कोथिंबीरीचे मुळं
कोथिंबीर
हिरव्या मिरच्या
लसूण
मिठ
तेल
तुळशीची पाने*
पुदिना पाने*
ब्राम्ही*
जवसाचे तेल*
* आवडत असल्यास व उपलब्ध असल्यास.
(१) साहित्य:
ह्यात तुळशीची पाने(Horapa leaves), ब्राम्हीची पाने, पुदिना आवडत असल्यास व उपलब्ध असल्यास वापरावी.
इथे मी तुळशीची पाने व ब्राम्ही पुदिन्याची चटणी घातलिय.
माझ्याकडची काही मुळं ताजी तर काही फ्रोजन आहेत.
(२) मुळं चिरुन घेतल्याने मिक्सरच्या पात्यात अडकत नाहीत.
(३) सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटुन घेणे. गरज पडलिच तर अगदी थोडे पाणी वापरावे.
(४) तेल गरम करुन थंड झाल्यावर घालावे.
ह्यात जवसाचे तेल असल्यास थोडे गरम न करताच घालता येते.
(५) तेल व चटणी स्वच्छ बरणीत व्यवस्थित मिसळून घ्यावे.
(६) तेल चटणीपेक्षा थोडे वर राहिल तर बरे.
ही चटणीत दही घालून चवीला मस्त लागते. चपाती, भाकरी बरोबर पण छान लागते. तसेच थालिपिठ, धिरडे, डोसा, पराठा ह्यासोबत पण छान लागते.
नलिनी थाय
नलिनी
थाय लोकांच्या स्वैपाकात ही मुळं वापरतात - पण फक्त मुळांचा जाडसर भाग घेतात. अगदी टोकाची fibrous मुळं कधी चित्रात तरी दिसली नाहीत. वाटायला त्रास नाही का होत ? मी चटणीत पुदिना घालते पुष्कळदा पण तुळस कधी घातली नाही. Horapa हे कुठलं नाव आहे तुळशीचं? आम्हाला वनस्पतीशास्त्रात Occimum Sanctum शिकवलं होतं.
नले,
नले, दिवाळीच्या शुभेच्छा गं.
काय माणसं सुदैवी असतात, आम्हाला कोथिंबीर मिळायची मारामार आणि याना चटणी करण्याइतकी मुळं मिळतात !!!
नलुताई,
नलुताई, सचित्र कृती पाहून आनंद झाला. करुन खाऊन पाहिल्यानंतर किती होईल!
शोनू, मला
शोनू, मला नव्हतं माहित की तंतूमुळं नाही वापरत ते. मी अगदी शेवटचा भाग तसा काढुनच टाकते.
अगं आमच्याकडे येतात ती तुळशीची पाने थायलंड वरुनच येतात आणि horapa leaves असेच लिहिलेले असते त्यावर. अर्थात हि पाने मला सब्जासारखीच जास्त वाटतात.
Thai Sweet Basil or ’Horapa’ is one of the common cultivar group of basil. It’s a common herb used widely in Southeast Asia region especially in Thailand. गुगल केल्यावर हि माहिती मिळाली.
दिनेशदादा, धन्यवाद.
बी, बघ मग करुन नक्की.
अशी पण चटणी करतात...मि
अशी पण चटणी करतात...मि प्रथमच पाहिलि...