ट्राफिक जॅम

Submitted by सत्यजित on 29 October, 2008 - 07:09

ही दिवाळी अंकाला दिली होती पण तिच दिवाळं निघाल, आता बराच बदर करून इथे पोस्टतो आहे.

एका मागे एक गाडी,
झाली केवढी मोठ्ठी ट्रेन
काही डब्बे सोडुन गेले
तोडुन गेले लेन

बाबा म्हणाले "झालाय केवढा ट्राफिक जॅम"
दुकान नाही(?) काहीच नाही (?) शेंडी लावतायत जाम... !!! Happy

बाबा सांगा ट्राफिक जॅम
कशा सोबत खातात?
खाउ म्हणता ट्राफिक जॅम
सगळे का हासतात?

येवढी मोठ्ठी लागलीय लाईन जॅम का घ्यायला?
कसती मस्त मज्जा येते नुसताच चमच्याने खायला

अरे रे र्रे रे....सुटला पहा सिग्नल
आणि तुटली माझी ट्रेन Sad
आता पुढच्या सिग्नलला
पुन्हा नविन ट्रेन... Happy

सुटला म्हणे जॅम आता बाटली जाईल फ़ुटून
शेडींचाच जॅम होता तर बाटली येईल कुठुन?

आधीच माहीत होत मला
मोठे नेहमी असं करतात
आम्ही जरा खोटं बोलता
आमचा कान हे धरतात..

मी नाही... मी कट्टी आहे जा..... सगले फसवतात आम्हाला...

-सत्यजित.

गुलमोहर: 

कल्ल नाही.. म्हणजे फसली म्हणायची.. असो लहान मुल जे बोलतात ते सगळच कुठे कळत Happy

सुप्रिया आभार...

सत्या
लहान मुलं ज्या वयात न कळणारं बोलतात त्यावयात ट्रॅफिक जाम वगैरे सुद्धा कळत नसावं त्यांना बहुधा....
असो मलाही नाही कळली Sad

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

ट्रॅफिक जाम वगैरे सुद्धा कळत नसावं त्यांना बहुधा.... >> तेच तर म्हणतो आहे मी.. याचा अर्थ तुला खरच नाही कळाली आहे.
एका मागे एक गाडी ... अरे ही तर ट्रेन झाली आहे गाड्यांची आणि बाबा जॅम म्हणता आहेत (माझ्या मुलाला ट्रॅफीक जॅम म्हणजे खायचा.. जॅम वाटत असावा बहुदा ) पण जॅम दिसतच नाही आहे कुठे.. सिग्नल सुटतो ट्रेन तुटते...
बघा ट्राफिक मध्ये अडकल असताना विचार करुन मागच्या काचेतुन पहात रहा तुमची ट्रेन कशी मोठ्ठी होत जाते ते... लेन तोडुन घुसणार्‍या गाड्या... ट्राफिक मध्ये अडकल्यावर वैतागण्या पेक्षा तुमच्या आतल बालपण बाहेर येऊ द्या मज्जा घ्या.. थकवा निघुन जातो. गाड्यांची लांब राग म्हणजे तुमीच जोडत बसलेली ट्रेन आहे समजा, जेवढी मोठ्ठी ट्रेन तेवढी जास्त मज्जा... घड्याळाच्या काट्याला चीटकुन चिडचीड होण्या पेक्षा हे बर नाही का?

एका मागे एक गाडी,
झाली केवढी मोठ्ठी ट्रेन
काही डब्बे सोडुन गेले
तोडुन गेले लेन

सत्या, बालकवितेच्या सदरात असे मेजर प्रॉब्लेम मांडत जाऊ नकोस बाबा. सगळ्याच गोष्टीत कशी रे तुला मजा येते ?? पण मला मजा आली ही मजा वाचताना.
तुझ्या मुलासारखा माझा मुलगा ही भन्नाट प्रश्न विचारतो कधी कधी. उत्तर देता-देता भंबेरी उडत आमची.