बाजरीचं पीठ १ वाटी, ज्वारीचं पीठ १ वाटी, कणीक अर्धी किंवा १ वाटी, धणे-जिरं-मेथीचे दाणे- ताजे भाजून, मिक्सरला वाटून, ओवा- एक छोटा चमचा, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ- चवीप्रमाणे, वडे तळायला तेल.
हेच वरचे जिन्न्स वड्यांकरता चालतील. थालिपीठांकरता जाडसर चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
सगळे जिन्नस एकत्र करुन मिडीयम (फार घट्ट किंवा सैल नाही) पीठ भिजवावं.
एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर वडे थापावेत. मध्ये एक भोक पाडावं व खरपूस तळून घ्यावेत.
थालिपीठांकरताही हेच. तव्यावर झाकण घालून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावीत.
पाककृतीत नाविन्य असं काहीच नाही पण भारताबाहेर रहात असताना बर्याचदा भाजणी नसते किंवा संपलेली असते तेव्हा वरची पीठं आणि धणे, जिरं, जिरं,ताजं भाजून कुटूनही छान खमंगपणा येतो हे लक्षात आलं. भाजणीची उणीव जाणवेनाशी झाली.
तोंडीलावणं म्हणून मिरच्या भाजून तिखट किंवा उसळी मिरची दह्याबरोबर वगैरे छान लागेल.
सायो, छान आहे कल्पना. ताज्या
सायो, छान आहे कल्पना. ताज्या मसाल्याचा स्वाद छान लागेल. माझ्याकडे बाजरीचे पीठ नसते पण ज्वारीचे नुसते थालिपीठ आमच्याकडे नेहेमी करतात. खरंतर भाजणी आमच्याकडे नसायचीच. नेहेमीच ज्वारीचे थालिपीठ. आता एकदा असे करून बघेन
एकदम आवडता प्रकार, बरोबर
एकदम आवडता प्रकार, बरोबर दही/ताक, लोणचं, चटणी
ज्वारीच्या पिठाची थालिपीठं भारी लागतात. मेथीदाणे भाजून वाटून घालायची आयडीया छाने.
रच्याकने,मक्याच्या पिठाची थालिपीठं पण मस्त लागतात.
मीपु, तोंडीलावण्याचं विसरले
मीपु, तोंडीलावण्याचं विसरले होते ते वर अॅड केलं.
मक्याचं पीठ अजिबातच आणलं जात नाही त्यामुळे करुन पाहिलेली नाहीत कधी.
छान आहे रेसिपि. मी सर्व पिठे
छान आहे रेसिपि. मी सर्व पिठे मावेत थोडी भाजून घेते आयत्या वेळेस त्याने खरंच भाजणी होते त्याची व चवही आणिक चांगली येते.
आयडीया चांगली आहे. मक्याच्या
आयडीया चांगली आहे.
मक्याच्या पिठाला स्वतःची चव असते त्यामुळे त्याचे वडे नि थालिपीठ दोन्ही छान होतात.
मस्तच
मस्तच
भाजणी नसेल तर खरंच मस्त ऑप्शन
भाजणी नसेल तर खरंच मस्त ऑप्शन आहे.
यात कालची उरलेली आमटी, भाजी
यात कालची उरलेली आमटी, भाजी घातली की जो खरपूस खमंगपणा येतो त्याला तोड नाही.
अरे वा! मस्तच... पण फोटो हवा
अरे वा! मस्तच...
पण फोटो हवा बै!
सुमेधाची मावेत पीठं भाजून घेण्याची आयडीयाही मस्त आहे.
छान प्रकार. हिच पिठे हवीत असे
छान प्रकार. हिच पिठे हवीत असे नाही, कुठलिही पिठे मिसळून करता येतील.
यामधे काकडी, गाजर, कोथिंबीर,
यामधे काकडी, गाजर, कोथिंबीर, कुठलीही पालेभाजी घालता येते. पीठामधे चमचाचमचाभर बेसन, नाचणीचं पीठ, ओट्समील, रवा, मक्याचं पीठ इत्यादि घालून टाकते.
