आयत्या पिठाचे आप्पे

Submitted by लोला on 8 April, 2013 - 21:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आयते मिळालेले इडली पीठ
मुगाचे पीठ (आख्ख्या मुगाचे, जरा हिरवट दिसते)
आले-मिरची-कोथिंबीर
मीठ
तेल
ऐच्छिक - कांदा, काकडी/लाल ढबू/गाजर बारीक चिरुन

त्याचं असं झालं की वीकेन्डला एका मैत्रीणीकडे गेले होते. तिच्याकडे पाहुणे होते म्हणून त्यांच्यासाठी तिनं हेss एवढे इडलीचं पीठ करुन आंबवायला ठेवलं होतं म्हणे. पण ते फरमेन्ट झालंच नाही. (अमेरिकेत होतं असं, या दिवसात थंडी असते ना..) मग त्या पाहुण्यांसाठी इडल्या केल्याच नाहीत. (दुसरं काय केलं कुणास ठाऊक! मी विचारलं नाही, तिनं सांगितलं नाही. मी पाहुण्यांनाही विचारलं नाही). मग आता त्या एवढ्या पिठाचं करायचं काय? पाहुणे तर दुसर्‍या दिवशी जाणार होते. मग त्यातले तिने मला दिले. तर हे ते "आयते" पीठ.

मी या पिठाचे आप्पे करणार आहे असे एका माबोकर मैत्रिणीला सांगितले जी सध्या अमेरिकेत आली आहे (म्हणे) तेव्हा ती म्हणाली की आप्पे केल्यावर रेसिपी इथे नाही टाकली तर काय अर्थय? (म्हणजे "काहीच अर्थ नाही" या अर्थाने)
अलिकडे अनेक आप्पे रेसिप्या बघून मलाही खरंतर मलाही एक आप्पे रेसिपी टाकावी वाटत होती. पण एव्हाना बाकीच्यांनी सगळी पिठं वापरुन झाली होती. मग आप्पे कशाचे करायचे. काही "शहाण्या" लोकांशी गप्पा मारताना कुळीथ पीठ हा ऑप्शनसुद्धा मिळाला..ते फारसे कश्यात वापरले जात नाही तर ते आप्प्यात ढकलावे असाही विचार आला. पण मग हे "आयते" पीठ मिळाल्याने सगळे जमून आले. आत्तापर्यंत याची रेसिपी कुणी दिलेली नाही.

क्रमवार पाककृती: 

आयत्या इडलीच्या २ कप पीठात २-३ टेबलस्पून मुगाचे पीठ मिसळायचे, लागल्यास थोडे पाणी घालून सरसरीत करुन घ्यायचे. मग चवीनुसार मीठ आणि बाकी जिन्नस घालून आप्पे करायचे. ते कसे करायचे हे आत्तापर्यंत वाचून तुम्हाला माहीतच असेल. आप्पेपात्र असले म्हणजे झाले!

आप्पे तयार झाले की चटणीबरोबर गरम गरम खायचे. आयते पीठ असल्याने अक्षरशः पंधरा मिनिटात होतात! काहीच कटकट नाही, आयते आणि फुकट - doesn't get any better..

पांढरट आप्पे न आवडणार्‍यांना हे आवडतील, कारण मुगाच्या पिठामुळे वेगळा रंग येतो.

हा पहा फोटो-

aappa1.jpgappa2.jpg

वाढणी/प्रमाण: 
महत्त्वाचे नाही
अधिक टिपा: 

नवीन ट्रेन्डप्रमाणे ही रेसिपी लिहायचा प्रयत्न केला आहे. नुसतं आपलं साहित्य, कृती इ. बोअरिन्ग वाटतं म्हणे ते! फोटो असला तर जरा बरं. आजकाल अशी श्टोरी लिहायची फॅशन आहे. काही लोकांना ते आवडत नाही, "रेसिपीच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहीतात" असं काही लोक म्हणतात. ते खरंच आहे, पण जे काय लिहीतात त्यात थोडी रेसिपी असल्याशी कारण. Wink

माहितीचा स्रोत: 
ते नेहमीचंच, म्हणजे पारंपारिक रेसिपी आणि मी केलेले बदल!
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोल लोलाक्का Lol
त्या शहाण्या माणसांचा पत्ता मला ठाउक आहे Happy
फोटो सकट आप्पे/चटणी मस्त दिसते आहे.

>>>मग आता त्या एवढ्या पिठाचं करायचं क>>>
हे वाक्य, अहो एव्हढ्या डाळीचं करायचं तरी काय ह्या चालीवर वाचलं ... Proud (मी आप्पेप्रेमी/आप्पीवेडा नाही ;))

लोला, मस्त आहे रेसीपी. तोंपासु फोटो.
तुझ्याकडचे काही पीठ उरले आहे का? म्हणजे माझ्यासाठी आयत्या पीठाची व्यवस्था होतेय का ते पाहतीय!:डोमा:

. (अमेरिकेत होतं असं, या दिवसात थंडी असते ना..) मग त्या पाहुण्यांसाठी इडल्या केल्याच नाहीत. (दुसरं काय केलं कुणास ठाऊक! मी विचारलं नाही, तिनं सांगितलं नाही. मी पाहुण्यांनाही विचारलं नाही).>>>>>>>> एकदम मुक्तपिठीय रेसिपी. Biggrin

किंवा जसं तू आयत्या इडली पिठात मुगाच्या डाळीचे पीठ घुसवले तशी मुपि+माबोवरील नवीन ट्रेण्ड रेसिपी लिहीली आहेस! Wink

असो पण मस्त आहे. माझ्या मैत्रीणीने असे थंडीमुळे न आंबलेले पीठ दिले तर मीही करुन बघीन. आता आमच्याकडेही थंडी सुरु होतेय ना!

