१ कप मैदा
१ कप रोल्ड ओट्स
१ कप डेसिकेटेड कोकोनट
३/४ कप ब्राऊन शुगर
१२५ ग्रॅम बटर / मार्जरीन
१ टीस्पून सोडा बायकार्ब (बेकिंग सोडा)
२ टीस्पून गोल्डन सिरप**
२ टीस्पून गरम पाणी
खालिल घटक ऐच्छिकः
- हेझलनट चे तुकडे किंवा
- चॉकलेट चिप्स
ANZAC बिस्किटे ही युद्धावर जाणार्या सैनिकांना बरोबर देण्यासाठी किंवा त्यांना बोटीने पाठवण्यासाठी काहितरी टिकाऊ पदार्थ हवा म्हणुन खास बनवण्यात येत. ही बिस्किटे घरात सहज उपलब्ध असलेल्या जिन्नसांपासुन - ओट्स, खोबरे, मैदा इ. घालुन बनवलेली असतात. ही बिस्किटे पौष्टिक तर असतातच आणि पोटभरूही असतात.
२५ एप्रिल हा ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडमधे 'ANZAC DAY' म्हणून ओळखला जातो.
ANZAC DAY बद्दल मी LEST WE FORGET! - the ANZACs - एक शौर्य गाथा इथे माहिती लिहीली आहे ती जरूर वाचा.
मागच्या वर्षी ANZAC DAY करता 'ANZAC गोल्डीज' बनवल्या होत्या. यंदाच्या ANZAC DAY ला ही पारंपारिक 'ANZAC बिस्किट' केली.
१. सर्वप्रथम ओव्हन १६० डिग्री सेंटीग्रेड ला तापत ठेवा. बेकिंग ट्रे वर बेकिंग पेपर लावुन तयार ठेवा.
२. एका बोल मधे मैदा चाळून घ्या. त्यात ओट्स, साखर आणि डेसिकेटेड कोकोनट मिक्स करा. नट्स्/चॉकलेट चिप्स घालणार असाल तर ते ही घाला.
३. एका पातेल्यात बटर + गोल्डन सिरप + २ टीस्पून पाणी घाला आणि गरम करायला ठेवा. बटर वितळले की गॅस बंद करुन मिश्रणात सोडा बायकार्ब घाला आणि ढवळा.
४. आता हे बटर चे मिश्रण मैदा+ओट्स च्या मिश्रणावर ओता. आणि हलके मिक्स करा.
५. मिश्रण नीट एकत्र झाले की चमचाभर मिश्रणचा गोळा बेकिंग ट्रे वर ठेवा. थोड्या थोड्या अंतरावर हे गोळे ठेवा कारण बेक होताना बिस्किटं पसरतिल. हे गोळे फोर्क ने हलकेच थोडे चपटे करा.
६. ट्रे ओव्हन मधे ठेऊन १०-१२ मिनीटे (सोनेरी ब्राऊन रंग येइतो) बेक करा.
७. ट्रे बाहेर काढा पण बिस्किटे ५-७ मिनीटे ट्रेवरच राहू द्या आणि मग वायर रॅकवर ठेवा.
८. खुसखुशीत पण थोडी चिवट तयार बिस्किटं गरम गरम चहा / दुधा बरोबर खा. उरलेली हवाबंद डब्ब्यात झाकुन ठेवा.
- ही बिस्किटं गोल्डन सिरप घातल्यामुळे थोडी चिवट (च्युई) असतात. गोल्डन सिरप आणि बटर यांच्या गरम मिश्रणात बेकिंग सोडा घातल्यावर जी काही केलिकल रिअॅक्शन होते त्याच्यामुळे बिस्किटाला चिवटपणा येतो.
- गोल्डन सिरप नाही घातले तरी चालु शकेल. चवीत फारसा फरक पडणार नाही पण बिस्किटे जास्त खुसखुशीत अपेक्षित चिवटपणा येणार नाही.
- या बिस्किटात थोडे नट्स, सीड्स, गव्हाचा कोंडा घातला तर पौष्टिक होतिल.
- मी मैदाच वापरला पण कणिक वापरून बघायला हरकत नाही.
- ही बिस्किट अर्धी मेल्टेड चॉकलेट मधे बुडवली तर मस्त लागतात
- यात कुठलाही इसेन्स घालायचा नाहिये. जो काहि स्वाद येतो तो खोबरे, ब्राउन शुगर, गोल्डन सिरप चा असतो.
- मुळ रेसिपीमधे साधी साखर वापरली आहे. मी ब्राऊन शुगर वापरली आहे.
- अशी २ बिस्किटे आणि सोबत दूध घेतले की झटपट ब्रेकफास्ट
** गोल्डन सिरपः म्हणजे कॅरमलाईज्ड पाकच. आधी थोडी साखर आणि थोडे पाणी घालुन साखर वितळवुन गोल्डन ब्राउन करायची त्यात अजुन भरपूर साखर आणि लिंबू /लिंबाचा रस घालायचा. गोल्डन सिरप साधारण मधाच्या कन्सिस्टंसीचे असते. पण या रेसिपीत मध वापरायचा नाही कारण मग यांना ANZAC बिस्किट्स नाही म्हणता येणार. चवही बदलेल.
