Submitted by लोला on 12 April, 2013 - 18:35
BMM 2013 ची वेबसाईट हा एक धाग्याचा विषय असूदे का?
http://www.bmm2013.org/
माझ्या तक्रारी आहेत.
नको असल्यास काढून टाकू शकता.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हरकत नाही. तुमच्या अडचणी
हरकत नाही. तुमच्या अडचणी कळाल्यात तर योग्य त्या कमीटीला कळवता येईल.
फारच गिचमिड आहे तिथे आणि
फारच गिचमिड आहे तिथे
आणि स्क्रीनवर सारखं काहीतरी चालतं-फिरतं.. वरच्या आडव्या मुख्य मेनूवरुन काही सिलेक्ट केलं तर मध्यभागी माहिती येते (ती पण बदलते) आणि ती पूर्ण नाही आहे. डाव्या बाजूचा (आणि कधी कधी उजव्या बाजूचा!) उभा मेनूही तेव्हाच बदलतो. ते लक्षात येत नाही पटकन.
इंग्रजी-मराठी विचित्र मिश्रण आहे. फाँटही वेगवेगळा आहे. शुद्धलेखनाच्या चुका आहेत.
नॉर्थ अमेरिकेतले कार्यक्रम पहायला गेलं तर खालचा जो स्कीन आहे त्यात वरची निळी अक्षरे या लिन्क्स आहेत. त्या कश्यासाठी आणि कुठे जातात? (सध्या कुठेच नाही)
कार्यक्रमांत Melange आणि स्वरगंध ची माहिती दिसतेच आहे. पुन्हा डाव्या बाजूला त्यांना स्पेशल लिन्क्स दिल्यात!
कार्यक्रमांच्या तारखा-वेळा अजून ठरलेल्या नाहीत का? प्रोग्रॅमिन्ग ग्रिडमध्ये दिसत नाहीत.
क्रमश:
मला खटकलेली गोष्ट म्हणजे
मला खटकलेली गोष्ट म्हणजे रजिस्टर केल्यावर इमेलमधून Clear text मध्ये माझा पासवर्ड मला पाठवला.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
नात्या, lol हो. शुद्धलेखनाचा
नात्या, lol हो.
शुद्धलेखनाचा "नमुना" पहायचा असेल तर ही लिंक पहा. पहिलेच वाक्यात समजेल पण स्क्रोल करुन पूर्ण वाचा.
http://bmm2013.org/food-welcome-marathi.html
पदार्थांचे फोटोही बरेचदा इकडे-तिकडे पाहिलेले/टाकलेले आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>आपण या अधिवेशनात घेतलेल्या
>>आपण या अधिवेशनात घेतलेल्या न्याहारीच्या किंवा जेवणाच्या पहिल्या पानापासून आपल्या या सुखद खाद्य अनुभवाची सुरवात होईल काट्या चमच्या ऐवजी आपली बोट आणि तळहात यांचा जास्तीत जास्त वापर करा अशी निकडीची विनंती आम्ही तुम्हाला करू याच शास्त्रीय कारण म्हणजे, जेंव्हा तुम्ही जेवण्यासाठी बोट आणि तळहात वापरता तेंव्हा तुमच्या रुचीज्ञानकालिका उत्तेजित होतात, भूक वाढते आणि पचनही चांगले होते>> एवढंच वाचलं. अमराठी व्यक्तीने लिहिल्यासारखं वाटतंय.
तळहात यांचा जास्तीत जास्त
तळहात यांचा जास्तीत जास्त वापर करा >>> म्हणजे नक्की काय , तळहातावर भात घेऊन खायचा की काय ?
श्री, आपली बोट वापरायला
श्री, आपली बोट वापरायला सांगितली आहे ते तुला खटकलेलं दिसत नाही![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सायो काटे चमचे पण नाही बोटं
सायो काटे चमचे पण नाही बोटं पण नाही , मग वापरायचं तरी काय ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
श्री, आपली बोट की
श्री, आपली बोट की बोटं??
ज्यांनी लिहिलंय त्यांचा आणि पूर्णविरामाचा कधी संबंधच आला नसावा. तसंच कुणाला प्रूफ रिडींग करायचीही गरज वाटली नाही हे दिसतंच आहे. कठीण आहे!!!!
>>आम्ही तुमच्या समोर
>>आम्ही तुमच्या समोर एकापेक्षा एक सरस आणि घरगुती वाटतील असे महाराष्ट्रीयन पदार्थ सादर करणार आहोत जेणेकरून तुम्ही स्मृत्याकुल व्हाल.या मेन्यूमध्ये "शाही", "गावरान" त्याचबरोबर मुंबईच्या खाऊ गल्लीत मिळणारे पण कुठल्याही नॉर्थ अमेरीकन रेस्तौरांत मध्ये सहज सहजी न मिळणारे असे पदार्थ असतील.
हेही अमराठी वाटतंय. स्मृत्याकुल म्हणजे nostalgic. सोप्या मराठीत आपल्या जुन्या आठवणी जागृत होतील असे म्हटले असते. अनुवाद केला की असे जड शब्द वापरावे लागतात.
सहज सहजी म्हणजे काय?
रेस्तौरांत?
