तुरीची डाळ - एक वाटी
मुगाची डाळ - एक वाटी
चण्याची/ हरबर्याची डाळ - एक वाटी
उडदाची डाळ - एक वाटी
इडली रवा किंवा तांदूळ (ऐच्छिक) - एक वाटी
बाकी अतिआवश्यक जिन्नस - मीठ आणि तेल.
अगदी बारीक चिरलेला कांदा, किसलेले एक इंच आले, मिरचीचे बारीक तुकडे, बारीक चिरलेला कडीपत्ता, कोथिंबीर इत्यादी जिन्नस आपापल्या आवडीप्रमाणे.
आप्पे पौष्टीक करायचे असतील तर किसलेले गाजर, कोबी, मटार दाणे, दुधी भोपळ्याचा किस इत्यादी इत्यादी (सिंडरेलाच्या हुक्मावर्नं)
तूर, मूग, हरबरा, उडीद ह्या चारही डाळी समप्रमाणात (१-१ वाटी) घेऊन धुवून वेगवेगळ्या भिजवायच्या.
५-६ तासांनी मिक्सरला वेगवेगळ्या वाटायच्या. वाटताना पाणी जास्त घालायचे नाही. बर्यापैकी घट्ट कंसिस्टन्सी असली पाहीजे. पीठ अगदी मऊ व्हायला पाहीजे, खरबरीतपणा नको, साधारण उडीद वडे करताना असते तसे.
हवे असले तर समप्रमाणात इडली रवा / तांदूळ वापरले तरी छान लागते व जरा मऊ होते.
डाळी वाटल्या की एका मोठ्या भांड्यात नीट एकत्र करुन फर्मेंट व्हायला ठेवायच्या. रात्रभरामधे पीठ आंबून फुगून येते.
मग सकाळी ते व्यवस्थित हलवून त्यात मीठ, अगदी बारीक चिरलेला कांदा, किसलेले एक इंच आले, मिरचीचे बारीक तुकडे, बारीक चिरलेला कडीपत्ता, कोथिंबीर, आवडीनुसार भाज्या इत्यादी आवडीचे जिन्नस घालून एकत्र करायचे.
मग आप्पे करताना आप्पेपात्र नीट तापल्यावर प्रत्येक खळग्यात अर्धा चमचा तेल घालायचे पहील्या घाण्याला, तेल किंचित तापले की थोडे थोडे मिश्रण प्रत्येक खळग्यात घालायचे, (पहिल्या वेळी पीठ जरा कमीच घालायचे. मग अंदाज येतो.) मग जरा शिजल्यासारखे वाटल्यावर उलटायचे व त्या बाजूनेही तपकिरी रंगावर येऊ द्यायचे. मध्यम आचेवर करायचे , नाहीतर बाहेरुन तपकिरी दिसतात पण आत कच्चेच असतात. पुढच्या घाण्यापासून तेलाचा अंदाज हवा तसा घ्यायचा. पण तरी अगदीच कमी, थेंबभर तेल घातले तर नीट होत नाहीत, चिकटतात.
'मवाचे चेतनच्या विपूत
'मवाचे चेतनच्या विपूत लिहीलेले प्राचीच्या विपूत चर्चिलेले आप्पे' असे शीर्षक हवे होते.
नावात पाप नको प्राची.
नावात पाप नको प्राची.
मंजुडी, जोरदार शिर्षक ,खरपुस
मंजुडी,
जोरदार शिर्षक ,खरपुस लेखनशैली आणि खमंग , टेस्टी आप्पे खूप्पच छान योग जुळवला आहे.आता माबो वर आप्पे बरेच "नशिबदार " झाले आहेत.
धन्यवाद. नेमका lunch time ला
धन्यवाद. नेमका lunch time ला post केलात.सही आहेत.
मवाचे आप्पे आप्पे एकदम
मवाचे आप्पे आप्पे एकदम हँडसम आहेत हां
जोरदार शिर्षक ,खरपुस लेखनशैली आणि खमंग , टेस्टी आप्पे << +१
मवाचे अप्पे मला वाटलं काही
मवाचे अप्पे मला वाटलं काही टायपो झालीय की काय. मावे (मायक्रोवेव्ह) मधे अप्पे करायची रेसीपी वाटली. सही रेस्पी आहे. अप्पे मला फारफार आवडतात.
विपूत रेसिप्या लिहिणार्यांचा
विपूत रेसिप्या लिहिणार्यांचा जाहिर निषेध!>> या वाक्यासाठी एक घाणा अप्पे बक्षिस!!
माहितीचा स्रोत:
मवा. प्राची. विपौड्या. मवा. प्राची. विपौड्या. प्राची. मवा. विपौड्या. चेतन.>>:खोखो:
माबो वर आप्पे बरेच "नशिबदार " झाले आहेत.>> अगदी अगदी!! यह भी करके देखेंगे.
धन्यवाद प्राची
मस्त मस्त ह्या विकांताला करुन
मस्त मस्त ह्या विकांताला करुन बघणेत येतील
मी शेम प्रमाणाचा ढोकळा करते नेहमी, पण त्यात इनो घालते (नाही घातला तरी चालेल असं दरवेळी मनात येतं पण तरी पदार्थाला तीट नको लागायला उगाच म्हणून घालते इनो :फिदी:)
हे बरं आहे रव्याच्या एकाच मिश्रणाने कधी इडली कधी डोसा कधी अप्पे तसे ह्या रेस्पीने कधी ढोकळा कधी अप्पे कधी डोसे करुन व्हरायटी केल्याचा आभास करता येईल
रेसिपी वाचताना जाम मजा आली!
रेसिपी वाचताना जाम मजा आली!
शीर्षक नि लेख दोन्ही मस्त
शीर्षक नि लेख दोन्ही मस्त
आईला सांगेन करायला..
फॉर अ चेंज रेस्पी वाचल्यावर
फॉर अ चेंज रेस्पी वाचल्यावर मला जमेल असे वाटतेय.. करुन बघणार.
माहीतीचा स्त्रोत एकदम भारी!
मंजूडे, याला आता "नानबाची
मंजूडे, याला आता "नानबाची पोह्यांची उकड" सारखं "मवाचे आप्पे" नाव पडणार
कालच विपुत रेसिपी लिहिल्याने
कालच विपुत रेसिपी लिहिल्याने निषेध चांगलाच वर्मी लागलेला आहे
मवाचे आप्पे मस्त रेसिपी. इडली-डोशाचे पीठ फुगून वर येण्याच्या बाबतीत अजिबात वश होत नसल्याने इनो घालायची तयारी ठेवून करुन बघेन.
मस्त आहे रेस्पी. मी नेहमी
मस्त आहे रेस्पी. मी नेहमी इडलीच्या पीठाचे करते. आता असे करुन पाहीन. मुलांच्या डब्यात द्यायला अजून एक पॉसिबिलिटी वाढेल
भारी. >> विपूत रेसिप्या
भारी.
>> विपूत रेसिप्या लिहिणार्यांचा जाहिर निषेध!
है शाब्बास!
माहितीचा स्रोत >>> विपूत
माहितीचा स्रोत >>>
विपूत रेसिप्या लिहिणार्यांचा जाहिर निषेध >>> +१
आप्पे हा आवडता प्रकार आहे. आधी कविनचे आणि मग मवाचे आप्पे करुन बघण्यात येतील.
रेसिपी मस्त आहे. मी अशा
रेसिपी मस्त आहे. मी अशा पिठाचे कायम अडै करते. आता आप्पे करून बघेन, आमच्याकडे "गुंडपंगला" ही ऑल टाईम फेवरेट डिश आहे.
मस्त रेसीपी!
मस्त रेसीपी!
आज अगदी मवाचे आप्पे शोधायला
आज अगदी मवाचे आप्पे शोधायला आले.... आणि विपूहॉप्पिंग करण्यापासून वाचले गं बाई !
धन्यवाद मनजुडी
करतेच आता
छान आहे रेसिपी .. मला नीट
छान आहे रेसिपी ..
मला नीट आठवत असेल तर माझी आई बहुतेक पोहे भिजवून घालायची आणि काजूचे तुकडेही ..
छान कृती. करणार करणार.
छान कृती. करणार करणार.
अवांतर - ह्याचे एकवचन काय होते? लेकीला ३-४ आप्पे दिले ताटलीत तर १ तसाच टाकुन निघाली. का तर म्हणे, 'नको'. मग नेहमीप्रमाणे मी म्हणत राहिले, 'अगं एकच तर अप्पा राहिलाय, खा त्याला'... मनात आले, इथे आत्ता कोणी अप्पा नावाचा इसम असता तर पळुनच गेला असता घाबरुन.
सुनिधी मस्त वाटतेय रेसिपी.
सुनिधी
मस्त वाटतेय रेसिपी.
ह्याचे एकवचन काय होते? >>
ह्याचे एकवचन काय होते? >> कानडीमधे तरी आप्पम. पण कानडीमधे जास्त करून याला गुंडपंगला म्हणतात. क्वचित आप्पे म्हणताना ऐकलंय.
मंजूडी सही सही. . धन्यवाद.
मंजूडी सही सही. :). धन्यवाद.
मस्त फोटो. माझ्याकडचा फोटो सापडवून रात्री टाकते.
मस्त. सापडवून की शोधून?
मस्त. सापडवून की शोधून?
छान रेसिपी. लोकहो, आप्पेपात्र
छान रेसिपी. लोकहो, आप्पेपात्र नसताना आप्पे करणे शक्य आहे का? युक्ति सांगा बरे अस्ली तर.
आप्पेपात्र नसताना छोट्या मफीन
आप्पेपात्र नसताना छोट्या मफीन ट्रेमध्ये ओव्हनमध्ये करतात असं ऐकलं आहे. करून पाहिलं नाही कधी.
धन्यवाद राखी. Aebleskiver
धन्यवाद राखी.
Aebleskiver pan या नावाने अमेरिकेत हे पात्र मिळेल. ही amazon ची link.
http://www.amazon.com/Camp-Chef-True-Seasoned-Aebleskiver/dp/B000X4LCBY/...
हे मि इडलिचे पीठ , बारीक
हे मि इडलिचे पीठ , बारीक चिरलेला कांदा, मिरचीचे बारीक तुकडे, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर हे जिन्नस घालून बनविले आहे...