shetkari12.jpg

पंतप्रधानांनीही याबाबत आमच्या संस्थेच्या माजी अध्यक्षा कै. निर्मलाताइ देशपांडे यांना पत्र पाठवुन
कौतुक केल आहे.
shetkari_letter.jpg

निव्वळ राज्य वेगळे झाल्याने फरक पडतो असे मला वाटत नाही. फरक पडतच असेल तर मुख्यमंत्री, राज्यपाल, अनेक मंत्री, त्यांचे नातलग यांची राजकिय सोय होते.
>> बर्याच अंशी सहमत

विलासराव साळुंखे म्हणत त्याप्रमाणे पाणी ही दारिद्र्य व श्रीमन्ती यांना छेदणारी रेषा आहे.
>> शेतीच्या संदर्भात असु शकेल

विकासासाठी उपलब्ध साधनसामुग्री कोणत्याही विकसनशील देशात अपुरीच असते. पण तिच्या समन्यायी वाटपाचे काय. ? विदर्भातल्या सिंचनाच्या अनुशेषाबाबत काय स्थिती आहे? झुडपीजंगलांच्या म्हणजे त्यामुळे येत असणार्या धरण कामात अडथळ्याबात काय प्रयत्न झाले. ? नक्षलिझ्म ही आर्थिक मुस्कटदाबीतून निर्माण होत नाही का?
>> विदर्भात दबाव गट अस्तित्वात आहेत का? लॉबींग वगैरे आहे का? म्ह्ण्जे फक्त इलेक्शनच्या वेळेस नाही तर एरवीही?

धन्यवाद प्रभा

<<<< विदर्भात दबाव गट अस्तित्वात आहेत का? >>>>

रॉबीनहुड यांनी विदर्भातल्या पुढार्‍यानी प. महाराष्ट्रातील नेत्यांचे मांडलिकत्व पत्करले आहे. असे सांगीतले आहे ना?

मग ज्यांना स्वतःचे अस्तित्वच नाही ते काय दबावगट वगैरे निर्माण करण्याची हिंमत दाखविणार?

धागा छान आहे. शेतकर्यान्च्या भल्या साठी काय गोष्टी आवश्यक आहेत या बद्दलची माझी मत..

१) चान्गली सकस जमीन, पुरेस पाणी
२) उत्तम प्रतीचे बी बियाणे
३) जमिनीचा कस न घालवणारी खत, औषधे
४) त्या त्या परिसरात उत्तम रुजणारी झाडे, वनस्पती इत्यादिची लागवड
५) निसर्गाची क्रुपा
६) उत्पन्नाच्या साठवणीची आणि वाहतुकीची व्यवस्था
७) शासकीय धोरणान्च्या बदलामुळे भावात न होणारे विचित्र चढ उतार
८) उत्पादित धान्य/फुल/फळ यान्ना मिळणारी शाश्वत बाजारपेठ
९) मधल्या आडत्यान्च्या मुळे न होणारी आडवणूक

या सन्दर्भात आपण काय करू शकतो?

क्र. १... सकस जमीन आता किती राहीली आहे, मला माहित नाही. अवाजवी रासायनिक खतान्च्या वापरामुळे कस किती राहीला आहे या वर जाणकारान्नी प्रकाश टाकावा. पुरेस पाणी याबद्दल देखील horror stories जास्ती प्रसिद्ध आहेत. ६०० ७०० ८०० फूट खाली गेल्याशिवाय पाणी लागत नाही. जे लागत त्यात salts भरपूर प्रमाणात असतात वगैरे. या मुळे जमिनीचा कस देखील जातो अस ऐकून आहे (मी शेतकरी नाही म्हणून ऐकीव माहीतीवर मी माझ ज्ञान पाजळत आहे)

क्र. २... जी बियाण मिळतात (सरकारी) त्यातली ३० ४० % उपजाऊ नसतात (ऐकीव माहिती (ऐमा)). genetically modified असतात त्याला येणार्या बियान्मध्ये रुजवण क्षमता नसते. अनेक गव्हाच्या, भाताच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. अम्बेमोहर तर सध्या मावळात देखील मुष्कीलीने मिळतो (हा मात्र अनुभव... सगळे सानग्तात की आम्ही आम्बेमोहोर घरापुरता करतो).

क्र. ३... रासायनिक खते कीटक नाशके जी मिळतात ती चक्रवाढ पद्धतीनी पुढच्या वर्षी विकत आणायला लागतात त्या मुळे खर्च अफाट बेफाट (ऐमा). जमिनीचा कस त्याची देखील वाट लागते. भूजल प्रदुषित होत (ऐमा)

क्र. ४... ऊस कमी कष्टाच म्हणून सोलापूर पासून सम्भाजी नगर पर्यन्त यत्र तत्र ऊस घेणारे महाभाग आहेत. सोयाबीनने जमिनीचा कस कमी होतो (ऐमा) तरी देखील सोयाच पिक घेऊन जमिनीची वाट लावणारे शेतकरी (सरकारी धोरणामुळे देखील असेल पण आहे) आहेत

क्र. ५... फार काही बोलण्यासारख इथे नाही. जलसन्धारण शेततळी वगैरे वगैरे विषय सोडले तर.