वॉव मस्त वाटतायत. करून पाहते
वॉव मस्त वाटतायत. करून पाहते मल्टीग्रेन कणीक वापरून
तूप वापरू शकते का? कारण माझ्याकडे आत्ता अनसॉल्टेड बटर नाहीये.
मस्त प्रकार !
मस्त प्रकार !
धन्य आहेस तू लाजो! आत्ता
धन्य आहेस तू लाजो! आत्ता उचलून तोंडात टाकावंसं वाटतंय बिस्किट
ही बाई हात लावेल त्या इन्ग्रेडियंटचं सोनं करेल.
अरे वा मस्तच! अजून ANZAC Day
अरे वा मस्तच! अजून ANZAC Day बद्दल वाचलं नाही .. ते नंतर वाचेन ..
ये गोल्डन सिरप क्या है, ये गोल्डन सिरप?
साहित्यात त्याच्यापुढे दोन अॅस्टेरिस्क्स् दिसले पण फूटनोट दिसत नाही त्यासाठीची ?
लाजो, मस्तच देशात युनिबिक ची
लाजो, मस्तच

देशात युनिबिक ची ANZAC कुकीज खाल्लि होती आणि आवडली पण होती. त्याचा इतिहास आज कळला. धन्यवाद
मस्तच! >>साहित्यात
मस्तच!
>>साहित्यात त्याच्यापुढे दोन अॅस्टेरिस्क्स् दिसले पण फूटनोट दिसत नाही त्यासाठीची ?
मीपण हेच लिहीणार तेवढ्यात तू लिहीलेलं दिसलं
गोल्डन सीरप असं गूगल करा बघू.
गोल्डन सीरप असं गूगल करा बघू.
देखणी बिस्किटं! सही वाटतेय
देखणी बिस्किटं! सही वाटतेय रेसिपी.
अहो गूगल पुरस्कर्ते, गूगल
अहो गूगल पुरस्कर्ते, गूगल करून आम्हाला दिसेल पण लाजोची रेसिपी अर्धवटच राहील ना?
धन्यवाद अश्विक्के
धन्यवाद
अश्विक्के
>>साहित्यात त्याच्यापुढे दोन अॅस्टेरिस्क्स् दिसले पण फूटनोट दिसत नाही<<< सॉरी, विसरले काल रात्री. आता पाकृ अपडेट केली आहे विथ ** चे स्पष्टीकरण
अंजली, तूप नको. अन्सॉल्टेड बटर नाही साधेच बटर / मार्जरीन वापरायचे आहे.
या रेसिपीच्या काहि वर्जन्स मधे स्पेल्ट फ्लार, राईस फ्लार आणि बटर ऐवजी ऑऑ, कोकोनट ऑईल वगैरे वापरले आहे आधिक हेल्दी / वेगन वगैरे बनवण्यासाठी. पण ओरिजिनल रेसिपीने येणारा जो स्वाद, चव आहे ती नक्कीच येणार नाही या वर्जन्स मधे
मस्त आहेत. आम्ही याला कुकीज
मस्त आहेत.
आम्ही याला कुकीज म्हणणार.
अंजली, तूप नको. अन्सॉल्टेड
अंजली, तूप नको. अन्सॉल्टेड बटर नाही साधेच बटर / मार्जरीन वापरायचे आहे.
>>>>>> वोक्के
ओह.. टू गुड!!!!!!!! लेकीला
ओह.. टू गुड!!!!!!!! लेकीला पाठवलीये तुझी रेस्पी.. तिला ही बेकिंग ची भयंकर आवड आहे..
व्वा! लाजो द बेकिंग क्वीन!
व्वा! लाजो द बेकिंग क्वीन!
लाजो,
लाजो, मस्तच........................................
मस्त. नक्की करुन बघणार.
मस्त. नक्की करुन बघणार.
धन्यवाद सगळ्यांना बिस्किट्स
धन्यवाद सगळ्यांना
बिस्किट्स केलीत की फोटो डकवा
लेकीला पाठवलीये तुझी रेस्पी.. तिला ही बेकिंग ची भयंकर आवड आहे..<< वर्षूताई
छान आहे रेसिपी.. करुन बघेनच,
छान आहे रेसिपी.. करुन बघेनच, पण ऑथेंटिक नसणार अर्थातच. माझ्याकडे गोल्डन सिरप नाही आणि मी मैद्याऐवजी कणिक वापरुन करेन.
ब्राऊन शुगर कधी घालयची ते लिहिले नाहीस. बहुतेक ओट्स वगैरे एकत्र करताना त्यातच घालायची असे वाटते.
धन्स साधना ओट्स, कोकोनट
धन्स साधना
ओट्स, कोकोनट बरोबरच साखर घालायची 
कणिक वापरली तर बेपा घालावी
कणिक वापरली तर बेपा घालावी लागते का? किती घालायची ती?
लाजो धन्यवाद.आज ओट्स एनर्जी
लाजो धन्यवाद.आज ओट्स एनर्जी बिस्किट्स केले.खूपच मस्त.छान चव आहे.