हे शेवटचे वाक्य - "शाही", "गावरान" आणि मुंबईच्या खाऊ गल्लीत मिळणारे, पण अमेरिकेत दुर्मिळ असे पदार्थ मेन्यूमध्ये असतील - असे असते तर शोभले असते.
(No subject)
स्मृत्याकुल व्हाल >> म्हणजे
स्मृत्याकुल व्हाल >> म्हणजे नक्की काय होईल? हा शब्द गेला नाही कधी.
लोलानी दिलेली लिंक पाहून खरंच थक्क व्हायला झालं.
मायबोलीच्या विविध उपक्रमांचे संयोजक मुशोसाठी केवढे कष्ट घेतात!
आपली बोट lol. शुगोल, खरं आहे.
आपली बोट lol.
शुगोल, खरं आहे. हे कोणी हिंदी भाषिकांनी केलंय का? "खान-पान", "रंगारंग" असले शब्द आहेत म्हणून वाटलं.
>>स्मृत्याकुल म्हणजे nostalgic![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
धन्यवाद स्वाती, मला ते काय कळलंच नव्हतं
बाय द वे, रजिस्टर केलेल्या
बाय द वे, रजिस्टर केलेल्या सगळ्यांची नावं जाहीर का करतात? ('ते हे चाललेत म्हणून आम्ही पण जाणार, किंवा म्हणून आम्ही जाणार नाही' ठरवायला बरं?
)
कुणी त्या लिस्टीवर बाऽरिक लक्ष ठेवून असेल तर, 'नवरा बायको दोघेही अधिवेशनाचे चार दिवस घरी नाहीत. (घरात तेवढे दोनच जीव राहतात हे गृहीत धरून), हात साफ करायला घर मोकळं!)
स्मृती आणि व्याकुळ याचा तो
स्मृती आणि व्याकुळ याचा तो संधी असेल तर " स्मृत्व्याकुल" असा होईल ना?
विचित्र आहे तो स्मृत्याकुल
विचित्र आहे तो स्मृत्याकुल शब्द. उगाच आपलं भारी मराठी दाखवायला वापरलेला.
स्मृत्याकुल म्हंजे स्मृतीने
स्मृत्याकुल म्हंजे स्मृतीने याकुल झालेला का ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
<<तळहात यांचा जास्तीत जास्त
<<तळहात यांचा जास्तीत जास्त वापर करा >>
तीर्थ-प्रसादासाठी.
घरचंच कार्य समजुन संयोजकांना सांभाळुन घ्या!
लोकहो तुमचा feedback इथे बघून
लोकहो तुमचा feedback इथे बघून योग्य त्या व्यक्तीला द्या
http://bmm2013.org/contact-us/bmm-committee-list.html
असामी, म्हणजे कोणाला? लिस्ट्
असामी, म्हणजे कोणाला? लिस्ट् वाचून कळलं नाही. "मिडिया आणि मार्केटीन्ग" का? मग इथं लिहीलेलं चालेल की.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
इथे 'स्टेट' लिस्ट मध्ये स्टेट्सची नावे नाहीत - http://bmm2013.org/culturalprograms/saregama.html
राज, हा "फीडबॅक" आहे. हे काम कोणाकडून तरी करुन घेतलेलं आहे, ते नीट झालेलं नाही हे सांगायलाच पाहिजे.
"Information Technology- Chair" हेच का ते असामी?
फिडबॅक नेहेमी खाजगीत दिला
फिडबॅक नेहेमी खाजगीत दिला जावा, जाहिररीत्या नव्हे. माझं प्रांजळ मत; पुढे तुमची मर्जी.
असामीने लिंक्स दिल्या आहेतच.
लालू site बद्दल IT ला कळव.
लालू site बद्दल IT ला कळव. जनरल गोष्टी असतील त्या Convener ना कळवा. "मिडिया आणि मार्केटीन्ग" वाले इथे वाचतीलच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जे साईटवर आहे ते धडधडीत
जे साईटवर आहे ते धडधडीत सगळ्यांना दिसतंय! यात आता काय डोंबल खाजगी फीडबॅक देणार?
तसं ही चर्चा इथे हवी का नको हे मी आधीच विचारलं होतं
इथे दिलेल्या प्रतिसादानंतर,
इथे दिलेल्या प्रतिसादानंतर, अधिवेशनाच्या मेनुबद्दलच्या वेबसाईट विभागात बदल केला आहे.
फीडबॅकबद्दल धन्यवाद. इतरही काही सूचना असतील तर जरूर कळवा.
http://bmm2013.org/food-welcome-marathi.html
धन्यवाद. आता बरं आहे. इथे
धन्यवाद.
आता बरं आहे.
इथे http://bmm2013.org/culturalprograms/north-america-programming.html लावणी ही डान्समध्ये येते तरी MMLA वाल्यांच्या Lavani ची पुन्हा वेगळी लिंक आहे. आमचं नाटक मात्र Drama च्या एका पानावरच सगळ्यांसोबत आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आमचं काही चुकलं का?
आमचं काही चुकलं का?>> तुम्ही
आमचं काही चुकलं का?>> तुम्ही लावणी करत नाहि आहात हे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)