माजं चोरिला गेलेलं लिखान

Submitted by बाबूराव on 12 March, 2013 - 13:12

माझं एक लिखान चोरिला गेलं होतं. जुन्या बाडात एक कापी सापडलि. आपनासाठि त्यातला काहि भाग स्पेशल देत आहे.

- ए भाई, तु आज मला हितं काहुन बोलवले ?
- आपन हितंच भेटु शकलो अस्तो.
- काहुन ?
- हितुन पुढं तुजी हद्द चालु होते
- मंग ?
- तुझी मानसं चिन्धिचोर हायेत. माजी मानसं कापडं काडुन घेत नाहित.
- माज्या मानसानि काडून घेतल्ली कापडं आधि त्यांचिच व्हती
- हम्म्म. मंग आपुन या पुलाखालिच भेटु शकलो असतो.
- व्हय.
- आठवतं का ? हितं तू माज्या गोट्या चोरुन नेल्या व्हत्या
- आनि तु माझ्या बिड्या
- हम्म. या पुलाखालि आपलं ल्हानपन गेलं.
- हितंच आपल्या बाबाला पोलिस घेऊन गेल्ते
- आनि तुच पोलिसाना म्हनलेला मेरा बाप चोर है
- हम्म. बसुन खात व्हता. आई निरुपायानि कापडं शिवायची.
- कुनाचि ?
- ते आजबी सस्पेन्स हाय. सज ला इच्चार !
- कापडं शिवुन अन इटा वाहुन तिचा चेहरा सुजला व्हता.
- इटांनी अन शिलाईनं चेहरा सुजतो असं कोन म्हनलं ?
- मागच्या गल्लीतलं सलीम अन जावेद
- त्ये लई डँबीस हायेत. परवा कुनाच्यातरी घरात शिरुन कागद चोरत व्हते
- कागद कशापायी ?
- त्येंचा धंदा वाहिला, आपला वाहिला. आपल्याला त्यातलं कलत नाय.
- भाई ! आपन जेव्ही करायचं का ?
- जेव्ही ? आन तुज्याबरोबर ? थुत या जिंदगानीवर
- भाई ! तू जेवी करतोस का नाय ?
-नाय
- भाई ! तू जेवी करतोस का नाय ?
- नाय
- काय नाहि माज्याकडं ? माज्याकडं गुंडे हायेत, गन्स हायेत, अफू, चरस, गांजा हायेत, शार्प शूटर हायेत, किडनॅपर हायेत, डिस्को क्लब्ज हायेत, मॉल्स हायेत, सरकारी जागा हायेत.. काय हाय तुझ्याकडं ? आं , तुज्याकडं काय हाये ?
- माज्याकडं ..

माज्याकडं.. पार्टीचं तिकीट हाये...

(वाफच्या इन्जिनाचा शॉट. फुक्क फुक्क करत वाफंची शक्ती दावायचा शीन )

- भाई ! मला माफ कर बाबा.. तूच सबसे बडा भाई ! आजसे मै भी तेरा, मेरा भी सब तेरा, और तेरा भी सब तेरा.
- आनि आय ?
- आता माज्याकडं रायलं काय ? सांभाळिन आयला. मला त्वांड लपवायला कुटंतरी एका कोप-यात जागा दे
पॉ S SSS
( ट्रेनच्या डब्बोला डब्बोचा शीन _)

- बाबूराव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages