चायनीज वोक (चायनीज ग्रेव्ही)

Submitted by मामी on 9 April, 2013 - 02:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चायनीज पदार्थ करताना लागणारे नेहमीचे यशस्वी कलाकार :
* फ्लॉवर, गाजर, मशरूम्स, फरसबी, पातीचा कांदा, सिमला मिर्ची. (हे हवेतच. हवेतच म्हणजे पाहिजेतच.)
* शिवाय हवं तर ब्रोकोली, झुकिनी, पालक (आधल्या रात्रीच पालकाची भाजी करून झाल्याने तो संपला. म्हणून माझ्या फोटो/रेसिपीत नाही. पण नक्कीच घालू शकता.).
*सिमला मिर्च्या रंगेबिरंगी मिळाल्या तर नक्कीच त्या घ्या. छान दिसतात ते रंग. मी चार रंगाच्या सिमला मिर्च्या वापरल्या आहेत - हिरवी, लाल, पिवळी आणि केशरी.
* भरपूर बारीक चिरलेला भरपूर लसूण, आवडी (आणि कुवती) नुसार हिरव्या मिरच्या.
* आवडत असेल तर कोथिंबीर - बारीक चिरून.
* अजिनोमोटो. हे असेल तर खूपच ऑथेंटिक चव येते. नको असेल तर साधं मीठ, कॉर्नफ्लावर, हिंग.

क्रमवार पाककृती: 

भाज्या स्वच्छ धुऊन, (लागू असेल तिथं) शिरा-बिरा काढून कापून (खूप बारीक बारीक नका कापू. अंमळ मोठ्याच फोडी करा) घ्या.

एका मोठ्या वोकमध्ये (शीर्षकात वोक आहे म्हणून रेसिपीत कढईला वोक म्हणण्यात येईल), तेल घाला. शेंगदाण्याचे, ऑलिवचे, सूर्यफुलाचे ... कोणतेही चालेल. तेलाची जास्त चिकित्सा करत बसू नका.

तेल जरा तापलं की त्यात चमचाभर हिंग घालून त्यावर लसूण, मिरची घाला. दोन मिनिटं परता आणि लगेच भाज्या घाला.

गॅस मोठा ठेऊन चमच्याने चार मिनिटं परतून घ्या आणि मग झाकण ठेऊन एक वाफ आणा. भाज्या अर्धकच्च्याच राहिल्या पाहिजेत याची काळजी घ्या.

एका बोलमध्ये चवीनुसार अजिनोमोटो, कॉर्नफ्लावर एकत्र करून पाण्यात कालवून घ्या. हे मिश्रण भाज्यांच्यात घाला आणि उकळी येईपर्यंत मोठ्या गॅसवर ठेवा. गॅसही मोठा ठेवा. हवं तर अजून पाणी घाला. भाताबरोबर वगैरे खाता येईल इतपत रसदार असलं पाहिजे.

उकळी आली की हे मिश्रण दाटसर होईल. मग त्यात हवं असल्यास साधं मीठ आणि कोथिंबीर घाला.

चायनीज वोक तयार. गरमागरम भाताबरोबर किंवा राईस नुडल्सबरोबर खा.

वाढणी/प्रमाण: 
काही कल्पना नाही बुवा!
अधिक टिपा: 

आवनफ्रेश*आणि आमचं घर शाकाहारी असल्याने रेसिपी शाकाहारी आहे. पण यात चिकनचे तुकडे, कोलंबी, इतर कोणत्याही माश्याचे तुकडे टाकायला हरकत नाही.

*माहितीचा स्त्रोत बघा.

माहितीचा स्रोत: 
दादर - शिवाजीपार्कचं आवनफ्रेश. इथे चायनीज वोक ऑर्डर केल्यावर एका छोट्याश्या शेगडीवर या ग्रेव्हीचा छोटा वोक समोर आणून ठेवतात. भात वा नुडल्सबरोबर ती ग्रेव्ही खायची. आवनफ्रेशमधला हा माझा आवडता प्रकार. एकदा करूनच पाहू म्हणून केला.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वोक म्हणजे पसरट भांडं ना? >> Uhoh अजुनच कन्फ्युजन!!
"sizzlers and wok" मधलं वोक का? मला वाटायचे त्याचा उच्चार फक्त 'वो' असा होतो Uhoh

दिसायला भारी दिसतयं. 'आयतं' मिळालं तर आवडेल! Wink एवढ्या भाज्या चिरायच्या म्हणजे..

