Submitted by कावळा on 6 April, 2013 - 04:34
मुंब्र्यात सात मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत साधारणतः ६० लोकांचा बळी गेला.निर्ढावलेले भूमाफिया आणि सुस्त शासनव्यवस्था या पार्श्वभूमीवर सदरील दुर्घटनेच्या संदर्भाने चर्चा अपेक्षित.
From Drop Box
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिलकधारी आला आहे. सर्व मृत
तिलकधारी आला आहे.
सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना. जखमींना सहाय्य मिळो व आयुष्यात पुन्हा समर्थपणे उभे राहण्याचे बळ मिळो. या दुर्घटनेच्या बातम्या वाचून विषण्ण वाटत आहे. असे म्हंटले जाते की भारत देशात सर्वात स्वस्त कमोडिटी म्हणजे मानवी आयुष्य आहे. ते चेष्टेने किंवा उपरोधाने म्हंटले जात असले तरी खरेच वाटावे अशी अवस्था आहे. सदस्यांनी या दुर्घटनेमागची कारणमीमांसा, असे होऊ नये यासाठी घेतली जावी अशी काळजी याबाबत कृपया अधिक माहिती द्यावी असे वाटते. आपण अनेकदा बांधकाम व्यावसायिकावर पूर्ण विश्वास ठेवून त्याची कामातील गुणवत्ता वादातीत मानतो. अवेअरनेस कमी पडत असावा असेही वाटते. तज्ञांनी कृपया प्रकाश टाकावा.
तिलकधारी चर्चा वाचायला मिळेल या आशेत आहे.
श्रद्धांजली.
तिलकधारी, महापालिकेचे
तिलकधारी,
महापालिकेचे स्थापत्यखाते कसे चालते ते मी सांगायला नको. जिथे कुंपणच शेत खाते, तिथे काय म्हणायचं! आशा दुर्घटना टाळण्यासाठी मोप कायदे आहेत. पण ते पाळणार कोण, हा प्रश्न आहे.
बांधकाम क्षेत्रातील गैरप्रकारांचा कोणी आढावा घेतला तर बरं होईल.
आ.न.,
-गा.पै.
जिथे कुंपणच शेत खाते, तिथे
जिथे कुंपणच शेत खाते, तिथे काय म्हणायचं! >>>> या खादाड कुंपणात बिल्डर पासुन स्थानीक नगरसेवक, पालिका आयुक्त, ... पासुन जी साखळी सुरू होते त्यामधे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राजकीय पक्ष सर्वच येतात. कोण कोणाला रोखणार![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ईथे देखील सिस्टीम मधले छोटे मासे गळाला लाऊन बाकी 'ये रे माझ्या मागल्या'... चालतच राहणार
काल इथल्या सीएनेन वर काय
काल इथल्या सीएनेन वर काय सांगितले ते मी ऐकले. एकूण त्या दिल्लीच्या बातमीदाराच्या मते, विशेष काही नाही, असे होते. त्याला कारणे आहेत, पण भारतात असेच चालायचे!
"कारण असे बेकायदेशीर बांधकाम खूप ठिकाणी होते. नि बेकायदेशीर असल्याने मालहि कमी दर्जाचा वापरतात. अहो मुंबईत तर अश्या हजारो इमारती आहेत. याविरुद्ध कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. भारतात कुठल्याच कायद्याची अंमलबजावणी नीट होत नाही. जे मेले ते बांधकाम करणारे मजूर, बाहेरून आलेले, त्या इमारतीत रहात होते. तसे ते रहातातच. गरीब असतात, रहायला जागा नसते. "
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
गेलेल्यांच्या जीवन कहाण्या
गेलेल्यांच्या जीवन कहाण्या वाचून अगदी कसे तरी झाले. भ्रष्टाचाराचे बळी. त्यात वन खाते व टीएम सी जबाबदारी एकमेकांवर ढकलत होते. हे वाचून अगदी चीड व संताप झाला. मीडिया त्या पाच वर्षाच्या मुलीचे साउंड बाइट घ्यायला धडपडत होते. तिचे आघाताने डोळे सुजून बंद झाले आहेत. आईबाप गेले आहेत त्याचा पत्ता नाही. आणि हे काय ? दोन महिन्यात आठ मजले कसे काय उभे राहतात याची शंका कोणाला आली नाही का?
गेलेल्यांच्या जीवन कहाण्या
गेलेल्यांच्या जीवन कहाण्या वाचून अगदी कसे तरी झाले. भ्रष्टाचाराचे बळी. त्यात वन खाते व टीएम सी जबाबदारी एकमेकांवर ढकलत होते. हे वाचून अगदी चीड व संताप झाला. मीडिया त्या पाच वर्षाच्या मुलीचे साउंड बाइट घ्यायला धडपडत होते. तिचे आघाताने डोळे सुजून बंद झाले आहेत. आईबाप गेले आहेत त्याचा पत्ता नाही. आणि हे काय ? दोन महिन्यात आठ मजले कसे काय उभे राहतात याची शंका कोणाला आली नाही का?