अर्थात फोटु मात्र एकदम ओरेजनल आहेत, लोलाने टाकलेले.

Lol

आयत्या पिठाचे आप्पे - आयत्या बीळावर नागोबा सारखे वाटत्येय Lol

लोलाचे आप्पे एकदम खतरा यम्मी दिसतायत Happy

आता एम्टीआर पीठाचे आप्पे पण लिहा कुणीतरी Proud Lol

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.... Lol
काश मलाही असले आयते पीठ कुणी दिले असते! पण इकडे थंडी नाहीये आणि पीठ देणारं ही कुणी नै त्यामुळे मंडळातर्फे घरीच पीठ आंबवून येत्या गुरूवारी गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर सदर पाकृचा प्रयोग कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर केला जाईल. Proud

रच्याकने फोटो एकदम दरोडेबल(दरोडा घालून खाण्यासारखे ते ''दरोडेबल'') आहेत.

Happy

गप्पांगप्पांमधून(च) आप्पे डोकावताहेत. आवडले, आवडली, आवडली.

>>>> दुसरं काय केलं कुणास ठाऊक! मी विचारलं नाही, तिनं सांगितलं नाही. मी पाहुण्यांनाही विचारलं नाही. >>> जरा विचारून सांगाच. उत्सुकता आहे.

>>>> एका माबोकर मैत्रिणीला सांगितले जी सध्या अमेरिकेत आली आहे (म्हणे) >>> ही मैत्रिण कोण ते आम्हाला माहित आहे. पण ती कोण हे माहित नाहीये.

आम्हाला हव्वं त्यावेळी तय्यार पीठ मिळतं बरं का! Happy

आप्पे केले तेव्हा आयतं पीठ आंबलं होतं की नाही?
म्हणजे आयतं पीठ आंबवलेलं आणायचं की ताजं दळलेलं ते ठरवता येईल.
समजा ताजं दळलेलं पीठ मिळालं तर ते घरी आणून आंबवायचं की नाही ते ठरवता येईल.

बाकी, ह्या तलोदच्या हांडवा पीठाचे आप्पेही फार सुंदर होता बर्का!
हेही आयतंच आहे पीठ, पण कोरडं आहे. खरंतर मी लिहिणार होते ह्याचीही पाककृती (श्टोरीसकट), पण आता जौदे!

मायबोलीवर 'अप्पा' महोत्सव चालू आहे एकदम. Wink

इडलीच्या पीठाचे आप्पे इतके चांगले नाही लागत.. मूगाचे पीठ घातले म्हणून चांगले लागले का?
रेसीपी पेक्षा श्टोरीच चांगलीय.. नवीन ट्रेंड जमतोय बर्‍यापैकी.

(मी वरीच्या तांदूळाचे आप्पे जन्माला घालायचे म्हणतेय "स्वप्रयोग" च्या नावाखाली) Proud

तोवर खालील पीठाचे कोणीतरी करू लिवा..
आयते ढोकळा पीठ,
ज्वारीच्या पीठाचे, बाजरीच्या, चवळीच्या... वगैरे.. वगैरे.

आयत्या पिठाचे नागोबे असं काहीतरी घाईत वाचलं.

आप्प्यांची चटणी डाळीची, ब्राऊन कलरची असते, असे अंधुकसे आठवते. चुकीचे आहे का?

मुगाचं पीठ घालायचं प्रयोजन काय?
इथे रेडीमेड डोसा बॅटर मिळतं त्यात कांदा, मिरची, कोथिंबीर घालूनही झटपट, टेस्टी आप्पे होतात.

Lol

तरी यात उडीद भारतात कधी आणि कुठल्या मार्गाने आले, भारतीय वंशाचे सावळे लोकच मूग आणि उडीद एकत्र कसे पचवू शकतात, तुमच्या घरात दाक्षिणात्य पदार्थ करायला आणि खायला कधी सुरुवात झाली इ.इ. तपशील यायला हवे होते. राग भटियार - कर्नाटिक संगीत वगैरे उल्लेखांनी पाककृतीची सुरुवात करता आली असती.

लोला, जबरदस्त रेसिपी. मी काही आप्पे करून बघणार नाही आहे. त्यामुळे वाचून जास्तच मजा आली. Happy
>> रच्याकने फोटो एकदम दरोडेबल
टोकुरिका , शब्द भारी आणि उपयोगी Lol
स्वाती_आम्बोळे, Rofl

दखलपात्र रेसिपी Proud
मी आप्पेपात्र फक्त न तळलेले दहीवडे आणि न तळलेले वडा-सांबारा तली उडीदवडे करण्यासाठी वापरते.

लोला मुगाचं पीठ ढकलायच्या आणखी रेस्प्या दे नं...घरी बरंच शिल्लक आहे...
फोटो तर छान आहेच....मग त्या मैत्रिणीला आप्पे पाठवलेस का? की आणखी पीठ मागवून राहिलिस Wink

शुम्पीची दहीवडे भाजायची आयड्यापण चांगली वाट्ते....

Pages