दिसतय तर छानच. मला वाटते नुसते पण चांगले लागेल.. डायटींग वाल्यांना.. आम्ही मात्र डाय फॉर एटींग वाले Proud

मस्त आहे रेसिपी Happy पण मला थोडं सॉया सॉस / केचप मानिस घालायला आवडेल यात Happy

वोक म्हणजे पसरट भांडं ना? ग्रेव्ही नव्हे.<<< मंजूडी, आपल्याकडे कसं कढाई पनीर, चिकन हांडी, चिकन कढाई म्हणतात तसं बरेच वेळेस हे हॉटेलवाले 'चिकन-चिली वॉक', 'वॉक शेझुवान' असली नांव देतात. वॉक मधे केलेले कुकिंग म्हणून बहुतेक Happy

वॉक (ऑझी उच्चार)/वोक म्हणजे पसरट भांडे - कढई याची भारतिय बहिण Happy

रेसिपी चांगली आहे. आम्ही यामधे थोडासा सोञा सॉस आणि थोडा चिली सॉस घालून खातो. \

आता चायनीज रेसिपी कुणी देत असेल तर मला अमेरिकन चॉपसुईची रेसिपी द्या. घरगुती चव वाली नकोय. चायनीझ गाड्यावरची चव असणारी हवी आहे.

लसूण्-मिरचीबद्दल लिहायला विसरले खरं. ती तेलावर हिंग टाकल्यावर टाकायची. वर तसं लिहिते. धन्स के. सुचित्रा. Happy

वोक म्हणजे पसरट कढई हे बरोबर. त्या रेस्टॉरंटमध्ये या प्रकाराला वोक म्हणतात कारण ही ग्रेव्ही डायरेक्ट वोकमध्येच सर्व केली जाते. शीर्षकात नुसतं वोक म्हटलं असतं तर तुम्ही मला फाडून खाल्लं असतं म्हणून कंसात अजून एक नाव दिलं. तरी कल्ला सुरूच! Proud

घर शाकाहारी आहे हे वाचून मन कसे भरुन आलेय! >>> दिनेशदा, Happy

लाजो, नंदिनी ...... सोया सॉस, चिली सॉस घालून खाता येईलच.

नंदिनी, गाडीवरची चव हवी असेल तर सढळ हातानं तेल आणि अजिनोमोटो घालावं लागेल. ते काहीही झालं तरी आपल्याच्यानं होत नाही. मी बनवलेली ही रेसिपीही अगदी 'तश्शीच' लागली नाही.

मामे.. चक्क हिंग????????
ग्रेवी टेस्टी दिस्तीये..
वॉव चायनीज ,'कुवॉ' ला सोप्पा इंग्लिश शब्द आहे ,' वॉक" .. Happy

Happy

मामी नुसतंच पाणी घालायचं त्याऐवजी चिकन स्टॉक, व्हेज स्टॉक वगैरे नाही का घालायचा?

आणि थोडं सोया सॉस वगैरे? नुसतंच पाणी घालून ब्लँड चव नाही का येणार?

सायो, चिकन्/व्हेजीटेबल स्टॉक घातला तर उत्तम. देशात सहसा मिळत नाही. फारतर मॅगीचे क्युब्ज घालता येतात. पण मग त्या प्रकाराला तीच तीच चव येते म्हणून मी कटाक्षानं टाळलं.

चिली, सोया सॉस वरून घालून घेऊ शकता. पण ओरीजिनल चवही छान लागते.

गाडीवरची चव हवी असेल तर सढळ हातानं तेल आणि अजिनोमोटो घालावं लागेल. ते काहीही झालं तरी आपल्याच्यानं होत नाही.>>>> हे अगदी खर्र्र मामी Happy .....मी कितीही प्रयत्न केला तरी मला जास्त तेल्,मीठ टाकता येत नाही.

>>सायो, चिकन्/व्हेजीटेबल स्टॉक घातला>> मामी, सोया सॉसवरुन तुम्हांला माझ्या आयडीची आठवण झालेली दिसतेय Wink
तो प्रश्न सशलने विचारलाय.

>>सायो, चिकन्/व्हेजीटेबल स्टॉक घातला>> मामी, सोया सॉसवरुन तुम्हांला माझ्या आयडीची आठवण झालेली दिसतेय
तो प्रश्न सशलने विचारलाय.
>>>>> Lol असेल असेल.