यामधे थोडीशी उपवासाची भाजणी घातली तर थालिपीठ छान थापता येतात.
थालीपीठं मी डायरेक्ट तव्यावर आणि कढईमधे थापते. लोखंडी तव्यावर आणि कढईमधे खूप छान खमंग होतात.
(ती फेमस तवा चर्चा करायची का आता?)
मस्त होतात अशी मिक्स पिठांची
मस्त होतात अशी मिक्स पिठांची थालीपीठं.
मक्याच्या पिठात थोडी कणीक घालावी कारण मक्याचं पीठ जरा जड असते पचायला.
बारिक चिरून कोथिंबीर आणि मिरची, लसूण. खरपूस भाजली की भन्नाट लागतात!
चांगली आयडिया. सासूबाई नुसती
चांगली आयडिया. सासूबाई नुसती ज्वारीच्या पिठाची (अर्थातच कांदा-कोथिंबीर, हिंग-हळद-तिखट-मीठ घालून) लावतात भाजणी संपली की.
पिठं भाजून घ्यायची नाहीत का - हेच विचारणार होते.
बाय द वे, चाँद पॅलेसजवळच्या सब्झी मंडीत आता केप्रची भाजणी (साधी, चकलीची आणि उपासाचीही) मिळते.
नंदिनी, थालिपिठाच्या धाग्यावर थालिपिठं लावण्याबद्दल चर्चा? वेडी की काय!
स्वाती, भाजूनही चालतील की पण
स्वाती, भाजूनही चालतील की पण मी आळस केला.
अरे वा .. छान आहे पर्याय
अरे वा .. छान आहे पर्याय भाजणी नसेल तर ..
भाजणी की भाजाणी?
चांगली आयड्या आहे. भाजणी
चांगली आयड्या आहे. भाजणी संपली की करण्यात येइल.
आम्ही भाजणी म्हणतो. >>यामधे
आम्ही भाजणी म्हणतो.
>>यामधे थोडीशी उपवासाची भाजणी घातली तर थालिपीठ छान थापता येतात.>>
नंदिनी, वरच्या प्रमाणात चांगली थापली जातात. काल वाटलं की लाटताही येतील.
आशूडी, आमटी किंवा मुगाची उसळ वगैरेही छान लागेल.
भाजाणी सिंधी वाटतं थोडं ..
भाजाणी सिंधी वाटतं थोडं ..
>> काल वाटलं की लाटताही येतील.
अरे बाप रे! अशी थालीपीठं लाटली तर छी थू होईल की ..
मस्त पीठं थोडी भाजून घेतली
मस्त
पीठं थोडी भाजून घेतली की खरच भाजणीचा फील येतो. 
सायो छान रेसीपी. मीही करते
सायो छान रेसीपी. मीही करते अशी थालीपीठं, मात्र कधी ताजा मसाला भाजून घातला नव्हता. पुढच्या वेळेला तसं करुन बघेन.
पोळी कुस्करली की ती थालीपीठात न जाता तिची फो.पो. होते.)
पीठं मात्र नेहमी भाजून घेते. १ वाटी कणीक न घालता - चणाडाळ पीठ + तांदूळ पीठ + कणीक असं घेते.
आशूडीनी लिहील्याप्रमाणे शिळी आमटी, उसळ, भाजी, कोशिंबीर, भात जे काय आसेल ते लोटते त्यात. त्याप्रमाणे वरील पीठात बदल करते. म्हणजे आमटी, उसळ असेल तर च. डा. पीठ कॅन्सल. भात असेल तर तांदूळ पीठ कॅन्सल, वगैरे. (पोळी कुस्करुन घातली तर कणीक कॅन्सल का हा प्रश्न विचारु नै.
थालिपीठाचं पीठ भिजवताना त्यात
थालिपीठाचं पीठ भिजवताना त्यात पिठलं घातलं तर ऑस्सम लागतात थालिपीठं.
आत्ता जेवायला थालीपीठं लावली.
आत्ता जेवायला थालीपीठं लावली. माझ्याकडे भाजणी आहे त्याचीच लावली
पण त्यात कालचं वरण + कोशिंबीर घातली.