क्र. ६... साठवणीसाठी आपल्या मायबाप सरकारने वॉल्मार्ट सारख्या आस्थापनान्ना आमन्त्रण दिल आहे. वहातुकी सन्दर्भात बरच काही बोलण्या सारख आहे पण बोलणार नाही

क्र ७... जिथे तेल गाळप केन्द्रे, सहकारी साखरकारखाने इतादि आहेत तिथे शासकीय धोरणामुळे होणारे विचित्र चढ उतार अन्तर्भूत आहेत. परस्पर शेवटच्या ग्राहकाकडे जर माल जाणार असेल तर या धोरणान्चा फरक फार पडणार नाही.

क्र. ८... माहित नाही

क्र. ९... खूप खूप horror stories

आता या बाबतीत आपण काय करू शकतो?

रॉबीनहुड यांनी विदर्भातल्या पुढार्‍यानी प. महाराष्ट्रातील नेत्यांचे मांडलिकत्व पत्करले आहे. असे सांगीतले आहे ना?

मग ज्यांना स्वतःचे अस्तित्वच नाही ते काय दबावगट वगैरे निर्माण करण्याची हिंमत दाखविणार?
>>>
फक्त राजकारण्यांचेच दबावगट हवा असं काही नाही. व्यापारी, शेतकरी इ इ चे पण दबावगट असु शकतात. त्या अनुषंगाने तो प्रश्न होता.

zoting:
पुर्ण पोस्ट बद्द्ल धन्यवाद

<<<< व्यापारी, शेतकरी इ इ चे पण दबावगट असु शकतात. >>>>

शेतकर्‍यांच्या हितासाठी लढणारा व्यापार्‍यांचा दबावगट माझ्यातरी माहितीत नाही.

शेतकर्‍यांचे काही दबावगट आहेत. पण त्यांची ताकत अपूरी पडत असल्याने कुणावर आणि कशावरच दबाव पडत नाही.

चिखल्या,
महत्वाचा विषय !
थोड्या फार फरकांनी हा विषय राज्यात सगळीकडेच आहे हि आजची वस्तुस्थिती आहे.

मुटेजींनी म्हंटल्या प्रमाणे ..आभाळ एवढे फाटले आहे की, व्यक्तिगतरित्या एकेकाने शिवत बसण्यात उपयोग नाही.फाटण्याचा वेग वादळी आणि शिवण्याची गती मुंगीपावलाची, समिकरण विसंगत होतेय.
१००% सहमत

व्यक्तिगत प्रयत्न महत्वाचे आहेतच पण या सरकारला, तुम्हीच निवडुन (हक्काने आणि बाजा वाजवत मिरवणुक काढुन,अनेक आश्वासने ऐकुन घेत) दिलेल्या नेत्यांना याच जाब विचारणं जास्त महत्वांच आहे, कारण त्यांना हलवलं कि सरकारी यंत्रणा हलेल, कामाला लागेल,थोडा वेळ लागेल पण चांगले बदल घडण्यास सुरु होतील..

दुसरं म्हणजे विदर्भातले नेत्यांवर अन्याय झाला असला तरी ते खुप गरीब आहेत असं नाही, काही नेते जनतेसाठी पैसा खर्च करतात काही आपली घरे भरतात हाही फरक लक्षात घ्यावा, उलट पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुर सारख्या सधन म्हणवणार्‍या जिल्ह्यातदेखील शेतकर्‍यांला आपल्या हक्कासाठी नेहमी रक्त सांडाव लागतंय, इथला सामान्य माणुस देखील सरकारी व्यवस्थे विरुध्द हक्कासाठी लढत लोक वर्गणीतुन आमदार-खासदार होतो, प्रामाणिकपणे जनतेची कामे करुन दाखवतो अशी उदाहरणे विदर्भात दिसली पाहिजेत, म्हणजे काही जुन्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास सुरुवात होईल किंबुह्ना तुम्हीच ती लढुन मिळवाल .

भरुन वाहणार्‍या काही बारमाही नद्या नसणं हे विदर्भ मागे पडण्याच एक मु़ख्य कारण आहे असं मला वाटतं...
विदर्भात पाण्यासाठी धरणांवर देखील कित्येक पटींनी जास्त खर्च केला, पण यात भ्रष्टाचार करण्यात आघाडीवर असलेल्या नेत्यांना विदर्भाची किती काळजी आहे हे जनतेनी एकदा नक्की विचारावं.

इथे कोरियात एक चांगला प्रयोग बघितला. ही मंडळी बीयांची पेरणी न करता आधी पॉलिथिन बॅगमध्ये त्या पेरतात आणि रोप उगवल्यावरच ते रोप लावतात.
दुसरं म्हणजे जे विकते तेच पिकवावं. बचतगट वा इतर माध्यमातुन भाजीपाला/ धान्य घरपोच किंवा कॉलनीप्रमाणे विकले तर डायरेक्ट शेतकर्‍यांचा फायदा होऊ शकतो.
सरकार काहीच करत नाही, हे रडगाणं बंदच केलं पाहिजे.